नीलकंठ भानु बनले जगातील सर्वात वेगवान ‘मानवी कॅल्क्युलेटर’, भारताला मिळवून दिले पहिले सुवर्णपदक, जाणून घ्या सविस्तर.

देश-विदेश

हैदराबादचा नीलकंठ भानू हा प्रत्येक वेळी संख्यां बदल विचार करत असतो आणि आता तो जगातील सर्वात वेगवान मानवी कॅल्क्युलेटर आहे. वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी त्याने मेंटल कॅल्क्युलेशन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले आहे.

नीलकंठ भानू याचे असे म्हणने आहे की गणित हा मेंदूचा एक मोठा खेळ आहे. तो मेंटल मैथ्सची तुलना स्पिंटिंगशी करतात. तो म्हणतो की वेगाणे धावणाऱ्यांवर कोणीही प्रश्न करत नाही, परंतु मेंटल मैथ्सवर नेहमीच प्रश्न उद्भवतात.

भानुचा गणिताबरोबरचा प्रवास वयाच्या पाचव्या वर्षी सुरू झाला. त्यावेळेस त्याचा अपघात झाला. त्याच्या डोक्याला दुखापत झाली होती आणि वर्षभर तो बेडरेस्टवर राहिला. त्याने सांगितले की माझ्या पालकांना सांगण्यात आले होते की माझ्या पाहण्याची आणि ऐकण्याची क्षमता कमी होऊ शकते. मग मी माझे मन व्यस्त ठेवण्यासाठी मेंटल मैथ्स कॅल्क्युलेशन्स करू लागलो.

तो म्हणतो की भारतातील मध्यमवर्गीय कुटुंबातून येणारी एखादी व्यक्ती सहसा असा विचार करते की एखादी चांगली नोकरी मिळवून सेटल व्हावे,किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करावा, तो गणितासारख्या क्षेत्रात जाण्याचा विचार कमी करतो. परंतु अंक गणिताकडे त्यांचा कल होता, यामुळे भानूने गणिताची पदवी घेण्याचा विचार केला आणि आता त्याची पदवीही जवळजवळ पूर्ण होत आली आहे.

डोक्यचा मोठा खेळ: मोठ्या प्रमाणात स्पर्धकांप्रमाणेच भानूदेखील आपल्या तयारीला यशाचे श्रेय देतो. तो म्हणतो की तुम्ही टेबलावर बसून अभ्यास करता हे इतके सोपे नाही. उलट हा डोक्याचा मोठा खेळ आहे. मी स्वतःला फक्त एक वेगवान गणितज्ञ म्हणून नाही तर वेगवान विचारसरणीची व्यक्ती म्हणून पण तयार केले आहे.

लहानपणी भानु शाळेतून आल्यानंतर सहा ते सात तास सराव करायचा. पण चॅम्पियनशिप जिंकून रेकॉर्ड बनल्यापासून तो दररोज इतकी फॉर्मल प्रॅक्टिस करत नाही. त्याऐवजी, तो आता वेगळ्या पद्धतीने प्रॅक्टिस करतो, ज्याबद्दल तो म्हणतो की “मी नेहमीच अंकांविषयी विचार करत असतो.”

भानू म्हणतो कि, मी संगीत लावून प्रॅक्टिस करतो, त्यादरम्यान मी लोकांशी बोलतो, भेटतो आणि क्रिकेटही खेळतो. कारण बर्‍याच गोष्टी एकाच वेळी करण्याचा तुमच्या मनावर कल असतो. जर मी कोणाशी बोलत असेल तर मी किती वेळा डोळ्याची पाणी पडते हे मोजतो. हे विचित्र वाटेल, परंतु यामुळे तुमचे मन सतत चालू राहते.

मला लोकांना प्रेरित करायचे आहे: भानु म्हणतो की रेकॉर्ड्स आणि कॅल्क्युलेशन्स हे एक सांगण्याचा मार्ग आहे की जगाला गणितांची गरज आहे आणि गणित हे आपल्यासाठी मजेदार असायला हवे, लोक म्हणतील की आम्हाला हा विषय खूप आवडतो. माझा खरा हेतू म्हणजे लोकांची गणिताबद्दलची भीती संपवायची आहे. “

चार जागतिक विक्रम नोंदवले: भानुने आतापर्यंत चार जागतिक विक्रम आणि इतर बरीच कामगिरी केली आहेत. भानुच्या कुटुंबाला आपल्या मुलाचा खूप अभिमान आहे. भानु ने स्पष्ट केले की “जेव्हा मी माझी पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकली, तेव्हा माझ्या काकांनी मला सांगितले की मी जितके वेगवान झाले पाहिजे जितके कोणी नसेल. मी असा विचार पण केला नव्हता कि मी सर्वात वेगवान मानवी कॅल्क्युलेटर बनेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *