नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.
“श्री स्वामी समर्थ” आपल्या आजूबाजूला अनेक घटना घडत असतात. या घटना शुभ आहेत की अशूभ आहेत हे जाणून घेण्याची अनेकांना इच्छा असते. पक्षी आपल्या निसर्गातील एक अविभाज्य असे घटक आहेत. कधी कधी हे पक्षी आपल्या घरासमोर येऊन बसतात.
कधीकधी आपल्या गॅलरी येतात, तर बरेचसे पक्षी आपल्या घरामध्ये सुद्धा प्रवेश करतात. आपल्या घरासमोर आलेले किंवा आपल्या घरात आलेले पक्षी हे शकुन शास्त्राच्या दृष्टीने शुभ असतात की अशुभ असतात, या पक्षापासून आपल्याला काही नुकसान तर होत नाही ना?
यासंबंधी आज आपण काही माहिती पाहणार आहोत. काही पक्षी आपल्या घरात येणे किंवा आपल्या गॅलरी येनं, आपल्या घराच्या छतावर बसणं, आपल्या घरासमोरील अंगणातील झाडांवरती बसणं, हे खरंतर अत्यंत शुभ असतं. काही पक्षी हे आपल्या घरात धनलक्ष्मी म्हणजेच माता लक्ष्मी चा आगमन होणार आहे, आपण धनश्रीमंत होणार आहोत याचे संकेत देत असतात.
चला तर जाणून घेऊया शकुन शास्त्रानुसार पक्षांच आपल्या घराजवळ किंवा आपल्या घरात येन हे नक्की कोणत्या गोष्टींचे संकेत असतात. सुरुवात करूया पोपटापासून. जर तुमच्या घरात किंवा घरासमोर अचानक पोपट घेऊन बसू लागले तर हे अत्यंत शुभ संकेत असतात. की आपल्या घरात लवकरच धनप्राप्ती होणार आहे.
धनलाभाचे नवीन योग निर्माण होणार आहेत आणि आपल्या घराची बरकत होणार आहे. आपल्या घरासमोर जर कावळा येऊन बसू लागला तर लवकरच एखादा अतिथी म्हणजेच पाहुण्यांचं आगमन आपल्या घरात होऊ शकत. आपल्या घराच्या आसपास जर वटवाघळ येऊ लागली तर लक्षात घ्या वटवाघूळ हा अत्यंत धोकादायक प्राणी आहे.
आणि ही शकुन शास्त्रानुसार आपल्यासाठी आणि आपल्या घरातील लोकांसाठी एक धोक्याची घंटा ठरू शकते. वटवाघूळ हा मोठ्या प्रमाणात निगेटिव्ह एनर्जी क्रिएट करणारा पक्षी आहे, असा पक्षी आपल्या घराजवळ येणे हे अशुभ समाचार आपल्यासाठी आणू शकतो.
आणि म्हणून वटवाघळे जर आपल्या घराजवळ आली तर त्यांना ताबडतोब पाठवलं किंवा वटवाघुळ आपल्या घरासमोरील झाडांवर बसणार नाहीत याची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरत. चिमणी तर आपल्या घरात आली किंवा तिने जर आपल्या घरात घरटे बनवलं आपल्या अंगणात घरटे बनवलं तर आपल्या घरातलं वातावरण आनंदी बनत.
आपल्या घरावर येणारं संकट टाळण्याचे काम हे चिमणीच घरट करतं असं शकुन शास्त्र मानते. आपल्यावर येणार्या अनेक बाधा चिमणीचे घरटे जर असेल तर त्या दूर होतात.कबुतरा विषयी एक गैरसमज अनेक लोकांच्या मनात असतो तो आज आपण दूर करूया.
तुम्हाला जर सकाळी उठल्यानंतर तुम्हाला जर कबुतराचा आवाज आला तर तुमचे नातेसंबंध मधुर बनतात. तुमचे मित्र तुमच्याशी प्रेमभावनेने वागू लागतात, मैत्री संबंध मजबूत होतात. तुम्ही ज्या ठिकाणी काम करत आहे त्या सहकाऱ्यांबरोबर आपले संबंध दृढ बनतात.
याउलट जर सायंकाळच्या वेळी किंवा रात्रीच्या वेळी कबुतरांचा आवाज ऐकू येऊ लागला तर मित्रांनो आपल्या एखाद्या सहकाऱ्यांबरोबर आपलं मोठं भांडण होऊ शकत. घरात कलह निर्माण होतो. कदाचित घरात चोरी सुद्धा होऊ शकते. घरामध्ये मोठ्या प्रमाणात वादविवाद निर्माण होतात.
तुम्हाला जर घुबड तुमच्या घरा शेजारी दिसू लागलं तर लक्षात घ्या लवकरच एखादी मोठी शुभ बातमी तुमच्या कानावरती पडणार आहे. सकाळ सकाळ झालेल मोराचा दर्शन तुम्ही जर सकाळी बाहेर पडताना तुम्हाला मोर दिसला किंवा तुमच्या घराजवळ तर मोर आला, तर अत्यंत चांगली बातमी आहे.
तुम्हाला काहीतरी शुभ समाचार मिळणार आहे, किंवा एखादा मोठा लाभ या ठिकाणी संभवतो. सकाळी जर तुम्हाला किंवा दिवसभरात कधीही जर तुम्हाला सापाचे दर्शन झालं तर हा साप जर तुमच्या घरात निघाला किंवा तुम्ही बाहेर चालताना तुमच्या वाटेत जर तुम्हाला साप दिसला, विशेष करून सकाळच्या वेळी झालेल्या सापाचा दर्शन धनप्राप्तीचे योग निर्माण करतो.
घरांमध्ये लक्ष्मीचं आगमन करवतो. तुम्हाला मोठ्या प्रमाणात लक्ष्मी प्राप्ती होऊ शकते. तुम्हाला जर सकाळी घोड्याचा किँकाळण्याचा आवाज आला, तर तुमच्या संतान म्हणजेच मुलाबाळाकडून तुम्हाला एखादी शुभ बातमी ही समजू शकते.
सकाळ सकाळ झालेलं सशाच दर्शन ससा जर तुम्हाला सकाळी ससा दिसला तर तुमच्या उद्योग-व्यवसायात तुम्हाला मोठा लाभ होऊ शकतो, याचे हे संकेत आहेत. सकाळी जर तुम्हाला गाय दृष्टीस पडली किंवा तुमच्या घरासमोर जर गाय आली तर काहीतरी शुभ घटना तुमच्या जीवनात घडणार आहे,.
तुम्हाला यशप्राप्ती होणार आहे, तुमच्या कामांमध्ये तुम्हाला यश मिळण्याचे हे संकेत आहेत. एक अत्यंत दुर्मिळ पक्षी म्हणजे हंस जर तुम्हाला हंस तुमच्या घरात शेजारी आला तुमच्या घरासमोर आला तुम्हाला बाहेर जाताना जर हंसाच दर्शन झालं तर तुमच्या कामामध्ये नवीन ऊर्जा, नवीन उत्साह तुम्हाला पाहायला मिळेल.
सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.