नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.
“श्री स्वामी समर्थ” देवपूजा करून सुद्धा देव प्रसन्न होत नसेल, देवाची कृपा तुमच्यावर होत नसेल, तर भक्तहो लक्षात घ्या आपल्याच हातून कळत नकळत अशा काही चुका होत आहेत की ज्यामुळे आपल्यावर परमेश्वराची कृपा होत नाही. प्रत्येक गोष्टीचे नियम असतात. उन्हाळ्यात कडक ऊन पडणारच. पावसाळ्यात पाऊस पडणारच.
ज्याप्रमाणे निसर्गाचे नियम आहेत अगदी त्याचप्रमाणे ईश्वर भक्तीचे देवपूजेचे काही नियम आहेत, या नियमांना अनुसार जर देवपूजा केली तर देव खूप लवकर प्रसन्न होतो, लवकर पाहतो. देवपूजा करताना कोणत्या नियमांचं पालन आपण करावे. पहिली गोष्ट देवाला वाहिलेली फुले हे आपण कधीही स्वतःसाठी वापरू नये.
बऱ्याचदा आपल्या घरात ज्या मुली असतात, ज्या गृहिणी असतात, देवाला वाहिलेले फुले स्वतःसाठी वापरतात. तर ही चूक आपण करू नये. जेव्हा आपण देवाचं पूजन करतो देवासाठी आसन जे आपण अंथरले आहे आणि स्वतःसाठी अंथरले आहे. देवपूजा करताना आपण स्वतः सुद्धा आसनावर बसावे, एखाद कापड घ्यायचं असत किंवा पाट घेऊन आणि त्यावर बसून पूजा करायची असते.
आपलं आसन हे देवाच्या पातळीच्या निम्म पातळीवर म्हणजे खाली असावं. देव हे आपल्यापेक्षा उंचीवर वसलेले असावेत. बऱ्याच जणांच्या देवघराला कळस असतो, आपल जे देवघर आहे त्याला कधीही कळत असू नये. तुळशीपत्र वाहताना विशेष काळजी घ्या.
तुळशीपत्र वाहताना ते नेहमी पालथ वहावं आणि त्याचे देठ हे नेहमी देवाकडे असावे. विशेष करून भगवान विष्णूंना तुळशीपत्र वाहताना हे पालख वहाव आणि त्याचे डेट हे देवाकडे असावं. आपण दूर्वा अर्पण करतो श्रीगणेशांना या दुर्वा वाहताना दुर्वांची अग्रह म्हणजे टोक हे नेहमी आपल्याकडे असावी, काहीजण फळे वाहतात.
फळ वाहताना देट हे नेहमी देवाकडे असावे. बऱ्याच वेळा काही जण आपल्या इष्ट देवतेची स्थापना करतात, देवघरात एकच मूर्ती असते. देवघरात नेहमी एकापेक्षा जास्त मूर्ती असाव्यात देवघरात कधीच एक मूर्ती ठेवून पूजा करू नका. तिच्या सोबतीला अजून एक एखादी मूर्ती असावी.
बेलाच्या पानांन बाबत. महादेवाला बेलाचे पान अत्यंत प्रिय आहे आणि हिंदू धर्मशास्त्र असं मानत की बेलाचे पान हे नेहमी वाहताना पालथ घालाव. कोणत्याही देवीचे पूजन करताना केवळ कुंकवाने त्या देवीचा उच्चार केला जातो, बरेच जण हळद आणि कुंकू दोन्ही लावतात. दोन्ही चालेल मात्र त्या ठिकाणी कुंकू हे अनिवार्य आहे.
देवीला कुंकू हे नेहमी लावायला हवं. नैवेद्य हा नेहमी देवाच्या उजव्या बाजूला ठेवावा.जी मूर्ती आहे त्या मूर्तीच्या उजव्या हाताला. देवघरात बऱ्याच मुर्त्या असतात. म्हणून देवघराच्या उजव्या बाजूला आपण जिथे बसलो आहोत त्याच्या आपोआप डाव्या बाजूला येईल. नैवेद्य ठेवन्याआधी त्याच्या खाली पाण्याने चौकोन काढा आणि मग नैवेद्य ठेवा.
तसेच दुर्वा असतील तुळशीपत्र असेल फुले असतील त्याने या नैवेद्यवर प्रक्षण करा. काही नैवेद्य असतात ते काही देवी-देवतांना खूप आवडत असतात. भोलेनाथ यांना दहीभात खूप प्रिय आहे. सोमवार असेल आणि तुम्ही महादेवाची पूजा करतात तर दहीभाताचा नैवेद्य नक्की अर्पण करा.
गणपती बाप्पाना मोदक अतिशय प्रिय आहेत. सुर्यदेवांना गुळ भात खूप आवडतो. भगवान श्री विष्णूंना दूध-भात आवडतो, दूध भाताचा नैवेद्य नक्की दाखवावा.आणि देवीला सांज्याचा नैवेद्य अत्यंत प्रिय असतो. देवाला तुम्ही उदबत्ती लावता किंवा कापराणे आरती लावता.
आरती ओवाळताना किंवा उदबत्तीने ओवाळतांना ती नेहमी घड्याळाच्या दिशेने ओवाळावी म्हणजे घड्याळाचा काटा जसा फिरतो, आशा प्रकारे आपण आरती ओवाळवी. जेव्हा तुम्ही आरती ओवाळता तेंव्हा त्या मूर्तीवर त्याचा प्रकाश पडावा. जेव्हा आपण नैवेद्य अर्पण करतो तेव्हा नैवेद्य दाखवल्यावर लगेचच खाऊ नका.
किंवा कोणाला खाऊ देऊ नका थोडा वेळ तो त्या देवासमोर असू द्या आणि त्यानंतर तो स्वतःचा किंवा इतरांना वाटू शकता. प्रदक्षिणा नेहमी विषम संख्येत म्हणजेच १,३,५,७,९ अशाप्रकारे घालू शकता. २,४,६,८ अशा सम संख्येत घालू नये. जर प्रदक्षिणा घालण्यास मंदिराच्या बाजूने जागा नसेल तर तुम्ही स्वतः भोवती प्रदक्षिणा घालू शकता.
उजवीकडून डावीकडे ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रमाणे प्रदक्षिणा घालावी. देवपुजेबाबत कोण कोणते नियम पाळावे हे आपण पाहिले. “श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।।”
सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.