य’श, की’र्ती, समृ’द्धी संप’न्नता मिळावी या साठी हे ३ प्रश्न रोज स्वतःला विचारा !

प्रादेशिक शिक्षण

नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.

“श्री स्वामी समर्थ” ह्या जगामध्ये प्रत्येक माणसाचे हे स्वप्न असते की त्याला यश मिळावे, कीर्ती मिळावी समृद्धी संपन्नता मिळावी. प्रत्येक माणसाची ही इच्छा असते की माझे आयुष्य सुखात आणि आनंदात गेले पाहिजे. पण फक्त इच्छा करून गोष्टी मिळत नाही जोपर्यंत आपण ती मिळवायचा प्रयत्न करत नाही.

जोपर्यंत आपण त्या गोष्टींसाठी काम करत नाही आयुष्यात तुम्हाला काही हवे असेल पण तो पर्यंत ते मिळणार नाही जोपर्यंत तुमच्या मनात त्या हव्या असलेल्या गोष्टींची स्पष्टता येत नाही. तुम्हाला आयुष्यात जे काही पाहिजे असेल त्यासाठी तुम्ही मनामध्ये स्वतःला प्रश्न विचारा आपल्याकडे जे काही शास्त्र आहेत, पुराण आहे, उपनिषदे आहेत त्यांची सुरुवात प्रश्नाने झाले आहे.

सर्व ग्रंथांचा राजा श्रीमद भगवत गीतेची सुरुवात प्रश्नांनी झाली आहे. जगामध्ये एक नंबर ला असलेले मोटिवेशनल स्पीकर टोनी रॉबिन सुद्धा म्हणतात, तुम्हाला जर खरंच आयुष्य बदलायचे असेल तर रोज स्वतःला कॉलिटी प्रश्न विचारा. यशस्वी लोक नेहमी स्वतःला क्वालिटी प्रश्न विचारत असतात म्हणूनच त्यांना उत्तरे सुद्धा त्याच क्वालिटीचे मिळतात.

आणि म्हणून ते यशस्वी होतात. आज आपण 3 असे प्रश्न पाहणार आहोत हे तुम्ही रोज स्वतःला विचारले तर खात्रीने सांगतो तुमचे आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही.

पहिला प्रश्न:- माझ्या आयुष्यामध्ये मला काय पाहिजे, आणि माझी हे काय आहे? :जोपर्यंत तुम्हाला हेच माहित नसेल कि तुम्हाला कोणत्या मुक्कामाला पोहोचायचे आहे, तोपर्यंत तुम्ही रास्ता निवडू शकणार नाही. तेव्हा तुम्ही रोज स्वतःला हा प्रश्न विचारता मला आयुष्यात नक्की काय करायचे आहे, मला नक्की काय मिळवायचंय?, कुठे पोहोचायचं आहे?

तेव्हा तुम्हाला रस्ते आपोआप भेटायला सुरुवात होते. मला रोज असे प्रश्न विचारले जातात आम्हाला कळतच नाही की आम्हाला आयुष्यात करायचे काय आहे? या प्रश्नाचे उत्तर तुमच्याकडेच आहे. जेव्हा तुम्ही रोज हा प्रश्न स्वतःला विचारायला तेव्हा त्याचे उत्तर तुमच्या आत मधूनच येईल.

प्रत्येक व्यक्तीचे आयुष्य वेगळे आहे. एका माणसाच्या आयुष्याचे उत्तर दुसऱ्याला कामी येणार नाही. आणि तुम्हाला आयुष्यात काय पाहिजे आणि तुम्ही कुठे पोहचणार आहात हे सर्वस्व तुमच्या हातात आहे आणि त्यासाठी काय केले पाहिजे हे सुद्धा तुम्हाला ठरवावे लागेल, त्यामुळे रोज हा प्रश्न स्वतःला जरूर विचारा, की मला आयुष्यात कुठे जायचे आहे, या गोष्टींचा लोक कधी विचारच करत नाही.

ते विचार न करता नुसते आपले आयुष्य पुढे ढकलत असतात. आपल्याला कुठे जायचे आहे? काय मिळवायचे आहे? हा विचार कधी त्यांच्या मनाला शिवत नाही. हे जग धावतय म्हणून आम्हीसुद्धा धावत आहोत. पण काही स्पष्टता नाही पोहचायचे कुठेआहे. म्हणून सर्वात आधी तुम्हाला हे स्पष्ट होणे गरजेचे आहे की तुम्हाला आयुष्यात काय पाहिजे.

दुसरा प्रश्न:- तुम्हाला आयुष्यात सर्वात महत्त्वाचे काय आहे?: दुसरा प्रश्न तुम्ही रोज स्वतः ला विचारा की तुम्ही आयुष्यात सर्वात जास्त महत्त्व कशाला देता. काही लोक म्हणतात की आम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमचा परिवार आहे. काही लोक म्हणतात सर्वात जास्त महत्त्वाचे आम्हाला आरोग्य आहे आणि काही लोक म्हणतात सर्वात जास्त महत्त्वाची आम्हाला मन शांती आहे.

प्रत्येकाचे विचार वेगवेगळे आहेत.पण जे काही असेल तुमच्या आयुष्यात जे काही महत्त्वाचे आहे त्यासाठी तुम्ही काम करता का? त्याच्यासाठी वेळ तुम्ही काढता का? जर तुम्हाला परिवार महत्वाचा असेल, तुमची बायको, तुमचा नवरा, तुमची मुले, तुमचे आईवडील त्यांच्यासाठी तुम्ही वेळच काढता का?

आज लोक आयुष्यात एवढे व्यस्त झाले आहेत की त्यांना परिवारासाठी वेळ नाहीये. मुलांना आईवडिलांसाठी वेळ नाहीये. जर तुमच्या आयुष्यात परिवार महत्वाचा आहे, तर तुम्हाला परिवारासाठी वेळ काढावा लागेल. तुमच्या परिवारामध्ये आनंद कसा येईल, तुमच्या परिवाराला प्रत्येक व्यक्ती आनंदी कशी राहील, तुम्ही यासाठी काम करा.

जर तुम्हाला आरोग्य महत्वाचे वाटत असेल तर तुम्ही त्यासाठी काम करा. मला या गोष्टी महत्त्वाच्या आहेत हे बोलून चालणार नाही, त्याच तुम्हाला काम सुद्धा करावे लागेल. आणि जर तुम्हाला हे वाटत असेल की मन शांती तुम्हाला आयुष्यात महत्त्वाची आहे, तर तुम्हाला त्याच्यावर सुद्धा काम करावे लागेल. आणि हे काम तुम्ही कधी करू शकाल? जेव्हा तुम्ही रोज हा प्रश्न स्वतःला विचाराल. जोपर्यंत तुम्ही या गोष्टीचा विचार करणार नाही, तोपर्यंत तुम्ही या गोष्टीवर काम करू शकणार नाही.

तिसरा प्रश्न:- आजचा दिवस मी माझे आयुष्य बदलण्यासाठी कसा वापरू शकतो?: हा प्रश्न तुम्हाला दिवस सुरू होताना रोज विचारला पाहिजे तो म्हणजे माझा आजचा दिवस माझ्या उज्वल भविष्यासाठी याचा कसा वापर करून शकतो. त्याचा वापर करून मी माझ्या भविष्यकाळात आनंदी कसा होईल? आजच्या दिवसाचा वापर करून मी स्वतःचे अजून कसे चांगले व्यक्तिमत्व बनवू शकेल?

जर तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर रोज हा प्रश्न तुम्हाला स्वतःला सारखा विचारावा लागेल. एक लक्षात ठेवा तुमचा भूतकाळ हा गेलेला आहे त्यामुळे त्याबद्दल जास्त विचार करून काही फायदा नाही तुमच्याकडे वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ आहे.

पण तुम्ही सध्या वर्तमान काळा मध्ये काय करता यावर तुमचे भविष्य असणार आहे म्हणून आजचा दिवस तुम्ही तुमचे ध्येय गाठण्यासाठी त्याचा वापर करत आहात की टाईमपास करून वाया घालवत आहात हे सर्वस्वी तुम्ही स्वतः तपासून पहा. एक लक्षात ठेवा तुम्हाला जर कोणी यशस्वी बनवणार असेल तर ते तुम्ही स्वतः आहात.

तुम्हाला कोणी मन शांती देणार असेल तर ते तुम्ही स्वतः आहात. जर तुम्हाला आयुष्यात हवा ते देणार असेल ते तुम्ही स्वतः आहात. कोणी दुसरा येणार नाही हे जग सुद्धा तुमच्यासाठी तेव्हाच करेल जेव्हा तुम्ही स्वतः तुमच्यासाठी काहीतरी कराल. जर तुम्हाला वाटत असेल तुम्हाला आयुष्यात यश पाहिजे, समृद्धी पाहिजे, संपन्नता पाहिजे… तर रोज तुम्ही स्वतःला हे तीन प्रश्न विचारायला अजिबात विसरू नका.

सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *