“श्री स्वामी समर्थ” आपल्याला बऱ्याच वेळी वेगवेगळ्या कामांसाठी घराबाहेर पडावे लागते. हल्ली बाहेर पडल्यावर काय होईल काहीच संत येत नाही. तुम्ही जर कोणत्याही कामासाठी घराबाहेर जात असाल तर तुमच्या खिशामध्ये, पाकिटमध्ये, पर्स मध्ये ही एक वस्तू टाका. त्यानंतरच घराबाहेर जा.
तुमचे प्रत्येक संकटातून प्रत्येक समस्येतून प्रत्येक अडचणींमधून रक्षण होईल. स्वामी सदैव तुमच्या सोबत राहतील आणि सदैव तुमचे रक्षण करतील. फक्त आठवणीने हि वस्तू आपल्या सोबाबत ठेवा. असे नाही कि कोणत्या ठराविक वेळेला बाहेर जाताना हि वस्तू ठेवावी.
सकाळी, दुपारी, संध्याकाळी किंवा रात्री केंव्हाही घराबाहेर जाल ही एक वस्तू तुमच्या खिशात टाका आणि मगच बाहेर जात. आता तुम्हाला वाटले असेल हि कोणती वस्तू आहे? जेव्हा ही तुम्हाला घराच्या बाहेर जायचं असेल, तेव्हा तुम्ही आपल्या देवघरात असलेली अगरबत्तीची उदी खिशात एक चिमूटभर पुडी मध्ये किंवा एका प्लास्टिक च्या कागदात तुम्हाला टाकायचे आहे.
हि उदी तुमच्या शर्ट च्या वरच्या खिशात, पॅन्ट मध्ये, पर्समध्ये, पाकिटामध्ये जिथे टाकायची तिथे चिमुटभर टाका. रोज टाकणं जर शक्य नसेल तर फक्त एक चिमूटभर उदी एका कागदामध्ये पुडी बांधून ठेवा. ती उदी ची पुडी आपल्या पर्स मध्ये, पाकिटामध्ये, किंवा खीशात ठेवा. आठ दिवसानंतर ती कुठेतरी विसर्जन करा.
या उदीचे विसर्जन पाण्यामध्ये केले तर उत्तम. आठवड्यानंतर पुन्हा दुसरी पुडी त्याच पद्धतीने ठेवा. आठ आठ दिवसांनी ती पुडी तुम्हाला बदलायची आहे. किंवा हे शक्य नसेल तर रोज एक चिमूटभर उदी आपल्या खिशात टाकायची आणि स्वामींना नमस्कार करायचा त्यांचे दर्शन घ्यायचे.
आणि मग घराबाहेर पडायचं. ज्याही कामाला तुम्ही जात असाल ते काम पूर्ण होईल.स्वामी नेहमी तुमच्या पाठीशी असतील. कोणत्याही कामात तुम्हाला विघ्न येणार नाही. तुमचे सदैव रक्षण होईल. बाहेर येणाऱ्या संकटांपासून स्वामी तुमचे रक्षण करतील. तर आठवणीने जेव्हा तुम्ही घराबाहेर जाल तेव्हा स्वामींच्या सेवेची उदी आपल्या जवळ ठेवा.
आपल्या घरात लावलेल्या अगरबत्तीची उदी, खिशामध्ये एक चिमूटभर टाकूनच बाहेर पडा. किंवा आठ दिवसासाठी एका कागदात बांधून ती उदी आपल्या खिशात ठेवा. तुम्हाला नक्की फरक जाणवेल. स्वामींवरची श्रद्धा अशीच कायम ठेवा. त्यांच्या सेवेत कधीही खंड पडू देऊ नका.
तारकमंत्राचे पठण अवश्य करा, निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना,प्रचंड स्वामीबळ पाठी शी नित्य आहे रे मना आतर्क्य अवधूत हे स्मरण गामी, अशक्यही शक्य करतील स्वामी.
सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.