नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.
“श्री स्वामी समर्थ” आपण जेव्हा सकाळ-संध्याकाळ देवाची देव पूजा करतो, घरात पूजा अर्चना करतो. तेव्हा आपण मुख्यतः देवांसमोर दिवा लावत असतो . देवासमोर दिवा लावताना काही गोष्टींकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक असते. आणि या गोष्टींची काळजी घेणे सुद्धा आवश्यक असते. आपण देवपूजा करताना सर्वात आधी दिवा लावतो.
कारण दिवा लावल्याशिवाय आपण केलेली कोणतीही पूजा अपूर्ण असते. आपण जी काही पूजा करतो, ती सर्व भगवंतापर्यंत पोहचण्याचे कार्य हा आपला दिवा च करत असतो. म्हणून देव पुजा करण्यापुर्वी सर्वात आधी दिवा लावावा. देवघरात दिवा लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होतात. दिवा लावण्यापूर्वी काही गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
आपण देवघरात जो दिवा लावतो, तो दिवा लावण्यापूर्वी घासून पुसून लख्ख करावा नंतरच तो दिवा लावावा. दिवा कुठल्याही दिशेनी तुटलेला फुटलेला किंवा गळणारा असू नये. कारण काही घरांमध्ये दिव्यावर तेलाचा थर आलेला असतो तोच दिवस सतत लावला जातो.
यामुळे देव आपल्यावर कधीच प्रसन्न होणार नाही कारण जिथे स्वच्छता असते अशाच ठिकाणी भगवंताचा वास असतो. म्हणून देवघरात दोन दिवे ठेवावेत व रोज एक दिवा घासून पुसून स्वच्छ ठेवावा आणि दुसऱ्या दिवशी स्वच्छ दिवा वापरावा काही घरांमध्ये तेलाचा दिवा लावला जातो.
काही ठिकाणी तुपाचा दिवा लावला जातो तर काही घरांमध्ये तेलाचा किंवा तुपाचा असे दोन दिवे लावले जातात. तेलाचा दिवा कष्ट, बाधा, संकटे व अडचणींपासून सुटका मिळण्यासाठी लावला जातो. तर तुपाचा दिवा धन संपत्ती व सुख-समृद्धी मिळवण्यासाठी लावला जातो. तसेच मनोकामना पूर्ती साठी सुद्धा अशे दिवे लावले जातात.
ज्यांच्याकडे गाईचे शुद्ध तुप असतील त्यांनी तर दररोज शुद्ध तुपाचा दिवा अवश्य लावा. परंतु आजकाल सर्व गोष्टींमध्ये भेसळ असल्याने बहुतेक जण तेलाचा दिवा लावणे पसंत करतात. ज्या व्यक्तींच्या घरी गायचे तूप काढले जाते त्यांनी आवश्य घरात तुपाचा दिवा लावावा. यामुळे अनेक फायदे होतात. तुपाचा दिवा, तेलाचा दिवा असे दोन्ही प्रकारचे दिवे लावले जातात.
परंतु कोणता दिवा कोणत्या दिशेला लावावा हे आपल्याला माहित नसते. या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्यामुळे आपल्या देवपूजेला लाभदायक व नुकसानदायक ठरू शकते. तुपाचा दिवा नेहमी आपल्या उजव्या बाजूला म्हणजे देव घराच्या डाव्या बाजूला लावावा, तर तेव्हाचा दिवा नेहमी आपल्या डाव्या बाजूला म्हणजे देवघराच्या उजव्या बाजूला लावावा.
आपण मंदिरामध्ये गेलो की आपल्याला ही लक्षात येते. अशा प्रकारे दिवा लावल्यास आपल्याला लाभ होतात. त्याबरोबर दिव्याची वात कोणत्या दिशेला असावी याविषयी आपल्याला माहित असणे आवश्यक आहे. आपले देवघर हे नेहमी ईशान्य दिशेला असावे. आणि ज्यावेळी आपण देवघरात दिवा लावतो तेव्हा त्या दिव्याची ज्योत पूर्व किंवा उत्तर दिशेला असावी.
पश्चिम किंवा दक्षिण दिशेला दिव्याची ज्योत असू नये. पूर्व किंवा दक्षिण दिशेला दिव्याची ज्योत असल्यास धनप्राप्तीचे योग बनतात व आपल्या मनोकामनाची पूर्ती होते. चुकीच्या दिशेला दिव्याची ज्योत लावल्यास आपल्याला कोणत्याही प्रकारचा फायदा होत नाही. म्हणून अशा प्रकारे तुपाचा दिवा लावल्यास आपल्या मनोकामनाची पूर्ती होते व सुख-समृद्धी मध्ये वाढ होते.
आणि तेलाचा दिवा लावला तर आपल्या सर्व कष्ट बांधावर अडचणींचे निवारण होते. घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. परंतु दिवा लावताना या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे. कधीही तेल व तूप एकत्र करू नये. जर तुम्ही तेलाचा दिवा लावत असाल तर त्यात तूप टाकू नका. जर तुपाचा दिवा लावत असाल तर त्यात तेल टाकू नका. तुपाचा व तेलाचा वेगवेगळा दिवा असावा.
जे व्यक्ती नियमितपणे देवाजवळ दिवा लावतात त्यांना नक्कीच समृद्धी मिळते व त्यांच्या कष्टाचे निवारण होते परंतु या गोष्टीकडे लक्ष द्यावे की कोणतेही कार्य करताना नियम पूर्व व योग्य पद्धतीने केले तर त्याचे फळ आपल्याला नक्कीच प्राप्त होते. जर तुम्ही खूप कष्ट करता परंतु त्याचे योग्य फळ तुम्हाला मिळत नसेल.
तुमच्या व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल, तुम्हाला नोकरीची आवश्यकता असेल परंतु नोकरी मिळत नसेल. तर तुम्ही कर्जबाजारी झाला आहात अशा वेळी या सर्व परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी यासाठी विष्णू आणि देवी लक्ष्मी समोर शुद्ध तुपाचा दिवा लावावा यांनी आपली सगळी अडचण सगळ्या समस्या दुःख यांचे निवारण होते. तर देवासमोर दिवा लावताना या छोट्या छोट्या मात्र महत्त्वाच्या गोष्टी नेहमी आपल्या लक्षात असायला पाहिजे.
सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.