GASA

रोहित शर्मा तिन्ही फॉरमॅटमध्ये फिट आहे का? कपिल देव यांनी मोठं वक्तव्य..

क्रीडा

भारताचा सर्व प्रकारचा कर्णधार रोहित शर्मा गेल्या काही काळापासून दुखापतींशी झुंज देत आहे. बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेत त्याच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. तो श्रीलंकेविरुद्धच्या वनडेत पुनरागमन करण्याच्या तयारीत असला तरी त्याच्या दुखापतींमुळे टीम इंडियाला चिंता सतावत आहे.

भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या तंदुरुस्तीवर बऱ्याच दिवसांपासून प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. आता माजी कर्णधार कपिल देव यांनी या मुद्द्यावर मोठे वक्तव्य केले आहे. तसेच भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या फलंदाजीतील विक्रम भलेही असतील .

पण त्याच्या तंदुरुस्तीवर नेहमीच प्रश्नचिन्ह असते. रोहितला कर्णधार बनवतानाही अनेकांनी रोहित तिन्ही फॉरमॅटमध्ये कर्णधारपदासाठी योग्य नसल्याचे म्हटले होते.
आता बीसीसीआय फिटनेसबाबत कडक झाल्याने पुन्हा एकदा रोहित निशाण्यावर आला आहे.

भारताचा माजी कर्णधार कपिल देव यांनीही रोहितच्या फिटनेसबाबत मोठे वक्तव्य केले आहे. कपिल देव म्हणतात की, रोहित शर्मा हा जगातील महान आणि सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे पण त्याच्या फिटनेसबद्दल त्याला शंका आहे.

तो तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा कर्णधार आहे आणि रोहितकडे या जबाबदारीसाठी आवश्यक फिटनेसची पातळी नाही.

◆तर रोहित तिन्ही फॉरमॅटमध्ये कर्णधारपदासाठी योग्य नाही- दरम्यान एका न्यूजवर कपिल देव म्हणाले, “रोहित शर्मामध्ये कोणतीही कमतरता नाही. त्याच्याकडे सर्व काही आहे पण मला वैयक्तिकरित्या वाटते की त्याच्या फिटनेसवर प्रश्न आहेत. तसेच ते पुढे म्हणाले की, संघाचा कर्णधार असा असावा जो बाकीच्या खेळाडूंना तंदुरुस्त राहण्याची प्रेरणा देईल, बाकीच्या संघाला आपला कर्णधार पाहून अभिमान वाटला पाहिजे.

तसेच कपिल देव म्हणतात की, कर्णधार झाल्यापासून त्याने जास्त धावा केल्या नाहीत, अशी टीका त्याच्यावर होत आहे. मी याच्याशी सहमत आहे पण रोहितच्या क्रिकेट कौशल्यात कोणतीही कमतरता नाही असे मला वाटत नाही. तो खूप यशस्वी खेळाडू आहे. तो तंदुरुस्त झाला तर संपूर्ण संघ त्याच्याभोवती असेल. तत्पूर्वी कपिल देव म्हणाले, ‘वर्ल्ड कप जिंकायचा असेल.

तर प्रशिक्षक, निवडकर्ते आणि व्यवस्थापनाला कठीण निर्णय घ्यावे लागतील. तुमच्या आवडीऐवजी तुम्हाला संघावर लक्ष केंद्रित करावे लागेल. जर तुम्हाला विराट, रोहित किंवा फक्त 2-3 खेळाडूंवर विश्वास असेल की, ते आम्हाला विश्वचषक जिंकून देतील, प्रत्येक वेळी ते शक्य नाही. माजी भारतीय कर्णधाराने सांगितले की, जर रोहितने फिटनेस सुधारला तर ते उर्वरित भारतीय क्रिकेटपटूंसाठी प्रेरक ठरेल.

“मी नक्कीच म्हणू शकतो की, रोहितच्या फिटनेसवर मोठी शंका आहे. कर्णधार झाल्यापासून त्याच्यावर जास्त धावा झाल्या नसल्याची टीका होत आहे. तसेच कपिल यांनी भारतीय संघातील तरुणांना विश्वचषक जिंकण्यासाठी रोहित आणि कोहलीवर अवलंबून न राहता पुढे जाण्याचा सल्ला दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *