शिक्षणाचे माहेरघर मानले जाणाऱ्या पुणे शहरात आज एक अनोखा प्रकार घडला आहे. दरम्यान, शहरातील चोरांचा एक अजब कारनामा उघडकीस आला असून चोरट्यांनी चक्क EVM मशीनवरच डल्ला मारल्याची धक्कादायक माहिती समोर आली. दरम्यान, ही धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील सासवडमधील धक्कादायक प्रकार उघडकीस आली आहे.
पुणे तिथे काय उणे, म्हंटल्याप्रमाणे पुण्यात काहीही घडू शकतं अशा अर्थाची ही म्हण आज खरी ठरली. कारण पुण्यात चोरांचा एक अजब जगावेगळा कारनामा केला आहे. दरम्यान, चोरट्यांनी चक्क EVM मशीनवरच चोरले आहे. ही घटना पुणे जिल्ह्यातील सासवड मधील चक्क तहसीलदार कार्यालयातून हे EVM मशीन पळवण्यात आले असल्याचे सांगितले जाते.
या घटनेची माहिती समजताच याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांकडून तपासासाठी पथके तैनात करण्यात आली आहेत. दरम्यान, पुरंदर तालुक्यातील सासवड तहसील कार्यालयातून EVM मशीनची चोरी झाली. सासवड शहरातील तहसील कार्यालयातील स्ट्रॉंगरूममध्ये EVM मशीन ठेवण्यात आले होते. या बाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार-रविवारी अशी 2 दिवस तहसील कार्यालयास सुट्टी होती.
सोमवारी सकाळी 11 वाजता तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांना स्ट्रॉंग रूमचं कुलूप तोडण्यात आलेल आढळून आले आणि या ठिकाणी असलेल्या EVM मशीन मधून एक EVM मशीन चोरीला गेल्याचं समजताच एकच खळबळ माजली. सर्वत्र त्याचीच चर्चा सुरू होती. विशेष म्हणजे, ही चोरी करताना ते चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैदही झाले.
दरम्यान, EVM चोरीला गेल्याचे समजताच, सासवड पोलीस स्टेशनचे कर्मचारी आणि फिंगरप्रिंट एक्सपर्टची टीम तसेच LCB ची टीम असे पोलीसांचे पथक या ठिकाणी दाखल झाले असून त्याचा तपास सुरू आहे. मात्र यासंदर्भात कोणतीही माहिती देण्यास नकार देत प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी कानावर हात ठेवले आहे. याबाबतीत कोणीही काहीही बोलण्यास तयार नाही.