काही लोक असे असतात की जे आयुष्यभर कष्ट करतात. खूप परिश्रम करतात. अगदी जमीन आणि आकाश एक करतात. मात्र तरीसुद्धा ते श्रीमंत होत नाहीत ते कधीच श्रीमंत होत नाही त्यांच्या घरात पैसा येत नाही आणि जरी आलास जरी नशीबाने आलाच तरीही तो पैसा टिकत नाही.
चला तर पाहूया की असे पाच व्यक्ती कोण आहेत. हिंदू धर्मशास्त्रामध्ये असा उल्लेख आहे, की या पाच व्यक्तींनी कितीही कष्ट करू द्या ते श्रीमंत होत नाही.
पहिली व्यक्ती- जी व्यक्ती मळकट कपडे घालते. ही व्यक्ती सतत मळकट कपडे घालते. त्या व्यक्तीच्या घरी कधीच माता लक्ष्मी स्थिर राहत नाही. जर तुमचा व्यवसाय असा आहे, की तुम्हाला मळकट कपडे घालावे लागतात. किंवा तुम्ही घातलेले कपडे मळकट होतात कामामुळे. परिश्रम कष्ट हे ईश्वराचेच एक रूप आहे.
आणि म्हणून कष्ट करताना जर तुमचे कपडे घाण होत असतील. तर ते मान्य आहे. मात्र कष्टाची कामं न करतासुद्धा जे लोक आळस म्हणून मळकट कपडे घालतात, ते आयुष्यात कधीच श्रीमंत होत नाहीत.
दुसरी गोष्ट- ज्या व्यक्तीची वाणी कठोर आहे. ज्याच्या तोंडून सतत अपशब्दच बाहेर पडतात. दुसऱ्या संबंधी वारंवार दुखावतो त्याच्या तोंडात शिव्या शाप असतात, त्याच्या तोंडी सतत वाईट भावना असते. तर असा कठोर वाणीचा मनुष्य सुद्धा कधीही श्रीमंत होऊ शकत नाही. आणि जरी नशिबाने त्याच्याकडे पैसा आला तरी सुद्धा माता लक्ष्मी जास्त दिवस अशा व्यक्तीच्या घरात वास्तव्य करत नाही.
तिसरी गोष्ट- जी व्यक्ती सुर्योदया समय किंवा सूर्यास्त समयी झोपलेली असते. सुर्योदय जेव्हा सूर्य उगवत आहे, तर आपण ब्रह्म मुहूर्तावर उठावे. असे हिंदू धर्मशास्त्र मानत मात्र जर तुम्हाला ब्रह्म मुहूर्तावर उठाणे शक्य नसेल, तर कमीत कमी आपण दिवस उगवण्यापूर्वी सूर्योदयापूर्वी तरी नक्की उठावं.
जो व्यक्ती सूर्योदय झाल्यानंतर उठतो तो कधीही आयुष्यामध्ये श्रीमंत होत नाही. जी गोष्ट सूर्योदयाची आहे तीच गोष्ट सूर्यास्ताची सुद्धा आहे. जो व्यक्ती सूर्यास्त झाला तरीसुद्धा झोपलेला असतो. सूर्यास्त समयी जो झोपेच्या अवस्थेत असतो. त्या व्यक्तीवर ती माता लक्ष्मीची कृपा कधीच होत नाही.
माता लक्ष्मीच्या आपल्या घरातील आगमनाची वेळ म्हणजे सूर्योदय आणि सूर्यास्त या दोन्ही वेळी माता लक्ष्मी आपल्या घरात येत असते. या दोन वेळा अत्यंत प्रसन्न असतात आणि या दोन वेळा केलेलं कार्य हे नेहमी सफल होतात आणि मग या दोन वेळा आपण झोपण्यासाठी नक्की टाळा.
चौथी गोष्ट – ज्या व्यक्ती पाय न धुवताच झोपतात. अस्वच्छ पायांनी झोपतात अशा व्यक्तीच्या घरी रोगराई वाढते. आजार वाढतात. आणि त्याचा भरपूर पैसा पुष्कळ पैसा पुष्कळ धन हे आरोग्यासाठीच खर्च होतं. आजारपणासाठी खर्च होतं तुम्हाला याचा अनुभव आलेला असेल.
स्वच्छता ही सर्वात महत्त्वाची असते. भारत सरकारने सुध्दा स्वच्छतेसाठी उपक्रम राबवले आहेत. आपण या उपक्रमांमध्ये सहभागी व्हा. हिंदू धर्मशास्त्रात जर विचार केला तर हिंदू धर्मशास्त्र अस मानत की जो व्यक्ती पाय न धुवताच झोपतो, त्या घरात त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये आजारपण वारंवार येतं.
तसंच या बाबतीत अजून एक चुक अशी की जे लोक ओल्या पायांनी झोपतात त्यांच्या सुद्धा आयुष्यामध्ये त्यांना नशीब साथ देत नाही. आपण पाय स्वच्छ केले मात्र पाय न पुसटाच ओल्याच पायांनी आपण झोपलो, तरी सुद्धा गरिबी नक्की येते. अनेकजणं या गोष्टींवर विश्वास ठेवणार नाहीत, मात्र हेच सत्य आहे. आणि आपण अनुभव घेऊन पाहु शकता.
पाचवी गोष्ट- अत्यंत महत्त्वाची आहे अनेक लोक ही चूक करतात जी व्यक्ती डोक्याला तेल लावल्यानंतर उरलेलं तेल हे अन्य अवयवांवर जसं की, हात असतील, पाय असतील हातावर किंवा पायावर चोळत त्यावर ती लावते त्या व्यक्तीच्या जीवनात सुद्धा माता लक्ष्मी स्थान राहत नाही.
आपल्यापैकी बर्याच जणांना सवय असते की डोक्याला तेल लावताना उरलेलं तेल असत ते हाताला आणि पायाला लावतात हिंदू धर्मशास्त्रानुसार अशा व्यक्तीच्या जीवनामध्ये महालक्ष्मी स्थान हे कधीच निर्माण होत नाही अजून एक गोष्ट सांगू इच्छितो की जे लोक चालता चालता त्यांच्या नखांनी गवत तोडतात तृण तोडता.
बसल्या बसल्याच जमीन उकरता आपल्या नखांनी या व्यक्तींच्या जीवनात सुद्धा पैसा कधीच टिकत नाही या गोष्टी अविश्वसनीय वाटत नाही विश्वास लवकर बसत नाही आपल्या ऋषि मुनींनी त्यांनी अनेक वर्षांची साधना करून अनेक वर्षांच्या अनुभवांचा सार एकत्र करून या गोष्टी आपल्या साठी दिलेला आहे
सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.
अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.