कुख्यात डॉन शरद मोहोळच्या पत्नीने घेतली फडणवीसांची भेट, म्हणाल्या…

Pune प्रादेशिक

पुणे शहरातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या हत्येने पुण्यातील कोथरूड परिसर हादरून गेला आहे. त्यामुळे गेलं 2-3 दिवस परिसरात तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे. 5 जानेवारी रोजी भर दिवसाढवळ्या डॉन शरद मोहोळ याला गोळ्या झाडून संपवण्यात आलं. अशातच मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ यांनी काल गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

दरम्यान, 5 जानेवारी रोजी दुपारी कुख्यात गुंड शरद मोहोळ याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. पुण्यातील कोथरूडमधील सुतारदरा परिसरात घराजवळच त्याचा साथीदार मुन्ना उर्फ साहिल पोळेकर याने साथीदारांच्या मदतीने गोळीबार केल्याचे पोलीस चौकशीतुन समोर आले. या दिवशी दुपारी 1.30 वाजता दरम्यान डॉन शरद मोहोळ याला जखमी अवस्थेत रूग्णालयात नेण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

मोहोळची पूर्व वैमनस्यातून ही हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. मग अशातच शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. कुख्यात गुंड शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मला न्याय मिळावा अशी मागणी केली असल्याचे सांगितले जात आहे. स्वाती मोहोळ या भाजप पुणे शहर महिला आघाडीच्या पदाधिकारी आहेत.

त्यानी 2022 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. तेव्हा या पक्षप्रवेशाची जोरदार चर्चा झाली होती. स्वाती मोहोळ यांचा कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील, माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला होता. दरम्यान, स्वाती शरद मोहोळ यांना त्याच्या वॉर्डमधून नगरसेवकाचं तिकीट मिळणार असल्याची दबक्या आवाजात चर्चा होती.

स्वाती मोहोळ यांच्या माध्यमातून शरद मोहोळ राजकारणात एन्ट्री करणार असल्याचं सुद्धा काही ठिकाणी सांगितले जात होतं. गुंड शरद मोहोळ याची ज्या दिवशी हत्या झाली त्याचदिवशी त्याच्या लग्नाचा वाढदिवस होता. मात्र शरद मोहोळवर त्याचाच साथीदार असलेल्या साहिल पोळेकर गोळीबार करत त्याला संपवलं.

मात्र, काही पोलीस गुप्तचर यंत्रणेच्या मते, पोळेकर फक्त मोहरा असून त्याचा मामा नामदेव कानगुडे हा मास्टरमाईंड असल्याचं बोललं जात आहे. कारण शरद मोहोळ आणि नामदेव कानगुडे यांच्यात वाद झाला होता. याच राग डोक्यात धरत पोळेकरला मोहोळ यांचा गेम केला असल्याचे सांगितले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *