सर्वान माहिती आहे की, भारतात पुढील वर्षी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाला 12 महिन्यांहून कमी कालावधी शिल्लक आहे. तसेच अशा स्थितीत भारतीय संघाच्या व्यवस्थापनेच्या चिंतेत मात्र भर पडल्याचे दिसून येत आहे. कारण सध्याची परिस्थिती पाहता ‘मेन इन ब्लू’ची तयारी नगण्य आहे, असे दिसते. कारण न्यूझीलंडपाठोपाठ बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेतही भारताला पराभवाचा सामना करावा लागला.
याशिवाय, भारतीय संघाची खराब कामगिरी सुरूच आहे, तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारतीय खेळाडूंचा फिटनेसही चाहत्यांसाठी चिंतेचा विषय प्रश्न बनला असल्याचे दिसून येत आहे. कारण भारतीय संघातील 1-2 नव्हे तर तब्बल 6 खेळाडू यावेळी दुखापतींमुळे बाहेर आहेत. तसेच आगामी विश्वचषकात भारतीय संघात निवड होण्यासाठी हे खेळाडू प्रबळ दावेदार आहेत.
याशिवाय, या यादीत पहिले नाव आहे भारतीय कर्णधार रोहित शर्माचे होय. कारण ज्या बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात अंगठ्याला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे तो सलामीला उतरला नाही. सातवी विकेट पडल्यानंतर रोहित नक्कीच मैदानात उतरला असला तरी दुखापतीमुळे रोहित बांगलादेशविरुद्धच्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यातून बाहेर पडला असून कसोटी मालिकेतूनही तो बाहेर जाण्याची शक्यता आहे.
याशिवाय, वेगवान गोलंदाज दीपक चहरही दुखापतींशी झुंजत आहे. दुसऱ्या वनडेत गोलंदाजी करताना त्याच्या हॅमस्ट्रिंगला दुखापत झाली होती. यामुळे तो आपला स्पेलही पूर्ण करू शकला नाही. तसं पाहिलं तर गेल्या 4 महिन्यांत दीपक चहरला दुखापत होण्याची ही तिसरी वेळ आहे. दुखापतीमुळे तो जवळपास 6 महिने क्रिकेटपासून दूर होता. याशिवाय, या यादीत वेगवान गोलंदाज कुलदीप सेनचे तिसरे नाव आहे.
कारण कुलदीप सेनने सध्या सुरू असलेल्या बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यातूनच पदार्पण केले असून, जिथे त्याला 2 विकेट्स मिळवण्यात यश मिळवले. आता तो दुखापतीमुळे वनडे मालिकेतून बाहेर आहे.
याशिवाय, सर्वात धक्कादायक म्हणजे, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी हे अनुभवी वेगवान गोलंदाजही दुखापतीच्या विळख्यात आहेत. दुखापतीमुळे बुमराहला T20 विश्वचषकातही सहभागी होता आले नाही. दुसरीकडे, बांगलादेशविरुद्धच्या मालिकेपूर्वी शमीला सराव करताना दुखापत झाली होती, त्यामुळे तो एकदिवसीय सामन्यातून बाहेर पडला होता. याशिवाय, जखमी भारतीय खेळाडूंच्या यादीत रवींद्र जडेजाचाही समावेश आहे.
उजव्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे जडेजा 2022 च्या T20 विश्वचषक स्पर्धेत सहभागी होऊ शकला नाही. आता जडेजाने कसरत करायला सुरुवात केली आहे, मात्र बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळणे त्याला कठीण जात आहे. जडेजाच्या जागी अक्षर पटेलचा भारतीय संघात समावेश केला जाऊ शकतो, असे संगितले जाते आहे..