नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.
“श्री स्वामी समर्थ” बरेच सेवेकरी नेहमी प्रश्न विचारत असतात, की आम्ही सकाळी देव पूजा करतो, देवांना स्नान घालतो, आणि बरेचसे पाणी ते उरलेले असते, तर आम्ही त्या पाण्याचे काय करावे? तुमच्या घरात सुद्धा सकाळी देव पूजा झाल्यानंतर काही तरी पाणी असेल, देवपूजेचे पाणी असेल, तर तुमच्या मनात प्रश्न येत असेल की ते पाणी आम्ही कुठे टाकायचे?
आणि आमच्याकडून काही चुक तर होत नाहीये ना? बरेच लोक तुळशीमध्ये सुद्धा ते पाणी टाकतात. एक गोष्ट तुम्ही इथे लक्षात ठेवा, देवपूजेचे पाणी तुळशीत कधीही टाकायचे नाही. देवपुजेचेच काय तर कोणतेही पाणी तुळशीत टाकायचे नाही.
तुळशीत फक्त स्वच्छ आणि पवित्र पाणीच टाकायला हवे. आणि जो व्यक्ती तुळशीला पाणी टाकत आहे ,तो ही पवित्र हवा, ना त्याने नॉनव्हेज खाल्लेला असावे, ना ही त्याने अंघोळ न करता पाणी कधीच टाकू नये.
तरी इथे प्रश्न येतो की देवपूजेचे पाणी टाकायचे तरी कुठे? तर सोपा आणि सरळ उपाय आहे. जेव्हा आपण सकाळी आपण देव पूजा करतो तेव्हा, कुंकूवाचे पाणी, किंवा देवाची आंघोळ घातलेले पाणी, किंवा काहीतरी आपण जे साफसफाई करत असतो आपल्या देवघरात त्याचे पाणी, हे सगळे पाणी आपण आपल्या घराच्या बाहेर एका कोपऱ्यामध्ये टाकावे.
जिथे कोणाचाही पाय पडणार नाही, किंवा आपण ते पाणी एखाद्या झाडाला टाकावे जस की आपल्या घराच्या बाहेर भरपूर झाडं असतात, त्या झाडांना आपण ते पाणी टाकू शकतो. पण तुळशीला कधीच ते पाणी टाकायचे नाही. आणि फुलांच्या झाडांनासुद्धा ते पाणी टाकायचे नाही.
मग इतरत्र आपण नारळाच्या झाडाला, आंब्याच्या झाडाला, किंवा इतर कोणत्याही मोठ्या झाडाला आपण ते पाणी टाकू शकतो. किंवा झाड नसतील तर एखाद्या कोपऱ्यात तुम्ही ते पाणी टाकू शकतात, जिथे कोणाचेही पाय पडणार नाही. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की कुंकवाचे पाणी, किंवा देव धुतलेले पाणी कधीच तुळशीला टाकायचे नाही.
भरपूर सेवेकरी ही चूक करत असतात, की देव पूजा झाल्यानंतर सकाळी ते पाणी ते तुळशीला टाकतात आणि त्यांच्या हातून ही खूप मोठी चूक होते कारण तुळशी खूप पवित्र मानली गेलेली आहे. ती एक लक्ष्मीचा अवतार मानली गेलेली आहे. म्हणून तिच्यात कधीच अस्वच्छ, देव धुतलेले पाणी कधीच टाकू नये. पाणी टाकायचं असेल तर पवित्र पाणी, स्वच्छ पाणी टाकावे.
सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.