नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.
“श्री स्वामी समर्थ” आपल्या सर्वांनाच माहिती आहे. आपल्या सृष्टीचे पालनकर्ता विष्णू भगवान आहे. सृष्टी निर्माण करणारे प्रमुख देव आहेत आणि आपल्याला मृत्यूच्या दारामधून ईढा पिढ्या पासून बाहेर आणणारे आपले साक्षात शिव भगवान म्हणजे शंकर भोलेनाथ आहे.
आपल्याला माहीतच आहे कि स्वामी समर्थ हे भगवान शंकराच रूप आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की, हे देव शंकर भगवान आहे हे किती मोठे तांडव करणारे आहेत.जर चांगलं केलं तर आपल्यावर प्रसन्न होतील, नाहीतर त्यांच्या कोपापासून कोणीच दूर गेलेले नाही आणि मृत्यूच्या दारांमधून यांचा मंत्र जर म्हटला तर आपले प्राण परत येतात.
इतकी शक्ती आहे त्यांच्या महामृत्युंजय मंत्रामध्ये. विचार करा, जर आपण आपल्या घरामध्ये महामृत्युंजय मंत्राच यंत्र जर स्थापित केलं तर मग आपल्यावर त्याची कृपा दृष्टी राहणार. आपल्या सर्वांच्या घरामध्ये काहीनाकाही सुखदुःख आपल्या वाट्याला येत असत.
कोणी आजारी राहतं, कोणाच्या घरामध्ये वाईट शक्ती राहते, कोणाच्या घरामध्ये नेहमी क्लेश राहातो, कारण आपल्याला माहीत नसतं की, आपला कोणता ग्रह मंद झालेला आहे. म्हणून आपल्या घरामध्ये जर कोणी सतत आजारी राहत असेल, जर कोणाला कितीही काहीही केलं तरी यश मिळत नसेल.
वाईट शक्तींचा वास असेल, वाईट स्वप्न पडतात. आपण घरांमध्ये महामृत्युंजय मंत्र म्हणायलाच पाहिजे आणि महादेवाच हे यंत्र स्थापित करायला पाहिजे. या महामृत्युंजय यंत्राची स्थापना कशी करावी? श्रावण महिन्यामध्ये या यंत्राची स्थापना आपल्या घरामध्ये केली जाते.
हे यंत्र मार्केट मध्ये मिळून जाईल. तुम्ही जर पूजा सामग्रीच्या दुकानांमध्ये गेला तरी तुम्हाला महामृत्युंजय यंत्र मिळेल. आता श्रावण महिना गेला मग आता प्रश्न पडेल की, कधी याची स्थापना करू? तर,सोमवारी. सोमवार हा महादेवाचा वार आहे. सोमवारी सकाळी लवकर उठून ब्रह्म मुहूर्तावर अंघोळ करा आणि जमत असेल तर पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करा ते स्थापन करा.
पांढरा रंग हा महादेवाचा आवडता रंग आहे. तुम्ही त्या वेळेला पंचामृताने किंवा दुधाने,पाण्याने करा अभिषेक करा. “ओम नमः शिवाय” या नामाचा सतत जप ठेवा आणि त्याच्या नंतर त्याला भस्म लावा, चंदन लावा, हळदी – कुंकू चुकूनही लावू नका आणि पांढऱ्या रंगाचं फुल तुम्हाला त्याला वहायच आहे.
त्याच्यानंतर पांढऱ्या रंगाची मिठाई त्यामध्ये ठेवायची आहे आणि तुपाचा दिवा नक्की लावा. जे पण तूप असेल गाईचं किंवा म्हशीचे कोणतही चालेल. त्यानंतर आकरा वेळा महामृत्युंजय मंत्र म्हणा, कोणी एकवीस वेळा म्हणत. तुम्हाला जसं शक्य होत तसे म्हणा.
रुद्राक्षाची जर माळ असेल तर त्या माळेवर एक वेळा “ओम नमः शिवाय” या मंत्राचा जप करा. नसेल तरी काही हरकत नाही. त्याच्या नंतर प्रार्थना करा की माझ्या घरामधल्या ईडा पिळा जाऊदे, वाईट शक्तीपासून आम्हाला सावरा, आमच्यापासून वाईट शक्ती दुर जाऊदे.
तुमच्या घरात देवाऱ्यामध्ये त्याची स्थापना करा आणि होत असेल तर छोटसं पांढरे वस्त्र असेल, त्याच्या वरती त्याची स्थापना करा. आपण पूर्ण देव घरामध्ये पांढर वस्त्र नाही टाकत कारण. आपण पिवळे किंवा लाल रंगाच वस्त्र टाकतो आणि रोज त्याला पाण्याने अभिषेक जरी घातला तरी काही हरकत नाही.
रोज अशी साधी पूजा करा पण महामृत्युंजय मंत्र रोज अकरा वेळा म्हणा. पाण्याचा ग्लास समोर ठेवा. ते तीर्थ जे कोणी आजारी असेल त्यांना द्या. जर कोणी हॉस्पिटलला असेल तर त्यांना महामृत्युंजय मंत्राचा पाणी द्या.कोणी जास्त सिरीयस असेल तर त्याच्या डोक्यावर हात ठेवून जर तुम्ही महामृत्युंजय मंत्र म्हटला तर त्यांच्या इडा पीडा कमी होतात. कारण तुम्ही याचा अनुभव घेऊन बघा. तुमच्या घरामध्ये अशी काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही नक्कीच महामृत्युंजय यंत्र तुमच्या घरामध्ये स्थापित करा.
सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.