गोत्र म्हणजे काय ? ।। तुम्हाला तुमचे गोत्र माहित आहेका? ।। प्रवर म्हणजे काय? महत्वाची माहिती जाणून घ्या !

कला प्रादेशिक

आपल गोत्र काय आहे: आपण पूजा करतो, आणि पूजा करताना बऱ्याचदा अस होत की, भडजी आपल्याला एखादा मंत्र म्हणतात, ‘मामा आत्मने श्रुति-स्मृति-पुराणोक्त फलप्राप्तम् अस्माकमने’ अस म्हणल्या नंतर तुम्हाला तुमचं गोत्र काय ? अस विचारतात.

तेव्हा बऱ्याचदा अस होत की आपल्याला माहीत नसतं त्यामुळे आपण एकमेकांकडे पाहायला लागतो. कारण, खूपदा तरी आपल्याला आपल गोत्र काय आहे हे माहीत नसत. तर गोत्र म्हणजे काय, तर पूर्वजांपैकी कुणीतरी एक पुरुष अस आपण कधीतरी म्हणून जातो.

पण, तस नाहीये. गोत्र ही वैदिक धर्माने दिलेल आपल्याला एक वरदान आहे. जन्म, वंश शास्त्रीय दृष्ट्या अत्यंत सूक्ष्म स्थग्यती मानव शाखा आहे. गोत्र हे एका पुरुषाच्या पूर्वजांपासून सुरू झालेल्या आणि अखंडितपणे चालू असलेल्या कुळाच्या उगमाचा नाव आहे.

“अपत्यम् पौत्र पहुती गोत्रम्”असं म्हटलं गेलय. म्हणजे मुलाच्या मुलापासून सुरू झालेल्या वंशावळीचा उगम. गोत्र हे बहुदा ऋषींची नाव असतात. बहुधायंन सूत्रांनुसार, अगस्थ्य, काश्यप, गौतम, जमदग्नी, भारद्वाज, वसिष्ठ, आणि विश्वामित्र या आठ ऋषी पासून प्राथमिक गोत्र तयार होतात.

तशी गोत्रांची संख्या अगणित आहे. तरी धर्माना त्याची व्यवस्था सुलभ व्हावी म्हणून त्याची विभागणी पन्नास गणांनमध्ये केलेली आहे. त्या त्या ऋषींच्या नावांना गोत्र असे म्हटले आहे, आणि एकूणच जी गोत्र संख्या आहे ती आठ आहे. परंतु मित्तल, अगरवाल ही सुद्धा गोत्र आहेत, पण ती मानली जात नाहीत.

आपण जी मानतो ती प्रमुख आठ, विश्वामित्र, जमदाग्नी, भारद्वाज, गौतम, आत्री, वसिष्ठ, काश्यप, आणि अगस्ती. या गोत्रांचे चार उपविभाग आहेत. उपविभाग असे आहेत, उपमन्यू, कुंदिन, पाराशर, आणि वशिष्ठ.या चारांनमधे पुन्हा उपविभाग आहेत, त्यांना गोत्र म्हणतात. म्हणजे वर्गीकरण प्रथम गणात, नंतर पक्षात, नंतर गोत्रात होते.

प्रवर म्हणजे काय?: तर या गोत्रांची संख्या अगणित असली तरी धर्माने त्यांची व्यवस्था सुलभ व्हावी म्हणून त्यांची विभागणी पन्नास गणांनमध्ये केली आहे. त्या प्रत्येक गोत्रांना प्रवर्तक ऋषी असतात. काही गोत्रांना एक, काही गोत्रांना दोन, काही गोत्रांना तीन ते पाच पर्यंत प्रवर्तक असतात.

आणि प्रवर्तक ऋषी गणांना प्रवर असे म्हणतात. बऱ्याच समाजामध्ये सहप्रवाह, सहप्रवर, सगोत्र विवाह वर्ज मानला जातो. जर तुम्हाला गोत्र माहित नसेल, तर हे गोत्र तुम्हाला तुमच्या जुन्या लोकांकडून कळतं किंवा जुन्या भडजी कडून, वैगरे कळत. परंतु आपल्याला जर हे गोत्र माहीत नसेल त्यावेळेस या सर्व ज्यांना माहित नाही

त्या सर्वांच गोत्र हे काश्यप गोत्र आहे अस धरण्यात आल आहे. अस संगण्यामागे काय कारण आहे हे माहीत नाही. परंतु, काश्यप ऋषींनी अनेक विवाह केले होते. त्यामुळे, त्यांना अनेक मुले झाली. आणि ही मुले कोठे ना कोठे तरी काश्यप गोत्राशी जोडली गेली होती.

याबाबत जो प्राचीन ग्रंथ आहे “हेमाद्रीचंद्रिका” चंद्रिकेत हे सांगितले गेलं आहे की, जर गोत्र ज्ञात नसेल तर आपले गोत्र काश्यप गोत्र मानावे. बऱ्याच ठिकाणी मातृ-वंशीय, पितृ-वंशीय, वगैरे गोत्र पाहिलं जातं, परंतु लक्षात ठेवा आपल्या पूर्वजांकड, आपल्या जुन्या भडजी कडे, आपल्या नावाचा गोत्र असू शकत.

किंवा, कधी तुम्ही कुठे काशी, किंवा त्रंबकला गेले तर तुम्ही तुमचं नाव सांगून सुद्धा तुम्हाला ते लोक गोत्र देतात. काही विशिष्ट चिन्हांनी गोत्र ठरवला जातो. जसं की ते पशुपक्षी असू शकतात. सिंह, मकर, सूर्य, मासा, पिंपळ, बाभळीचे झाड, यांचा समावेश असतो. हीच परंपरा आर्यांमधे चालू झालेली आहे.

सगोत्र मुलगा, मुलगी असेल, तर आपण विवाह करत नाही. कारण ते एक प्रकारे भाऊ-बहीण आहेत. ते पती-पत्नी होऊ शकत नाही. असं म्हटलं जातं. आणि म्हणून यामागे कारण एकच असावं जर (blood) एकसारखं जर असेल तर व्यंग निर्माण होऊ शकत.

तर अशी ही गोत्रा बद्दलची माहीती. तुम्हाला गोत्र माहीत असेल तर ठीक, नाहीतर जुन्या पंचांगामध्ये तुमच आडनाव जरी टाकलं तरी तुमचं गोत्र नक्की कळेल. हल्ली इंटरनेटच्या माध्यमातून गुगल तर आहेच त्यातून सुद्धा तुम्ही सहगोत्राची माहिती घेवू शकता. आणि जर तुम्हाला माहित नसेल तर काश्यप गोत्र तुम्ही नक्कीच लावू शकता.

सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *