दरम्यान, सध्या सगळीकडे IPL 2023 साठी खेळाडूंचा लिलावाची चर्चा होत असल्याचे दिसून येत आहे. तसेच ipl प्रेक्षक सुध्दा कोणता खेळाडू कोणत्या संघासाठी उपलब्ध आहे याचे prediction सुद्धा करत आहेत.
दरम्यान, येत्या 23 डिसेंबर रोजी Ipl लिलाव 2023 कोची येथे होणार आहे. गेल्या वेळेसारखा मोठा लिलाव होणार नाही, पण अनेक खेळाडू श्रीमंत होऊ शकतात. सर्व फ्रँचायझींनी 15 नोव्हेंबरपर्यंत खेळाडूंची यादी सादर केली आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात लिलावासाठी खेळाडूंचा पूल तयार होऊ शकतो.
आता जवळपास सगक्याच क्रिकेटप्रेमीच लक्ष डिसेंबर मध्ये होणाऱ्या Ipl लिलावावर आहे, कारण सर्वच संघ मालक आपला संघ मजबूत करण्यासाठी या लिलावात पर्यत करतील.
तसेच त्यामुळे सर्व 10 संघांनी आयपीएल 2023 हंगामासाठी तयारी सुरू केली आहे. तसेच बीसीसीआयने खेळाडूंची नावे नोंदवण्याची शेवटची तारीखही जाहीर केली आहे. या वर्षी मिनी लिलावही होणार आहे.
आयपीएल फ्रँचायझी आणि ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील संघ दिल्ली कॅपिटल्सने मिनी लिलावापूर्वी केवळ पाच खेळाडूंना सोडले होते. तर 20 खेळाडूंना संघाने कायम ठेवले आहे.
राखून ठेवलेल्या खेळाडूंच्या या यादीत वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडूने T10 लीगमध्ये आपल्या बॅटने गोलंदाजांची धुलाई केली आहे. त्यामुळे आगामी आयपीएल हंगामात डीसीला खूप फायदा होऊ शकतो.
दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सचा अष्टपैलू खेळाडू रोव्हमन पॉवेल मुंबईत सुरू असलेल्या T-10 लीगमध्ये सहभागी झाला आहे. नॉर्दर्न वॉरियर्स संघाने त्याची कर्णधार म्हणून निवड केली आहे.
एका T-10 लीग सामन्यात, त्याने बांगला टायगर्सविरुद्ध केवळ 28 चेंडूत 271.43 च्या स्ट्राइक रेटने 76 धावा काढल्या आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला.
त्यामुळे, रोवमनच्या या खेळीमुळे त्याच्या धोकादायक फॉर्मचा आयपीएल संघ डीसीला मोठा फायदा होऊ शकतो. तसेच भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत अनेक वर्षांपासून डीसीशी जोडला गेला असून व्यवस्थापनाने त्याला संघाचा कर्णधारही बनवले आहे.
रोवमनच्या या खेळीने पंत नक्कीच खूश झाला असेल. त्याच्या या फॉर्मचा फायदा पंतलाही होऊ शकतो. दिल्लीने रोव्हमनला कायम ठेवले होते आणि तोही आपल्या संघाच्या विश्वासावर खरा उतरला आहे.
जर रोव्हमनने आयपीएल 2023 मध्येही आपला फॉर्म कायम ठेवला तर तो एकट्याने संघाला विजयापर्यंत नेऊ शकतो. टी-20 लीगमध्ये बांगला टायगर्सने नॉर्दर्न वॉरियर्ससमोर 10 षटकांत 118 धावांचे लक्ष्य ठेवले होते.
ज्याचा पाठलाग करताना संघाची सुरुवात खूपच खराब झाली. पण नंतरपर्यंत कर्णधार रोव्हमनने डाव सांभाळताना 10 चेंडूत सामना उलथवून टाकला.
यानंतर त्याने आपल्या डावात 9 षटकार आणि एक चौकार लगावला आणि यासह त्याने T-10 लीगच्या मागील चार सामन्यांमध्ये पहिला विजयही मिळवला.