गुडघ्याची झीज होऊन गुडघे प्रचंड वेदना करत असतील तर करा घरगुती उपाय. वाढत्या वयासोबत सांधेदुखी वाढणे स्वाभाविक असते पण आजकाल हाडे ठिसूळ होऊन स्नायूंना मार लागल्यामुळे अगदी कोणत्याही वयोगटातील व्यक्तींना अशी गुडघेदुखी जाणवत आहे.
कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडे ठिसूळ होतात आणि संपूर्ण शरीराचे वजन पेलणारे सांधे विशेष करून गुडघ्याचे आणि घोट्याच्या सांद्याची प्रचंड प्रमाणात झीज होते. सांध्यांमधून कट कट असा आवाज येऊ लागतो आणि कालांतराने या सांध्या मधली हाडाची झीज होऊन सांध्यांची हालचाल करणे अवघड होऊन बसते.
गुडघ्यांची झीज होऊन सुरू झालेली अशी गुडघेदुखी कमी करण्यासाठी आज आपण असा एक घरगुती उपाय पाहणार आहोत. त्याच्या काही दिवसांच्या वापराने निश्चितच आराम वाटेल, पाहूया हा उपाय कसा बनवायचा. गुडघेदुखी कमी करण्यासाठी आपल्याला फक्त तीन वस्तू आवश्यक आहेत.
त्यापैकी पहिला घटक म्हणजे अश्वगंधा पावडर, हाडांचा पोकळ पणा भरून काढण्यासाठी आणि हाडे मजबूत बनवण्यासाठी अश्वगंधा अत्यंत उपयुक्त आयुर्वेदिक औषधे आहे. अगदी कोणते आयुर्वेदिक मेडिकल शॉप मध्ये अश्वगंधा पावडर विकत मिळते आपण साधारण एक चमचा एवढे अश्वगंधा पावडर घ्यायचे आहे.
यानंतर चा दुसरा घटक म्हणजे शतावरी पावडर, शतावरी अनेक आजारांवर औषध म्हणून वापरली जाते. शरीरातील कॅल्शिअम ची कमतरता भरून काढण्यासाठी आणि शरीरातील स्नायूंना बलवान बनवण्यासाठी शतावरी फार उपयुक्त असते. आपण एक चमचा शतावरी पावडर घ्यायचे आहे.
यानंतर चा शेवटचा घटक म्हणजे डिंक.डिंक कॅल्शियम आणि आयर्न चा मुबलक स्रोत असतो. सांध्यांची झीज झाली असेल किंवा सांध्यांमधील वंगण कमी झाले असेल तर डिंकाचे सेवन करणे फायद्याचे असते. डिंक गायीच्या तुपामध्ये तळून घेऊन त्याची बारीक अशी पावडर बनवायची आहे. साधारण 1 चमचा डिंकाचे पावडर यात घालायची आहे.
आता व्यवस्थित मिक्स करायचे आहे, अनेक व्यक्तींना वाढत्या वयासोबत आणि विशेष करून महिलांना त्यांच्या रजोनिवृत्तीनंतर हाडांचे दुखणे सुरू होते. अशावेळी हा उपाय उत्तम कार्य करतो आता आपल्याला आवश्यक आहे एक ग्लास कोमट पाणी.
आपण तयार केलेल्या मिश्रणापैकी पैकी साधारण 1 चमचा तेवढे मिश्रण या पाण्यामध्ये टाकायचे आणि व्यवस्थितपणे मिक्स करायचे आहे. हे पाणी दररोज सकाळी उपाशीपोटी प्यायचे आहे. तुमची गुडघेदुखी किती जुनाट आहे त्यानुसार हा उपाय करायचा आहे.
गुडघेदुखी फार जुनी नसेल किंवा सांध्यामधून कट कट आवाज येऊ लागला असेल तर 21 दिवसाच्या आत या उपायाने सांध्यांचे दुखणे नष्ट होते. असा हा अतिशय सोपा परंतु अतिशय गुणकारी असा घरगुती उपाय तुम्ही आवश्य करा आणि गरजवंतांना हा उपाय सांगा.
सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.