आपल्या हिंदू धर्मात गायीला देवी मानले जाते. गाईमध्ये तेहेतीस कोटी देवी देवतांचे वास्तव्य असल्याचे आपण मानतो. जर सर्व देवी-देवतांचा एकत्रित आशीर्वाद आपल्याला मिळवायचा असेल तर फक्त गायीचे पूजन व सेवा केली तरी सर्व देवी देवता प्रसन्न होतात, व त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. गाईमध्ये देवी लक्ष्मीचे ही वास्तव्य असते.
जे व्यक्ती मनोभावे गाईचे पूजन व सेवा करतात, त्यांच्या जीवनात नेहमी सुख व समृद्धी तसेच समाधान नांदते. गाईच्या मुखामध्ये चारही वेदांचे वास्तव्य असते. गाईचे पूजन केल्यास त्रिदेव म्हणजे ब्रह्मदेव, श्रीहरी विष्णु, व देवादिदेव महादेव, यांचीही कृपा आपल्यावर होते.
श्रीकृष्णांना गोपाल म्हटले जाते, कारण ते गाईचे पालन, पोषण, सेवा, व पूजन करीत असत. गायीला पोळी खाऊ घालण्याची आपली फार पूर्वीपासूनची परंपरा आहे. गाईचे पूजन केल्यास देवी लक्ष्मीचे पूजन केल्याचे पुण्यफळाचे आपल्याला प्राप्ती होते. आपण गाईला पोळी खायला देतो, म्हणजे साक्षात भगवंत यांना आपण नैवेद्य दिल्यासारखे होते.
म्हणून गाईला पोळी जरूर खायला द्यावी. यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी येते. परंतु गाईला पोळी खाऊ घालताना या चुका अजिबात करू नका. जर आपण गाईला पोळी खाऊ घालताना या चुका करीत असाल तर आपल्याला त्या बदल्यात पुण्यफळ नाही, तर संकटे व अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
म्हणून गाईला पोळी खाऊ घालताना या चुका टाळा. गाईला पोळी खाऊ घालताना या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावे. गाईला कधीही ही शिळी पोळी खायला देऊ नये. आपण गाईसाठी पहिली ताजी व गरम गरम पोळी काढून ठेवतो. परंतु आपल्याला वेळ नसल्या कारणाने आपण ती पोळी तशीच राहू देतो, आपल्या सवडीप्रमाणे आपण ते पोळी गाईला खायला देतो.
परंतु तोपर्यंत ती पोळी शिळी होऊन जाते, आणि अशीच शिळी पोळी गाईला खाऊ घालने अशुभ मानले जाते. आपण पुण्य कमावण्यासाठी गायीला पोळी खायला देतो, परंतु जर आपण गायीला शिळी पोळी खायला दिली तर आपण पापाचे भागीदार बनतो. गाईला आपण देवी मानतो, मग आपण देवांना कधीच शिळा झालेला नेवेद्य देतो का नाही ना.
अशाच प्रकारे देवी असलेल्या गाईला ताजी व गरम पोळीच खायला द्यावी. गाईला पोळी खाऊ घालतांना दुसरी चूक आपण हि करतो की आपण गायीला कोरडी पोळी खायला देतो. म्हणजेच आपण नुसती पोळीच गायीला खायला देतो. परंतु गाईला पोळी आपण नुसती खायला न देता, त्या पोळीला थोडेसे तूप लावून, किंवा चणाडाळ, गूळ, किंवा साखर आपल्याकडे त्यापैकी घरात जे काही उपलब्ध असेल ते पोळी मध्ये ठेवून गायीला खायला द्यावी.
कारण आपण कधी कोरडी पोळी खातो का? मग गाईला आपण कोरडी पोळी कसे काय देऊ शकतो. अशा प्रकारे जर आपण गाईला पोळी खायला दिली तर गोमातेची तसेच सर्व देवी-देवतांची कृपा आपल्यावर होईल. व आपण नेहमी सुखी समाधानी व आनंदी राहू.
गाईला पोळी खाऊ घालण्याचा एक नियम हा आहे, की गाईला नेहमी आपण पोळ्या करताना जी दुसरी पोळी बनवतो ती गाईला खायला द्यावी. बहुतेक व्यक्ती म्हणतात की गाईला पहिली पोळी खायला द्यावी. परंतु पहिली पोळी कधीही व्यवस्थित येत नाही तसेच त्या पोळीवर अग्री देवतेचा अधिकार असतो.
म्हणून पहिली पोळी अग्नी देवतेला समर्पित करावी. गाईला कधीही उष्टी किंवा ताटात उरलेली पोळी खायला देऊ नये, हे खूप अशुभ असते. यामुळे आपल्याला अडचणी व संकटांचा सामना करावा लागू शकतो. गाईला कधीही पोळी खाऊ घालताना आपल्या हाताने पोळी खाऊ घालावी.
कधी कधी आपल्याला गाईची भीती वाटते मग आपण तेथेच गाई समोर पोळी फेकून देतो व बाजूला होतो. परंतु हे खुप चुकीचे आहे. जर गाईला पोळी खाऊ घालताना आपल्याला गाईची भीती वाटत असेल, तर ज्यांची गाय आहे त्यांच्याकडे ती पोळी देऊन ती गाईला खाऊ घालावी. किंवा गाईचे भोजन ज्या पात्रात ठेवले जाते त्या पात्रात पोळी ठेवून द्यावी.
परंतु गाईला कधीही पोळी फेकून देऊ नये. गाईला पोळी खायला देतांना स्वच्छतेचे पालन करणे खूप आवश्यक आहे. तसेच गाईला नेहमी सात्विक भोजनच द्यावे. कांदे लसूण टाकलेले तामसिक भोजन गाईला कधीही खायला देऊ नये. तसेच गाईला हिरवा चारा, भाजीपाला खाऊ घालावे ही खूप शुभ असते.
परंतु आपण काय करतो आपल्या स्वतःसाठी चांगला भाजीपाला घेतो. परंतु गाईलाच टाकायचे आहे त्यात काय एवढं असे म्हणून स्वस्त, खराब झालेला, वाळलेला भाजीपाला घेऊन आपण गाईला खाऊ घालतो. अशाप्रकारे भाजीपाला खायला देण्यापेक्षा गाईला काहीही न टाकलेले खूप चांगले. कारण यामुळे आपण फक्त पापाचे भागीदार बनतो.
गाईला गूळ खाऊ घालणे देखील खूप शुभ मानले जाते. यामुळे गोपूजनाचे विशेष लाभ आपल्याला मिळतात. आणि आपल्या अडचणी व संकटांपासून आपली सुटका होते. गाईला पोळी व गुळ खाऊ घालण्या बरोबरच पालक खाऊ घालणे ही खूप शुभ असते. गाईला पालकाची भाजी खाऊ घातल्याने आपल्या कुंडलीतील नकारात्मक दोष नष्ट होतात. गाईला पोळी खाऊ घातल्यानंतर गाईच्या पायाखालची माती आपल्या कपाळावर लावावी.
असे मानले जाते की गाईच्या पायाखालची माती कपाळावर लावल्यास तीर्थामध्ये स्नान केल्याच्या पुण्यफळाची आपल्याला प्राप्ती होते. या सर्व नियमांचे पालन करून जर आपण गाईला पोळी खाऊ घातली तर आपण नेहमी सुखी समाधानी राहू शकतो. आपल्यावर गोमातेचा आशीर्वाद कायम राहतो. तेहेतिस कोटी देवी-देवतांची कृपा आपल्यावर होऊन आपण सुखी, समाधानी, व संपन्न राहतो.
सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.