दरम्यान, मुंबईहून कोल्हापूरकडे निघालेल्या खासगी लक्झरी बसला मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वडगाव मावळ जवळ भीषण आग लागली.
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर शनिवारी सकाळी ज्या खाजगी बसला आग लागली ती बस चालवत असलेले 51 वर्षीय शंकर महामुणकर सांगत होते की, “मला उजव्या बाजूला मागच्या टायरमधून धूर निघताना दिसत होता.
मी बस थांबवण्याचा आणि सर्व प्रवाशांना बाहेर काढण्याचा निर्णय घेतला.” तसेच पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ओझर्डे पुलाजवळ शनिवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास कोल्हापूर येथील वैभव ट्रॅव्हल्सच्या स्लीपर कोच बसमध्ये प्रवास करणाऱ्या महिला आणि लहान मुलांसह 36 प्रवासी सुखरूप बचावले आहेत.
शुक्रवारी रात्री 11 च्या सुमारास मुंबईहून निघालेली ही बस पुणे आणि कोल्हापूरकडे प्रवाशांना घेऊन जात असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, साताऱ्याचे राहणारे ड्रायव्हर शंकर महामुणकर म्हणाले की, “पहाटे 4 च्या सुमारास, आम्ही लोणावळ्याला असताना, मला रबर गरम होत असल्याचा वास येत होता.
टायर डिस्क्सवर जास्त घर्षण झाल्यामुळे हे घडले असल्याचा मला संशय येत होता, म्हणून आम्ही थोडा वेळ थांबलो आणि मी कसून तपासणी केली आणि मात्र सर्व काही ठीक असल्याचे आढळले. पण ओझर्डे पुलाजवळ गेल्यावर उजव्या हाताला मागच्या टायरमधून धूर निघताना दिसला. मी बस थांबवून सर्व प्रवाशांना बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. मी बस रस्त्याच्या कडेला थांबवली.
मी प्रवाशांना सहकार्य करण्यास सांगितले आणि त्यांना बाहेर काढण्यास सांगितले. याचबरोबर सामानाचा डबा उघडला आणि काही प्रवाशांच्या मदतीने सर्व बॅगा बाहेर काढल्या. मग त्यानंतर आम्ही पोलिस आणि अग्निशमन दलाला माहिती दिली. काही मिनिटांनी पोलीस आणि अग्निशमन दल आले तोपर्यंत बसचा आतील भाग धुराने भरला होता आणि काही वेळातच आग इतर भागात पसरली असल्याचे ते म्हणाले.”
याचबरोबर, सहाय्यक पोलीस आयुक्त देविदाद घेवारे म्हणाले की, “प्राथमिक तपासात असे आढळून आले आहे की, टायर आणि डिस्क जास्त गरम झाल्यामुळे आग लागली असावी. तसेच एक्स्प्रेस वे आपत्कालीन प्रतिसाद दल, अग्निशमन दल व जवळपास निवडणूक तपासणीसाठी तैनात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या पथकाने घटनास्थळी लगेच धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी मदत केली.
चालकाने वेळीच दिलेल्या प्रतिसादामुळे गंभीर घटना व जीवितहानी टळली, असेही ते म्हणाले. याचबरोबर, अधिकाऱ्यांनी सांगितले की, आग आटोक्यात येईपर्यंत बसच्या संपूर्ण संरचनेचे नुकसान झाले होते. काही वेळाने वैभव ट्रॅव्हल्सने दुसऱ्या बसची व्यवस्था केली ज्यामध्ये प्रवाशांनी पुणे आणि कोल्हापूरकडे प्रवास सुरू करण्यात आला.