शिवलिंग यालाच महादेवाची पिंड असंही म्हणतात. अनेक लोक आपल्या देवघरात आणि तुळशीवृंदावनात या शिवलिंगाची पूजा करताना दिसून येतात. शिवलिंगाची पूजा घरात करणे शुभ असते की अशुभ असतं ? यामुळे महादेवांचा प्रकोप तर ओढवत नाही ना?
या शिवलिंगा बाबतचे हिंदू धर्मशास्त्रात नक्की कोणते नियम सांगितले आहेत, याबाबत आज आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. हिंदू धर्मशास्त्र अस मानत की ज्या व्यक्तींच्या जीवनात मोठ-मोठी संकटे आहेत, मोठे आजार आहेत, घरात अशांती आहे अशा लोकांनी शिवलिंगाची दररोज विधिवत पुजा अवश्य करावी.
मोठ-मोठे आजार दूर होतात, घरात सुख शांती निर्माण होते, भाग्य प्रबळ बनत. मात्र शिवलिंगाची पूजा करताना काही गोष्टींची विशेष काळजी मात्र घ्यावी लागते. अन्यथा याच्या विपरीत अत्यंत मोठे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात. खरंतर शिवलिंग हे शिवाचे एक रूप आहे.
शिवपूरणात असा म्हणलेल आहे की शिवलिंग हे अत्यंत संवेदनशील असत आणि म्हणूनच त्याच्या थोड्याशा ही पूजेने आपल्याला मोठी शुभ फळे प्राप्त होतात. मात्र शिवलिंग घरात ठेवताना काही गोष्टींची काळजी आपण अवश्य घ्या. जर या गोष्टींकडे आपण लक्ष पुरवलं तर शिवकृपा नक्की बरसते.
सुख समृद्धी आपल्या जीवनात नक्की निर्माण करता येते. जर तुम्हाला शिवलिंगाची पूजा दाररोज करणे शक्य नसेल, तर कमीत कमी सोमवारच्या दिवशी तरी आपण शिवलिंगाची मनोभावे पूजा करावी. जर तुमच्या घरात शिवलिंग आहे, महादेवाची पिंड आहे तर किमान सोमवारच्या दिवशी आपण शिवलिंगाची पूजा करणे फार महत्त्वाचं असतं.
आणि जर तुम्हाला अशा प्रकारे पूजा करणे शक्य होत नसेल, तर आपण चुकूनही आपल्या देवघरामध्ये किंवा आपल्या घरात अन्यत्र कुठेही शिवलिंगाची स्थापना करू नका. जेव्हा जेव्हा तुम्ही शिवलिंग खरेदी करून तुमच्या घरात आणाल तर त्याची प्राणप्रतिष्ठा करू नये. शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा केवळ मंदिरात केली जाते, घरामध्ये केली जात नाही.
आपण घरात शिवलिंगाचा अभिषेक करू शकता. घरात ठेवण्यासाठी नर्मदा नदीतून जे दगड बाहेर पडतात त्याला नर्मदेश्वर शिवलिंग म्हणतात. असे शिवलिंग अत्युत्तम मानल जातो, हे अत्यंत शुभकारी सुद्धा असत. घरामध्ये शिवलिंग ठेवताना ते नेहमी अंगठ्या पेक्षा मोठ्या आकाराच्या नसावं.
शिवलिंगाचा आकार हा नेहमी आपल्या अंगठ्याच्या लांबीपेक्षा जास्त नसावा. असं म्हणतात की जी मोठ मोठे शिवलिंग असता त्यांची स्थापना जर आपण आपल्या घरात केली, तर त्याचे खूप सारे नियम त्यांचे पालन करावे लागत. आणि जर हे पालन झालं नाही तर आपल्या घरावर मोठी संकटे येतात. घरामध्ये अशांती पसरते अशुभ फळे मिळू लागतात.
शिव पुराणानुसार शिवलिंगाची दररोज सकाळ संध्याकाळ पूजा करणं आवश्यक असतं. नियमित रूपात या शिवलिंगाची पूजा करणे जर शक्य नसेल तर अशा लोकांनी शिवलिंग आपल्या घरात ठेवू नये. किमान सोमवारी तरी आपण शिवलिंगाची सकाळ संध्याकाळ पूजा ही अवश्य करावी.
शिव पुराणानुसार घरामध्ये एकापेक्षा जास्त शिवलिंग ठेवल्याने सुद्धा घरात अनेक प्रकारच्या आपदा आणि संकटे निर्माण होतात. शिवलिंग हे नेहमी खुल्या स्थानी असावं. त्याला कधीही बंद पेटी मध्ये एखाद्या बंदिस्त जागेमध्ये ठेवून हे अत्यंत चुकीचा आहे. वास्तुशास्त्रानुसार शिवलिंगातून सातत्याने ऊर्जेचा संचार होत असतो.
आणि म्हणूनच या शिवलिंगा वरती जलधारा म्हणजेच पाण्याची संततधार पडत राहील याची आपण कटाक्षाने काळजी घ्या. जर तुमच्या घरामध्ये शिवलिंग आहे तर या शिवलिंगावरती सातत्याने जलधारा म्हणजेच पाण्याचे थेंब पडत राहायला हवे, जेणेकरून ही ऊर्जा शांत राहील.
ज्यांना ही गोष्ट करणे शक्य होत नाही अशा लोकांनी शिवलिंगाची स्थापना आपल्या घरात न केलेलीच बरी. कारण अशा प्रकारे ज्या शिवलिंगावरती पाण्याची धार पडत नाही, त्या घरात या वास्तूत कायमस्वरूपी अशांतीचा वास निर्माण होत राहतो. जर तुमच्या घरात धातूच शिवलिंग असेल तर धातूचा शिवलिंग घरात ठेवताना ते नेहमी सोन्याच, चांदीच किंवा तांबे या धातूपासून बनलेल असेल याची काळजी घ्या.
या शिवलिंगा सोबत त्याच धातूचा एक नाग सुद्धा त्याच्या जवळच्या शिवलिंगा जवळ असायला हव, असं हिंदू धर्मशास्त्र मानत. अनेकजण शिवलिंगाला केतकीचे फुल अर्पण करतात, किंवा तुळशीपत्र तुळशीची पानं अर्पण करताना दिसतात. भगवान शंकरांना या वस्तू त्यांना आवडत नाहीत.
या वस्तू जेव्हा आपण त्यांना अर्पण करतो तेव्हा शुभ फळे मिळण्याऐवजी आपल्या जीवनात नाना तर्हेची संकटे आणि आपदा निर्माण झालेल्या दिसून येतात. म्हणून केतकीची फुलं किंवा तुळशीची पानं, तुलसीपत्र तसेच सिंदूर, हलदी, या वस्तू आपण शिवलिंगास चुकूनही अर्पण करू नयेत. शिवलिंगावर ती चढवू नयेत.
असं म्हणतात की तुमच्या घरात जर तुम्हाला शिवशंकर यांचा आशीर्वाद प्राप्त करायचा असेल तर सर्वोत्तम गोष्ट आपण शिवलिंगाला कधीही एकट ठेऊ नये. शिवलिंगा सोबत आपण भगवान शिवशंकरांचे जे कुटुंब आहे या कुटुंबाचा फोटो आवश्यक ठेवावा.
माता पार्वती असतील, बालगणेश असतील किंवा कार्तिकेय असतील यांचे फोटो जर आपण त्या ठिकाणी ठेवले तर अत्यंत शुभ फळे आपणास प्राप्त होऊ लागतात. एक खूप मोठी चूक अनेक लोक करताना दिसून येतात, ती म्हणजे तुळशी वृंदावन मध्ये महादेवाची पिंड ठेवली जाते, शिवलिंग ठेवलं जातं.
हे अत्यंत चुकीची प्रथा पद्धत आपल्याकडे निर्माण झालेली आहे. खरे तर तुळशी जवळ जो काळ्या रंगाचा दगड ठेवायला हवा हिंदू धर्मशास्त्रानुसार तो म्हणजे शालिग्राम. शालिग्राम हे भगवान श्री श्री हरी श्री विष्णुनच एक रूप आहे. आणि तुळशीला विष्णुप्रिया अस संबोधल जात.
तुळस श्री हरी श्री विष्णूंना अत्यंत प्रिय आहे आणि म्हणूनच तुळशी जवळ आपण ह्या शालिग्राम नावाच्या देवतेची स्थापना करावी. ना की या महादेवाच्या पिंडीची. आपण जस की यापूर्वी पाहिलं की महादेवांना तुलसीपत्र, तुळशीची पानं अत्यंत अप्रिय आहेत. महादेवाच्या संपूर्ण कुटुंबाला जे काही परिवार आहे त्या परिवाराच आणि तुळशीची सख्य नाहीये.
आणि म्हणूनच जर तुम्ही अशा प्रकारे तुमच्या तुळशीवृंदावनात महादेवाची पिंड ठेवलेली असेल तर विनंती आहे तात्काळ ही पिंड त्या ठिकाणाहून आपण दुसरीकडे ठेवावी. आणि दुसरीकडे तुम्ही कुठेही ठेवा त्यावरती पाण्याची संततधार राहील याची काळजी घ्या. जर तुमच्या घरा मध्ये धातूच असेल किंवा कोणतेही शिवलिंग आहे.
नर्मदेश्वर शिवलिंग आहे तर त्यासंबंधी संपूर्ण माहिती अवश्य घ्या. शिवलिंगा विषयी संपूर्ण माहिती जाणून घ्यावी. शिवलिंगाची पूजा कशी करतात, त्यांच्या पुजे मध्ये कोणते नियम आहेत, हे नियम आपण जाणून घ्यावेत. आणि शिव शंकराची भक्ती करावी, आराधना करावी. शिवशंभु अत्यंत भोळे आहेत, दयाळू आहेत, भोले बाबा आहेत.
आपल्यातील साध्या सुध्या पूजेने सुद्धा शिवशंभु प्रसन्न होतात. अगदी मनोवांचीत वरदान ते नक्की देतात तुम्ही जे काही मागाल, तुमची जी काही इच्छा आहे. या इच्छेची पुर्ती भोलेनाथांच्या कृपेने नक्की पूर्ण होते. आपण या ज्या गोष्टी पाहिल्या, त्या गोष्टींचं पालन आपण अवश्य करा.
सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.