हि ७ झाडे…! जर आपल्या घरासमोर असेल तर घरात सुखसमृद्धी, भरभराट होण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही ।। वाचा कोणती झाडे आहेत हि !

प्रादेशिक शिक्षण

नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.

श्री स्वामी समर्थ” मंडळी झाडांना वास्तुशास्त्रातसुद्धा फार महत्त्व आहे. घरात झाड लावल्याने घरातील वातावरण तर शुद्ध होतंच पण त्याचबरोबर त्या झाडाकडे पाहून आपलं मन सुद्धा प्रसन्न होतं. झाडांचा आपल्या जीवनावर सुद्धा खूप प्रभाव पडतो. काही झाडं ही आपल्या आयुष्यावर शुभ प्रभाव टाकतात, अर्थात सकारात्मक प्रभाव टाकतात.

तर काही झाडांचा आपल्या आयुष्यावर नकारात्मक प्रभावसुद्धा पडतो. पण मग कोणते झाड अशी आहेत की ज्यांचा सकारात्मक प्रभाव पडतो, आणि कोणती झाड अशी आहे ज्यांचा नकारात्मक प्रभाव पडतो, हेच सगळ आज आपण जाणून घेणार आहोत. तर आपल्या जीवनासाठी एक प्रकारचा शुभ संकेत मानला जातो.

पण ती सुद्धा काही जाड आहे की अशुभ मानले जातात. सुरुवातीला बोलूया आपल्या जीवनावर शुभ प्रभाव टाकणाऱ्या अर्थात सकारात्मक झाडांबद्दल. त्यामध्ये सगळ्यात पहिलं नाव येतं तुळशीच. “तुळस” आपल्या हिंदू धर्मात खूप पवित्र मानली गेली आहे. प्रत्येकाच्या दारामध्ये तुळस ही असतेच. तुळशीला अध्यात्मिक आणि औषधी असं दोन्ही दृष्ट्या महत्त्व आहे.

आयुर्वेदातही त्यामुळे तुळशीला स्थान आहे. तुळशीला माता लक्ष्मीचे प्रतीक मानल जात. तुळशीचे पान श्रीहरि विष्णुना खूप प्रिय आहे, हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहेच. आणि म्हणूनच अशी तुळस जर तुमच्या दारात असेल तर तुमच्या घरामध्ये धनसंपत्ती आणि आरोग्याची कमतरता तुम्हाला कधीही जाणवत नाही.

तुळशी मधून सकारात्मक ऊर्जा प्रसारित होत असते. असाच दुसरा एक झाड म्हणजे “बेलाचे झाड“. ज्यांच्या दारात बेलाचं झाड असत त्या व्यक्ती सुद्धा नेहमी सुखी असतात. बेलाचे झाड खूप मोठं असतं, ते अंगणात लावावं असं सुद्धा म्हटले जातात. हे झाड दारात लावल्याने घरात सुख-समृद्धी कायम राहते.

आणि हेच बेलाचं झाड जर तुमच्या दारात आपोआप उगवलं तर मग नक्कीच तो एक शुभ संकेत असतो. कारण महादेवांच्या कृपेमुळे आपल्या घरात कोणत्याही प्रकारची वाईट शक्‍ती प्रवेश करू शकत नाही त्याच बरोबर राहू केतूच्या दुषप्रभावापासून सुद्धा आपल्या घराचे या झाडामुळे संरक्षण होते.

पुढचं झाड आहे “लिंबाचे झाड“. लिंबू आपल्या आसपास पसरलेल्या सर्व नकारात्मक आणि वाईट शक्तींना आकर्षित करते. म्हणून जर घरात लिंबाचे झाड असेल तर आपल्या घरावर कोणाचीही वाईट दृष्टी पडत नाही. तसेच आपल्या घरातील वातावरण शुद्ध आणि पवित्र राहत असं म्हटलं जातं.

त्यानंतरच झाड म्हणजे “मंदार” किंवा “रुई“. मंदार वृक्ष सुद्धा आपल्यासाठी खूप शुभ मानला जातो. मंदार वृक्षाची फुलं महादेवांना, गणपती बाप्पाला तसेच हनुमंतालाही प्रिय असतात. मंदार वृक्ष आपल्या जीवनात येणाऱ्या कष्ट आणि बाधांच निवारण करतात.

ज्यांच्या घराबाहेर हे मंदार अर्थात रुईचे झाड असेल किंवा ते आपोआप उगवलेल्या असेल तर ही अत्यंत शुभ गोष्ट आहे. त्यांना कशाचीही कमतरता कधीच भासत नाही. ज्या व्यक्तींच्या कुंडलीत एखादा दोष असेल त्या दोषांचा परिहार होण्यासाठी सुद्धा, तसच एखाद्या व्यक्तीला वारंवार दृष्ट लागत असेल तर अशा व्यक्तींना मंदारच्या पानांची माळ करून ती गळ्यात घातली जाते.

त्यामुळे संपूर्ण दोष नाहीसे होतात असं म्हटलं जातं. मंडळी त्यानंतरच शुभ झाड आहे “केळीचे झाड“. केळीचे झाड हे आपल्या घरासाठी शुभ असतं. केळीचे झाड आपल्या घरात सुख समृद्धी घेऊन येते तसेच केळीच्या झाडा मध्ये श्री हरी विष्णूंचे वास्तव्य असते असे म्हटले जाते.

आणि म्हणूनच त्यांच्या घराच्या आसपास केळीचे झाड असतं त्यांच्या घरामध्ये माता लक्ष्मीचे वास्तव्य असते. तसेच घरात सुख-समृद्धी कायम राहते. त्यानंतरच झाड म्हणजे “नारळाचं झाड“. कोणत्याही शुभकार्यात नारळाचा वापर आवर्जून केला जातो. नारळाला खूपच शुभ आणि पवित्र मानल जात.

ज्या घराच्या अंगणात नारळाचे झाड असतं अशा घरांमध्ये सुध्दा सुख-समृद्धी आणि वैभव कायम राहतं. सदस्यांना समाजात मान-सन्मान मिळतो. या यादीमध्ये आणखीन एका झाडाची भर पडते आहे. आणि ते म्हणजे “आवळ्याचे झाड“. आवळा हा बहुगुणी आणि पोषक तत्वांनी युक्त आहे.

आवळ्याच्या झाडाच्या आसपास नेहमी सकारात्मक ऊर्जा आणि शुद्ध ऊर्जा पसरलेली असते, आणि घरातील वातावरण नेहमीच सकारात्मक राहते. मंडळी ही होती सकारात्मक झाड.परंतु काही झाड अशी असतात ज्यांचा आपल्या जीवनावर नकारात्मक परिणाम पडू शकतो.

आणि म्हणूनच अशी झाड आपल्या घराच्या आसपास लावू नये. चला तर जाणून घेऊया कोणकोणते आहे ते झाड.आपल्या घराच्या आसपास कधीही काटेरी झाडे लावू नये, तसेच ज्या झाडांची पानं विषारी आहे किंवा ज्या झाडाची पान तोडल्यास दूध निघतं अशी झाडे आपल्या अंगणात किंवा गॅलरीमध्ये कधीही लावू नये. याला मंदार वृक्ष मात्र अपवाद आहे.

तसेच चिंचेचे झाड, बोराच झाड ही नकारात्मक शक्तींना आकर्षित करणारे झाड आहे. त्यामुळे ते घराच्या आसपास असू नये. मंडळी आता सकारात्मकता आणणाऱ्या झाडांची यादी जी मी आज सांगितली त्यापैकी कुठल झाड तुमच्या घराच्या आसपास आहे का?

सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *