इंद्रायणी नदीतील प्रदूषण लवकरच कमी होणार-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस..

Pune

वारकऱ्यांची जीवनदायिनी मानली जाणारी इंद्रायणी नदीच्या प्रदुषणासंदर्भात लवकरच कारवाई करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. तसेच त्यामुळे आता आळंदीकरांची या इंद्रायणी नदीच्या प्रदुषणापासून मुक्तता होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, वारकरी संप्रदायाचं श्रद्धास्थान आणि जीवनदायिनी मानली जाणारी इंद्रायणी नदीवरील प्रदुषणाची समस्या अनेक दिवसांपासून निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक नागरिकांचं आरोग्य धोक्यात येत आहे. तसेच यावर आता इंद्रायणी नदीच्या प्रदुषणासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाईचे आदेश देखील दिल्यामुळे आता आळंदीकरांची या इंद्रायणी नदीच्या प्रदुषणापासून मुक्तता होणार आहे.

दरम्यान, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आज आळंदी दौऱ्यावर होते. आज गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत वारकरी शिक्षण संस्थेच्या ‘बंकटस्वामी सदन’ या विद्यार्थी वसतीगृहाचे लोकार्पण सोहळा पार पडला यावेळी ते बोलत होते. गेल्या काही महिन्यांत इंद्रायणी नदीच्या प्रदुषणाचा प्रश्न नागरिकांनी आवाज उठवला गेला मात्र यावर कोणतीही करवाई होताना दिसली नाही.

तसेच अनेक राजकीय नेत्यांनी यासंदर्भात कारवाईचे आदेश देखील दिले मात्र प्रदुषणाचं प्रमाण कमी होण्याचे सोडून वाढतच राहिलं. सध्या संपूर्ण नदी केमिकल्समुळे फेसाळलेली असल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे या नदीच्या प्रदुषणामुळे आळंदीतील हजारो नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे.

तसेच आषाढी वारी आणि कार्तिकी एकादशी अशा अनेक प्रसंगी लाखो वारकरी आळंदीनगरीत दाखल होतो. तेव्हा याच इंद्रायणी नदीत ते पवित्र स्नान करतात अन् तीर्थ म्हणून हेच रसायनयुक्त पाणी पितात. त्यामुळे आता वारकरी अन स्थानिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. तसेच या पाण्यामुळं आजार जडत आहेत.

त्यामुळे गेल्या 7 वर्षांपासून अनेकदा अशी परिस्थिती उद्भवलेली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे यासंबंधीची अनेक तक्रारी देखील करण्यात आल्या आहेत. तसेच त्यांनी काही कंपन्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. मात्र प्रदुषण कमी होताना होण्याचे नावच घेत नाही. त्यामुळे आता थेट गृहमंत्री गृहमंत्र्यांनी कारवाई करण्याचे आदेश दिल्यामुळे परिस्थितीत काही बदल होईल का पाहणे गरजेचे आहे.

त्यामुळे प्रदुषण दूर होण्याची अपेक्षा सर्वत्र व्यक्त केली जात आहे. दरम्यान, आळंदीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वारकरी शिक्षण संस्थेच्या ‘बंकटस्वामी सदन’ या विद्यार्थी सुमारे 500 विद्यार्थ्यांच्या निवास व्यवस्थेकरीता वसतीगृहाचे लोकार्पण करण्यात येणार असून त्यासाठी 5 कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल, अशी घोषणा यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *