नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.
“श्री स्वामी समर्थ” घरात वाईट शब्द बोलल्याने काय घडते?यावर स्वामी समर्थांनी दिलेले उत्तर यावर स्वामींचा संदेश काय आहे? ते आज आपण पाहणार आहोत. आपलं घर हे आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींनी मिळून भरलेले असते.सर्व सदस्यांनी मिळून आपलं घर भरलेलं असत.
घरातील सर्व लोक सर्वांशी गोडीगुलाबीने मिळून मिसळून एकमेकांना सांभाळून राहत असतात. घरातील सर्व व्यक्तींची सर्वांबद्दलची सर्व माहिती सर्व लोकांना माहिती असते.सर्वांबद्दल प्रेम,आपुलकी असते.पण घर म्हटलं की भांड्याला भांड हे लागतेच .
कधी छोट्या गोष्टीवर खटके उडतात भांडण वाद विवादानंतर त्याच खटल्याचे मोठ्या भांडणात रूपांतर होते. एकमेकांची मतं एकमेकांना पटत नाहीत. कधीकधी वाद विकोपाला जातात,नंतर एकमेकांना वाईट बोलले जाते. अपशब्द बोलले जातात.कधी कधी तर इतका प्रचंड राग आलेला असतो की आपल्याच व्यक्तींना आपण रागाच्या भरात काहीही बोलून जातो.
वाईट शब्द बोलतो,अपशब्द बोलतो,कधी कधी त्या रागाच्या मागे,त्या भांडणाच्या मागे आपला काही वाईट हेतू नसतो. पण आपण आपल्या कामात इतके व्यस्त असल्यामुळे आर्थिक परिस्थितीमुळे अगदी आपण वीटून गेलेलो असतो व आपला हा त्रास, हेच दुःख संतापलेल आणि रागाने आपल्या तोंडातून अपशब्द बाहेर पडतात.
आपण कधी कधी नकळत भयंकर बोलून जातो आणि आपल्याच घरातील व्यक्तींचे अहीत व्हावे असे बोलत राहतो. आपण सहज म्हणून जातो की, कधीच तुझं चांगलं होणार नाही, कधीच तुला सुख मिळणार नाही,तू असाच राहशील,तू अन्न अन्न करशील पण तुला खायला मिळणार नाही,तुझे काम कधीच होणार नाही,तू नेहमी दुःखी राहशील,पैसा पैसा नको करुस.
आज पैसा आहे तर उद्या नाही.एक ना अनेक कितीतरी वेळा एकमेकांना अपशब्द,शिव्याशाप देतो. परंतु आपल्याला हे माहिती आहे का? आपले घर जी वास्तू आहे त्या वास्तूमध्ये वास्तुपुरुष हे वास करत असतात आणि दिवसातून एकदा ते ‘ तथास्तु ‘ म्हणत असतात.
जर आपण त्या वेळी घरातील सदस्याला वाईट बोलत असलो आणि त्या गोष्टीला वास्तुपुरुष ‘तथास्तु‘ म्हणत असतात, सारखे जर आपण अपशब्द बोललो तर त्या सर्व बाबींची फळे म्हणजे आपण बोललेल्या वाईट शब्दाचे परिणाम असतात.
आपल्या समोर सर्व काही येऊ लागते. घरातील सदस्य आजारी पडायला लागतात.उत्पन्न कमी होते. आर्थिक समस्या निर्माण होतात. घरात दारिद्र्य प्रवेश करते. समाजात आपल्याला मान सन्मान कमी होतो. कधी कधी घरात आपल्याला वंश पुढे होते. आपत्य होत नाही, मुलामुलींचे लग्न होत नाही.
घरात कुरकुरी राहते,लग्नात अडथळे निर्माण होतात.हळू हळू आपली परिस्तिथी बिकट होत जाते. आपल्याला असे का होते ते समजतच नाही. आपण हा विचार करत असतो हे चक्र उलटे का फिरले? सगळं कसं व्यवस्थित सुरू होतं,हे सर्व कस बदलायच.
आपल्याला वाटत असतं की आपल्यावर भगवंताचा कोप झाला आहे किंवा कोणीतरी आपल्यावर करणी केली आहे, काळी जादू केली आहे, कोणाल तरी आपले चांगले झालेले सहन झाले नाही, म्हणून असं होत आहे. पण या सर्व गोष्टींचे मूळ कारण आपण स्वतः आहोत.
आपल्या वाईट बोलण्याने आपल्या लक्षात येत नाही.आपण स्वतः हे संकट आपल्यावर ओढवून घेतलेल असतं.आपण जे बोलतो ते जे मागतो ते आपल्याला मिळत असतं. आपला वास्तुपुरुष आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी ‘तथास्तु’ म्हणत असतात, पण आपण जर त्या वेळी वाईट बोलत असू तर आपल्याबरोबर वाईटच होते जर आपण सगळ्यांशी चांगले वागत असू तर आपल्याबरोबर सुद्धा सगळ चांगलं होत.
आपल्या घरात सुख-समृद्धी घरातील व्यक्ती आनंदी राहतात.घर मिळून मिसळून शांत प्रिय वातावरणात सकारात्मकतेने राहत. तर नेहमी आपण बोलताना सकारात्मक आणि चांगलं बोललं पाहिजे. घरांमध्ये सकारात्मक वातावरण ठेवले पाहिजे तरी ही गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. “श्री स्वामी समर्थ”
सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.