गुळासोबत हा पदार्थ खाल्याने असा होईल चमत्कार।। गूळ खाण्याचे १३ फायदे ।। गुळाचे हे फायदे जाणाल… तर रोज गूळ खाल! जाणून घ्या अधिक माहिती या लेखात !

प्रादेशिक शिक्षण

आज आपण पाहणार आहोत गुळाचे तेरा अगदी गुणकारी असे फायदे. आपणास माहीत असेल की भारतामध्ये अगदी पूर्वीच्या काळापासून आपण गुळाचा वापर करत होतो. मात्र अलीकडील काही वर्षांमध्ये गुळापेक्षा साखरेचं प्रमाण हे अधिक जास्त वाढले.

आणि साखरेच्या या वाढलेल्या प्रमाणा बरोबर अनेक रोग देखिल आपल्या जीवनामध्ये प्रवेश करून आपलं जीवन हे रोगग्रस्त करत आहेत. आणि म्हणूनच या गुळाचे कोणते फायदे आहेत हे जर आपण समजून घेतले तर आपण गुळाचा वापर नक्की वाढवाल ही अपेक्षा आहे. तर पाहुयात गुळाचे फायदे.

गुळाचा पहिला सगळ्यात मोठा फायदा असा आहे की पिंपल्सची समस्या. पिंपल्सची समस्या ही एक सामान्य अशी समस्या बनलेली आहे. आपल्या आहारामध्ये तेलाचा आणि मसाल्यांचा अतिरेकी वापर होऊ लागला आहे. तसेच धूळ आणि प्रदूषण यामुळे पिंपल्सची समस्या खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

जर आपण रोज थोडा थोडा गूळ खाल्ला तर पिंपल्सच्या समस्येवर ती समाधान मिळवू शकतं. ॲनिमिया, गुळामध्ये आयर्न म्हणजेच लोहा चा समावेश असतो. आणि त्यामुळे सकाळी पाण्यासोबत तर आपण गुळाचं सेवन केलं तर ॲनिमियाचा त्रास दूर होऊ शकतो. थकवा, आजच जीवन हे धावपळीचे जीवन बनलेल आहे.

आणि त्यामुळेच जर तुम्हाला खूप जास्त थकवा जाणवत असेल तर तेव्हा देखील तुम्ही गूळ खाणं फायदेशीर ठरू शकतं. थकवा जाणवल्यास थोडासा गूळ पाण्यासोबत घ्या त्यामुळे तुम्हाला नक्कीच आराम मिळेल. गॅस आणि पचनाशी संबंधित समस्या. अनेकांना या गॅस आणि पचनाशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो.

तर गुळाच सेवन केल्याने, विशेषतः जेवण झाल्यानंतर जर आपण थोडासा गूळ खाल्ला तर त्याने आपलं पचन चांगलं होऊ शकतो. तसेच या समस्या देखील दूर होऊ शकते. दमा, दम्याचा त्रास होत असेल तर आपण गूळ खावा. गूळ खाल्ल्यामुळे आपल्याला दम्यापासून मुक्ती मिळेल. गुळामध्ये अँटी एलर्जी तत्व असतात, जे दम्याला आराम देतात.

तसेच शरीरातील तापमान नियंत्रित ठेवतात. आणि परिणामी दम्याचा त्रास कमी होऊ शकतो. श्वासासंबंधी त्रास, अनेक जणांना श्वासासंबंधित त्रास असतात. तर त्यावर देखील गुळ फायदेशीर होऊ शकतो. पाच ग्रॅम गूळ तितक्याच सरसोच्या तेलात मिसळून तो खावा.

पाच ग्रॅम गूळ तितक्याच म्हणजेच पाच मिली किंवा पाच ग्रॅम सरसोचे तेल घेऊन त्यामध्ये मिक्स करावा, आणि तो खावा. तर त्याने श्वासाच्या संबंधित ज्या समस्या आहेत त्या दूर होऊ शकतात. घसा बसणे, अनेकांना अनेकांचा जो जॉब असतो तो बोलण्याचा असतो.

उदाहरणार्थ शिक्षक, तर अशा लोकांना जर घसा बसला असेल तर या घसा बसल्यावर देखील गुळाने आराम पडतो. त्यासाठी आपणास असे करावे लागेल की शिजलेल्या भाताबरोबर आपण गुळाचं सेवन करायाचं. तुमचा घसा नक्की बरा होईल. कान दुखी, अनेकांना कान दुखीचा त्रास होत आहे, आणि त्यावर उपाय म्हणून आपल्याला गूळ वापरता येईल.

हा गूळ वापरताना आपल्याला तुपासोबत मिसळून खायचं आहे. तुपासोबत जर आपण गूळ मिसळून खाल्ल तर कान दुखी पासून आराम मिळू शकतो. सांधेदुखी, अनेकांना सांधेदुखीचा त्रास होत आहे. आणि त्यावरती गूळ हे अतिशय चांगले औषध आहे. एक ग्लास दुधासोबत जर आपण गूळ घेतला तर आपली हाडं मजबूत होऊ शकतात.

तसंच आल्यासोबत म्हणजेच अद्रक, या अद्रक सोबत जर आपण गूळाच सेवण केलं तरी देखील सांधेदुखीच्या त्रासावराती फायदा होऊ शकतो. सर्दी आणि खोकला, हिवाळ्यामध्ये तसेच पावसाळ्यात देखील सर्दी खोकल्यापासून अनेक लोक त्रस्त असतात. अशा लोकांसाठी गूळ खाणं हे खूपच फायद्याचा ठरु शकतं.

हिवाळ्यामध्ये अनेक लोक आपला गुळ खाताना दिसत असतील, त्यामुळे शरीरामध्ये उष्णता निर्माण होते आणि त्यामुळे सर्दी आणि खोकला लवकर बरा होतो. लठ्ठपणा किंवा वाढलेले वजन, आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत मध्ये वजन वाढणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. जर आपणही या वाढलेल्या वजनामुळे त्रस्त असाल, तर रोज गुळाचा चहा घ्यावा.

असा गुळाचा चहा घेतल्याने आपल्याला आपले वजन कमी होण्यास नक्कीच मदत मिळते. धातूंची झीज, विविध कारणांनी आपल्या शरीरातील धातूंची झीज होत असते. आणि ही झीज जर भरून निघाली नाही तर त्याचे अनेक दुष्परिणाम शरीरावर होऊ शकतात. ही झीज भरून काढण्याचं महत्त्वाचं कार्य गूळ करत असतो आणि म्हणूनच आपल्या आहारामध्ये आपण गुळाचा समावेश करावा.

मासिक पाळी, मासिक पाळीचे वेळी तिळगुळ आपण खायला पाहिजे. जर आपण तीळगुळाचे सेवन केलं तर स्त्रियांमध्ये मासिक पाळीच्या वेळी पोट दुखी जी असते तर तिचे प्रमाण कमी होऊ शकत. ज्यांना नियमित पाळी येत नसेल त्यांनी देखील गूळ खाणं फायदेशीर आहे.

गुळाच्या सेवनाने आपणास पाळी नियमित येऊ लागेल. तर असे होते गुळाचे तेरा औषधी उपयोग. पण एक गोष्ट लक्षात ठेवा गुळाच्या अति खाण्यामुळे मात्र आपलं रक्त दूषित होऊन अंगावरती कोड येण्याचा धोका असतो. आणि म्हणूनच ज्यांना त्वचेचे रोग असतील त्यांनी गुळाचं सेवन हे प्रमाणामध्ये करावं.

सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *