घरात इथे काढा 1 स्वस्तिक, पैसा इतका येईल की पाहून थक्क व्हाल ।। शत्रुपीडा, आजारपण, वास्थुदोष, वाईट नजर या अनेकांवर हा उपाय नक्की करून पहा. ।। सविस्तर माहिती जाणून घ्या या लेखात!

कला शिक्षण

स्वस्तिक चिन्ह हे मंगलतेच प्रतिक आहे. जर आपण घरात किंवा ऑफिसमध्ये उद्योगधंद्याच्या ठिकाणी योग्य दिशेला आणि योग्य स्थळी जर हे चिन्ह काढलं रेखाटलं, तर आपल्याला अपेक्षित असलेला लाभ नक्की मिळतो. जर तुमच्या जीवनात खूप सारी दुःख आहेत, संकट आहेत, किंवा धनप्राप्ती होत नाही.

तुमच्या घरात गरिबी आहे. घरामध्ये क्लेश आहेत, घरामध्ये सुख शांती नाहीये. अशा अनेक समस्यासाठी योग्य प्रकारे काढलेलं स्वस्तिक चिन्ह हे या सर्व समस्यांना नक्की दूर करतं. तुम्हाला माहीत असेल की कोणताही सण उत्सवाच्या वेळी किंवा कोणतेही मंगल कार्य प्रारंभ करताना आपण स्वस्तिक काढतो.

आणि स्वस्तिक चिन्ह यांची पूजा केली जाते. असे म्हणतात की, स्वस्तिक चिन्हची पूजा केल्याने कोणत्याही कार्यक्रमाचे मंगल कार्य आपण करणार आहोत ते कार्य सफल होतं. हिंदू धर्मशास्त्रानुसार स्वस्तिक चिन्ह हे विघ्नहर्ता श्री गणेश आणि धनाची देवता माता लक्ष्मी यांचं प्रतीक आहे.

म्हणूनच या ठिकाणी हे स्वस्तिक असेल त्या ठिकाणची नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते. त्या ठिकाणी सकारात्मक ऊर्जा वाहू लागते विघ्नहर्ता गणेश यांच्या कृपेने त्या ठिकाणची सर्व संकटे दूर होतात आणि माता लक्ष्मी त्या घरामध्ये सुख-समृद्धी निर्माण करते. या स्वस्तिक चे महत्व खूप मोठा आहे.

या स्वस्तिक मध्ये असणाऱ्या या ज्या चार रेषा आहेत, त्या रेषा चार दिशांचं प्रतिनिधित्व करतात. पूर्व दिशा हि अग्नी देवाची दिशा, पश्चिम दिशा इंद्र देवाची दिशा, उत्तर दिशेला वरून देव, दक्षिण दिशा ही सोम देवाची दिशा आहे. या चारही देवतांचे प्रतीक म्हणजे या चार रेषा आहेत.

या चार रेषा चार वेदांचे प्रतीक आहेत ऋग्वेद, यजुरर्वेद,अथर्ववेद,आणि सामवेद. हे चार वेद म्हणजे या चार रेषा आहेत. या सृष्टीची निर्मीती ज्या ब्रह्मदेवाने केली त्या ब्रह्मदेवाच्या मुखाचे प्रतीक म्हणजे स्वस्तिक मधील या चार रेषा. या चार रेषा चार पुरुषार्थ, चार आश्रम, आणि चार देव ब्रम्हा, विष्णू ,महेश, आणि श्री गणेश यांचे प्रतीक आहेत.

या स्वस्तिकाचा मध्यबिंदू आहे. हा भगवान श्रीहरी श्री विष्णूची नाभी दर्शवतो की, ज्या नाभीतूनच भगवान ब्रह्मदे उत्पन्न झाले होते प्रकट झाले होते. आणि त्या ब्रह्मदेवांनी च्या संपूर्ण सृष्टीची निर्मिती केली आहे. केवळ हिंदु धर्मच नव्हे तर बौद्ध, जैन ,हडप्पा संस्कृती ,तसेच इतर अनेक धर्मांनी सुद्धा या चिन्हाचा स्वीकार केलेला आहे.

अगदी प्राचीन काळात पाहिलं तर प्राचीन ग्रीक संस्कृती ने सुद्धा स्वस्तिक चिन्ह अंगिकारलेल दिसून येतं. थोडक्यात काय तर हे चिन्ह शौर्य, विजय,प्रेम, रोमांस, साहस इत्यादी.अनेक गुणांनी परिपूर्ण आहे हे चिन्ह ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी शारीरिक आणि मानसिक स्वरूपाचे कोणतेही रोग उत्पन्न होत नाहीत.

स्वस्तिक च महात्म्य तुम्हाला समजल असेल आता आपण पाहू स्वस्तिक कोणत्या ठिकाणी काढावे. तुमच्या जीवनात जर मोठ्या प्रमाणात शत्रू पीडा आसेल, तुमचा शत्रू जर तुम्हाला त्रास देत असतील, तर अशा वेळी आपल्या मुख्य दरवाजावर आपण हळदीने स्वस्तिक अवश्य काढा. आणि स्वस्तिक ची पूजा करा. तुम्हाला शत्रुपीडा पासून मुक्ती मिळेल.

तुमची शेजारीपाजारी किंवा तुमच्या ऑफिसमध्ये तुमचे मित्र जर तुम्हाला खूप त्रास देत असतील, तर हा उपाय अत्यंत चांगला आहे. तुमच्या घरात वास्तुदोष असतील कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष असेल तर आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर साडे सहा इंचांचा स्वस्तिक आपण बनवाव किंवा बाजारामध्ये हे स्वस्तिक मिळतात.

साडे सहा इंचाचा स्वस्तिक आपण लावावा व अनेक प्रकारचे वास्तुदोष याने दूर होतात. तुमच्या घरात जर लोक वारंवार आजारी पडत असतील, घरातून जर आजारपण हटत नसेल तर अशा वेळी आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर आपण स्वस्तिक चिन्ह लावाव. हे स्वस्तिक आपण हळदीनेही काढू शकता किंवा कुंकवाने ही काढू शकता.

आजारी व्यक्ती लवकर बऱ्या होतात तुमच्या घरापासून आजारपण दूर राहत.तुमच्या जीवनात जर खूप मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम चालू असतील अनेक समस्या आणि अडचणी येत असतील तर अशा वेळी बाजारात मिळणारं पंचधातूंच स्वस्तिक आपण प्राणप्रतिष्ठा करून आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या चौकटीवर लावाव.

खूप लवकर तुम्हाला तुमच्या जीवनातील समस्यापासून मुक्तता नक्की मिळेल.ज्यांना जीवनात धनप्राप्ती करायचे आहे. ज्यांच्या घरात गरिबी आहे. त्यांच्या घरात अठरा विश्व दारिद्र्य आहे, दरिद्रता आहे. अशा लोकांनी आपल्या घराचा उंबरठ्याच्या दोन्ही बाजूंवर एकच स्वस्तिक काढावे.

हे स्वस्तिक आपण कुंकवाने काढायचा आहे किंवा लाल रंगाच्या कोणत्याही वस्तू ने काढायचे आहे, तर असे हे लाल रंगाचा स्वस्तिक काढून त्यावर ती एक एक मूठभर तांदूळ आपण ठेवायचे आहे. तांदळाची धेरी करायचे आहे तांदळाला अक्षदा असे म्हणतात. आणि त्यानंतर या तांदळाच्या ढिगावर आपण एक सुपारी कि जी लाल रंगाच्या धाग्याने बांधले आहे.

सुपारी भोवती लाल रंगाचा धागा गुंढाळला आहे आणि अशी सुपारी आपण या तांदळाच्या डेरीवर ठेवायचे. त्याचे आपण दररोज पूजा करायची आहे. हा उपाय आपल्या जीवनात धनप्राप्तीचे नवीन योग निर्माण करतो. मोठ्या प्रमाणात धनलाभ येतो पैसा येण्यासाठी किंवा पैसा टिकण्यासाठी हा उपाय अत्यांत उपायकारक आहे.

आणखी एक उपाय माता लक्ष्मी प्रसन्न करण्यासाठी, एक चांदीचा स्वस्तिक आपण आपल्या घराच्या पूर्व दिशेला असणाऱ्या भिंतीवर लावा. चांदीचा स्वस्तिक पूर्व दिशेला असणाऱ्या भिंतीवर लावा आणि स्वस्तिक वर नवरत्न लावण्यास विसरु नका. हा उपाय माता लक्ष्मीस शीघ्र प्रसन्न करणारा उपाय आहे.

अनेक जणांच्या मुख्य दरवाजासमोर एखादं झाड किंवा एखादा मोठा खांब येतो अशा वेळी यांना द्वारेवेध असं म्हणतात आणि त्यामुळे सुद्धा घरात अनेक अडचणी निर्माण होतात. अशा वेळी आपण आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर दररोज एक स्वस्तिक नक्की रेखाटा. हे स्वस्तिक लाल रंगाच असावा अशा स्वस्तिक मुळे द्वारभेद नष्ट होतो.

घरात सुख समृद्धी नांदू लागते. जे लोक व्यापार करतात अशा लोकांनी आपल्या उद्योगधंद्याच्या ठिकाणी उत्तर दिशेला असणाऱ्या भिंतीवर हळदीने स्वस्तिक बनवावा. अगदी दररोज नित्य नेमाने हळदीने स्वस्तिक बनवावं. आणि त्याची पूजा करावी असं हळदीने बनवलेल्या स्वस्तिक आपल्या उद्योग व्यवसायात मोठ्या प्रमाणात वृद्धी करतात.

उद्योग-व्यवसायातून प्रचंड नफा आपल्याला प्राप्त करून देत. स्वस्तिक चा वापर अजून एका ठिकाणी अत्यंत चांगल्या प्रकारे करता येतो. आपल्या देव घराच्या समोर आपण एक स्वस्तिक बनवावं. हे स्वस्तिक लाल रंगाचा किंवा पिवळ्या रंगाचा चालेल. कुंकवाने किंवा हळदीने हे स्वस्तिक रेखाटव.

आणि या स्वस्तीक च्या मध्यभागी जो मध्यबिंदू आहे त्यावर ती आपण ज्या देवतेस प्रसन्न करू इच्छिता, त्या देवतेची मूर्ती ठेवावी. असं केल्याने ती देवता खूप लवकर प्रसन्न होते. तसेच आपण या ठिकाणी आपल्या इष्ट देवतेची मूर्ती सुद्धा घेऊ शकता. की ज्यामुळे आपले इष्ट देव किंवा आपली जी कुलदेवता आहे ते खूप लवकर प्रसन्न होतील.

तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा आहे मनोकामना आहे आणि ती जर पूर्ण होत नसेल तर, आपण आपल्या देवघरासमोर एक स्वस्तिक अवश्य रेखाटा हे स्वस्तिक कुंकूवाने आपण रेखाटायच आहे. आणि या स्वस्तिक च्या मध्यभागी माध्यबिंदू वर आपण दिवा प्रज्वलित करायांचा आहे हा दिवा तुपाचा असावा देशी गाईच्या तुपाचा असावा.

त्यानंतर आपल्या दिव्या समोर नतमस्तक होऊन आपल्या जीवनातील जी काही इच्छा आहे. ती पूर्ण करण्याची विनंती करा. ही मनोकामना ही इच्छा खूप लवकर पूर्ण होते. जोपर्यंत ती पूर्ण होत नाही तोपर्यंत अशाच प्रकारे आपण हा उपाय करत जा. ज्या लोकांना रात्री व्यवस्थित झोप लागत नाही किंवा जे लोक सतत बैचैन असतात व जीवनामध्ये अनेक समस्या आहेत आणि रात्री झोप लागत नाहीये. अनिद्रा आहे.

तर अशा वेळी अशा लोकांनी आपली जी तर्जनी आहे म्हणजे आपल्या अंगठ्याजवळचे बोट आहे त्या बोटावर एक स्वस्तिक बनवा आणि त्यानंतर आपण झोपी जा. आपल्याला व्यवस्थित झोप लागेल अगदी स्वतः तुम्ही हा उपाय करून पहा खूप लवकर झोप लागते. झोपी संबंधीच्या सर्व तक्रारी दूर होतात.

मनातील बेचैनी जी आहे ती सुद्धा दूर होते. ज्या लोकांच्या जीवनात पितृदोष आहे. ज्या लोकांमध्ये पित्राची कृपा बरसलेली नाहीये किंवा पितृ अप्रसन्न आहे. आपले पूर्वज प्रसन्न व्हावे त्यासाठी घरामध्ये घराची जी दक्षिण दिशा आहे या दक्षिण दिशेला शेणाने एक स्वस्तिक चिन्ह बनवा आणि त्याची पूजा करा.

असं केल्याने आपले पितृ प्रसन्न होतात आणि त्यांच्या कृपेने घरात सुख आणि समृद्धी नांदू लागते. घरामध्ये शांतता निर्माण होते जर घरामध्ये मोठ्या प्रमाणात व अशांती असेल. वादविवाद होत असतील घरातील लोक एकमेकांशी सतत भांडत असतील, घरातील लोकांमध्येच प्रेम भाव राहिलेला नसेल.

तर अशा वेळी आपल्या घराच्या ईशान्य कोपरा, ईशान्य कोपरा म्हणजे कोणता उत्तर आणि पूर्व या मधील कोपऱ्यात जाऊन उत्तरेकडच्या भिंतीवर आपण एक हळदीने स्वस्तिक बनवा आणि स्वस्तिक ची पूजा करा. असं केल्याने आपल्या घरात सुख शांती निर्माण होते. घरातील वाद-विवाद कमी होतात. वाद-विवाद नष्ट होतात.

तुम्ही कोणत्याही शुभकार्याच्या वेळी सुरू करता तेव्हा त्या शुभकार्याच्या प्रसंगी एक लाल रंगाच स्वस्तिक आवश्यक काढत जा. आणि हे स्वस्तिक काढण्यासाठी तुम्ही केशर चा किंवा कुंकू चा वापर करू शकता. मंगल कार्यात नक्की सफलता आपल्याला प्राप्त होईल.

स्वस्तिक संबंधी अजून एक महत्वाची गोष्ट जर तुम्हाला कोणाचीही नजर लागली असेल आणि ही नजर कोणत्याही उपायाने उतरत नसेल तर होळीच्या रात्री जेव्हा तुम्ही होलिका दहन कराल. हे होलिका दहन केल्यानंतर एक भूर्जपात्र घ्या त्याला भोजपत्र असं ही म्हणतात.

भूर्जपत्र घ्या आणि भूर्जपत्रावर कोळशाचा वापर करून एक स्वस्तिक रेखाटा आणि असं हे भूर्जपत्र आपण आपल्या गळ्यात किंवा आपल्या हातामध्ये धारण करा. आपल्या गळ्यात तुम्ही ते बांधू शकतात किंवा त्या पत्राची घडी करून ती तुम्ही तुमच्या हातावर सुद्धा दोराच्या साह्याने बांधू शकता.

कोणत्याही प्रकारची बाधा असेल भूतप्रेत असेल किंवा कोणतीही काळी जादू असेल ती या प्रयोगाने दूर होते. जर तुमच्या घराला किंवा उद्योगव्यवसायाच्या ठिकाणी नजर लागली असेल तर अशी ही वाईट नजर उतरवण्यासाठी आपण आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या भिंतीवर होळीच्या रात्री कोळशाने एक स्वस्तिक बनवा.

कुठे बनवायचा आहे जो आपल्या घरात किंवा उद्योग व्यवसायाचा मुख्य दरवाजा आहे त्या मुख्य दरवाजाच्या भिंतीवर किंवा त्या दरवाज्यावरच आपण पैशाने एक स्वस्तिक बनवा. आपल्या घराला किंवा आपल्या उद्योगधंद्याला लागलेली वाईट नजर सुद्धा यामुळे दूर होते.

सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *