नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.
“श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ” आपल्यावर किंवा आपल्या कुटुंबावर जेव्हा जेव्हा एखादं मोठं संकट येणार असत,तेव्हा आपली वास्तू आपलं घर एक विशेष प्रकारचे संकेत देत असे म्हणतात. जर तुम्हाला तुमच्या घरात अस्वस्थ वाटत असेल एक प्रकारची अस्वस्थता जाणवत असेल तर लक्षात घ्या की तुमची वास्तु येणाऱ्या संकटाला विषयी काही सांगु पहात आहे.
असा त्याचा अर्थ असू शकतो. आपण अपरिचित असलेल्या संकटापासून आपलं आणि आपल्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी आपण एक प्राचीन उपाय करू शकतो. हजारो वर्षांपासून हा उपाय केला जात आहे. आपल्याला यासाठी फक्त एकच करायचा आहे की आपल्या देवघरासमोर आपण एक नंदादीप प्रज्वलित करायचा आहे.
नंदादीप म्हणजे 24 तास प्रज्वलित राहणारा दिवा. नंदादीप कुठे लावावा कोणत्या दिशेला लावावा, त्याची वाट कोणत्या दिशेला असावी यासंबंधी ची संपूर्ण माहिती आज आपण करून घेणार आहोत. आधी सांगितल्याप्रमाणे नंदादीप म्हणजे अखंड जळणारा दिवा, अगदी चोवीस तास चालणारा दिवा.
हा दिवा लावताना आपण तिळाच्या तेलाचा वापर करायचा आहे. हिंदू धर्मशास्त्रात या तिळाच्या तेलाचे फार मोठे महत्त्व सांगितले आहे. अशा तिळाच्या तेलाचा नंदादीप आपण आपल्या देवघरासमोर लावायचा आहे. हा दिवा लावल्याबरोबर तुम्हाला लगेच दिसून येईल की तुमच्या घरातील अस्वस्थता कमी झाली आहे, घरात शांतता प्रस्थापित होत आहे.
अनेकांना याची प्रचिती देखील आलेली आहे. जर वाऱ्याने किंवा दुसऱ्या कोणत्या कारणाने दिवा विझला तर मनात कोणतीही शंका आणू नये. पुन्हा दिवा प्रज्वलित करावा. त्याला मनोभावे नमस्कार करावा. दिव्याला नमस्कार का करायचा? कारण दिवा म्हणजे एक प्रकारचे ईश्वरी रूप असते.
म्हणून अशा या दिव्याला आपण नमस्कार करावा.दिवा लावण्यापूर्वी दिव्याखाली काही ना काही तरी आसन नक्की ठेवा. जसा आपण देवाला वस्त्र किंवा फुलांच्या पाकळ्यांवर ठेवतो, त्याच प्रमाणे आपण दिव्याला देखील काहीतरी आसण ठेवून त्यावर दिवा लावायचा आहे.
तसच आपण जो नंदादीप लावत आहोत त्याची वात कोणत्या दिशेला असावे ते आता बघूया. उत्तर किंवा पूर्व दिशा यापैकी कोणत्याही दिशेला आपण दिव्याची वात करू शकता. कारण या दोन्ही दिशा शुभ मानल्या जातात असं म्हणतात की या दिशेला वात लावल्याने त्या घरातील लोकांना सुखप्राप्ती होते.
तसेच दीर्घायुष्याची सुद्धा प्राप्ती होते. जर आपल्याला वाटलं की घरात खूपच मोठ्या प्रमाणावर निगेटिव नकारात्मक ऊर्जा आहे, तर अशा वेळी आपण आपल्या घरातील चारही दिशांना चार दिवे प्रज्वलित करावे, जे जे काही दोष आहेत ते सर्व निघून जातील. आणि घराच्या वास्तूमध्ये सुख समृद्धी वास करू लागेल.
ज्या घरात असा दिवा लावला जातो त्या घरात कशाचीही कमतरता कधी भासत नाही. अशा दिव्यातून काही सात्विक लहरी बाहेर पडत असतात, ज्या नकारात्मक शक्तींना घराबाहेरच ठेवतात. तर मंडळी तुम्हालाही तुमच्या घरामध्ये अस्वस्थता जाणवत असेल तर एक नंदादीप नक्कीच प्रज्वलित करावा.
सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.