या ५ गोष्टी गणपती बाप्पाना खूप प्रिय आहेत, आठवणीने पूजे दरम्यान करा अर्पण..

प्रादेशिक

कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात सर्व प्रथम श्री गणेश स्तुतीने केली जाते. गणपतीच्या पूजेमध्ये काही गोष्टींना विशेष महत्त्व आहे, त्याशिवाय गणेशाची पूजा पूर्ण मानली जात नाही. या वर्षीचा गणेशोत्सव शनिवार, 22 ऑगस्ट पासून सुरू होत आहे. खाली दिलेल्या 5 गोष्टी रोजच्या गणपती पूजेमध्ये अवश्य समाविष्ट करा.

मोदक: श्रीगणेशाला लंबोदर असेही म्हणतात आणि त्यांना नैवद्य देताना त्यात गोड असणे खूप महत्वाचे आहे. मिष्टान्नात मोदक देवाला खूप प्रिय आहेत. त्यामुळे रोज मोदकाचा भोग चढवा.

दुर्वा: गणरायाला फुलांपेक्षा हरळ चे गवत जास्त आवडते ज्याला आपण दुर्वा म्हणतो. पूजेच्या वेळी ताजे दुर्वा तोडून बाप्पाला अर्पण करा. 3 किंवा 5 पानांची दुर्वा देवाला अर्पण करा.

झेंडूचे फूल: फुलांमध्ये, गणपती बाप्पाला झेंडूची फुले सर्वात जास्त आवडतात. जर तुम्ही गणेश चतुर्थीला मूर्ती स्थापित करणार असाल तर दररोज देवाला झेंडूच्या फुलांची माळ अर्पण करा.

केळी: देवाला फळांमधे केळी सर्वाधिक प्रिय आहे. हे लक्षात ठेवा की केळी नेहमी जोडीसह अर्पण करावी. केळीचे एक फळ हे पूर्ण मानले जात नाही.

शंख: गणपतीच्या चार हाता पैकी एका हातात शंख धरला आहे. गणरायाच्या पूजेमध्ये शंख वाजवणे देखील आवश्यक आहे. म्हणून त्यांच्या आरतीमध्ये शंखाचा वापर केला जातो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *