फक्त कष्ट करून कोणी श्रीमंत होत नाही , त्यासाठी या ३ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा….।। कोणत्या आहेत या तीन गोष्टी जाणून घ्या या लेखात !

चित्रपट प्रादेशिक शिक्षण

आपल्या कर्मावर विश्वास ठेवा राशींवर नाही. रास तर राम आणि रावण दोघांचीही एकच होती. परंतु त्यांना फळ त्यांच्या कर्मा प्रमाणेच मिळाले. कोणाचीही सध्याची स्थिती बघून त्यांच्या भविष्याचा उपवास करू नका. कारण काळात एवढी ताकत आहे की, वेळ आल्यास कोळशाचे ही हिऱ्यात रूपांतर होते.

श्रीमंतांच्या घरावर बसलेला कावळा हा सर्वांना मोर वाटतो. तर गरीब आणि उपाशी मुलगा सर्वांना चोर वाटतो. माणसांच्या चांगलेपणाची चर्चा होत असेल तर सगळे गप्प बसतात. पण, त्यांच्या दुर्गुनांची चर्चा होत असेल तर मुकी व्यक्तीही बोलू लागते. जे फक्त पाण्याने अंघोळ करतात ते कधीही यशस्वी होत नाही.

मात्र जे घामाने अंघोळ करतात तेच जीवनात खरे यशस्वी होतात. जीवनात जर पुढे जायचे असेल तर बहिरे व्हा. कारण लोकांचे बोलणे ऐकाल तर तुमचे मनोबल कमी होईल व तुम्ही कधीही पुढे जाऊ शकत नाही. कधीही आपली स्वतः ची तुलना इतरांशी करू नये. कारण सूर्य व चंद्र दोन्हीही चमकतात, पण आपल्या आपल्या वेळेवर.

जीवनात अशा व्यक्ती कधीही यशस्वी होवू शकत नाहीत. एक म्हणजे ज्या व्यक्ती विचार करतात परंतु करीत नाही व दुसरी व्यक्ती म्हणजे जे करतात पण त्याचा विचार करीत नाही. तुम्ही जर पळण्याचे साहसच केले नाही, तर तुम्ही कोणत्याही स्पर्धेत यश मिळवू शकत नाहीत.

एका व्यक्तीने चाणक्यांना विचारले, जर आपले नशीब आधीच लिहिले गेले असेल, तर प्रयत्न करून काय उपयोग ? तेव्हा आचार्यांनी खूप छान उत्तर दिले, की जर नशिबात असेच लिहिलेले असेल की प्रयत्न केल्यावरच मिळणार आहे तर. फुंकर मारून दिवा विझविता येतो. परंतु आपण कोणाची कीर्ती फुंकर मारून विझवू शकत नाही.

भविष्य काळाबद्दल चिंता करू नये व भूत काळाबद्दल विचारही करू नये, काळजी करू नये. कारण याचा आता सद्यस्थितीत काहीही उपयोग नाही. वर्तमान काळात जगा, आजचा दिवस चालला तो खरा. व्यक्ती आपल्या कार्याने महान बनते, त्याच्या जन्माने नाही.

विहिरीत घातलेली बादली भरून वर येते, त्याचप्रमाणे जीवनात नम्रता असेल, जे झुकते तेच प्राप्त करते, आपल्याला काय करायचे आहे हे इतरांना सांगू नये. हे रहस्यच ठेवावे. व दृढपणे आपले कार्य, कर्तव्य करीत राहावे. जीवनात सफल व्हायचे असेल तर चांगल्या मित्रांची गरज असते.

पण जर जास्तच सफल व्हायचे असेल तर चांगल्या शत्रूंची गरज असते. उत्पन्न कमी असेल, तर खर्चावर नियंत्रण ठेवा. संपूर्ण माहिती नसेल तर बोलण्यावर नियंत्रण ठेवा. चुकीच्या दिशेने जाणाऱ्या गर्दी बरोबर जाण्यापेक्षा एकटे योग्य दिशेने जाणे कधीही चांगले. कोणतेही काम करायचे असेल तर आपण यशस्वी होऊ की नाही, याचा विचार करू नये.

ज्या व्यक्ती प्रामाणिकपणे काम करतात, ते नेहमी आनंदी असतात. नियमितपणे अभ्यास न केल्यास ज्ञानही विषासमान होते. जीवनाच्या शर्यतीत जे तुम्हाला हरवू शकत नाहीत, तेच तुमचे मनोबल खचवून तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करतात. कोणतेही नवीन काम सुरू करण्याअगोदर या काही गोष्टींकडे लक्ष देण्यास आचार्य चाणक्य आपल्याला सांगतात, की कोणतेही कार्य सुरू करण्याअगोदर आपले विचार सकारात्मक असावेत.

नकारात्मक विचारांनी सुरू झालेले काम कधीही पूर्ण होत नाही. आपले कार्य सुरू करण्याअगोदर ते कोणत्या ठिकाणी करावे व कोणत्या वेळी सुरुवात करावी, हे आधी ठरवावे. तुम्हाला कोण मदत करू शकते, याचाही विचार करावा. जे काम तुम्ही करणार आहात ते काम तुमच्यासाठी योग्य आहे का? नाही तर दुसरे काम निवडा व त्यात यशस्वी व्हा.

तुम्हाला काम करायचे असेल तर कितीतरी व्यक्तीच्या भेटीगाठी होतात. अशा वेळी आपल्या वागण्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे. कारण चानक्यांच्या मते तिखट व कडू शब्द वापरणारे व्यक्ती नेहमी तोट्यात व्यापार करतात. जर तुमचा ज्योतिषशास्त्रावर विश्वास असेल, तर आपल्या कामाची सुरूवात करण्या अगोदर ज्योतिषाचा सल्ला अवश्‍य घ्यावा.

त्याप्रमाणे कामाला सुरुवात करावी. आपण जे काही काम करणार आहोत ते आपल्या जोडीदाराला अवश्य सांगा. म्हणजे त्या तुम्हाला त्यांची ही साथ मिळेल. आपल्या नवीन कार्याची सुरुवात करण्याअगोदर बाहेरच्या व्यक्तीला कधीही सांगू नये, कारण तुम्ही त्यात यश मिळविले तर आपोआपच सर्वांना माहिती होईल, व जर असफल झाला तर कुणाला काही कळणारही नाही.

येथे फक्त सफलता व असफलता मिळविणे, हाच उद्देश नाही, तर जर तुमचे काही व्यापारातील सिक्रेटस इतरांना समजले, तर इतर व्यक्ती स्वतःच्या व्यापारासाठी या नियमांचा वापर करतील. व स्वतःचा फायदा करून घेतील. म्हणून आपली कामाची टेक्निक कोणालाही सांगू नये. यामुळे आपण मागे राहतो, व आपले शत्रू खूप पुढे निघून जातात.

जर तुम्हाला व्यापारात सफल व्हायचे असेल, तर तुम्हाला काही कठीन व अवघड निर्णय घ्यावेच लागतील. व व्यापार म्हंटल्यावर तर त्यात जोखीम ही घ्यावीच लागते. आपली बसण्याची जागा, आरामदायक व प्रसन्न असावी. व तेथे नेहमी मोकळा प्रकाश सूर्यप्रकाश व खेळती हवा असावी. म्हणजे अशा प्रसन्न वातावरणात काम करण्यासही हुरूप येतो, आणि वेगात काम होते.

सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *