देवपूजा करताना आपल्याला काही संकेत मिळत असतात ।। याचा नेमका अर्थ काय? ।। जर देवपुजा करताना तुम्हाला हे ६ संकेत मिळाले तर समजा साक्षात देव तुमच्या सोबत आहेत ।। पहा कोणते आहेत संकेत या लेखात !

कला देश-विदेश शिक्षण

श्री स्वामी समर्थ” आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हिंदू धर्मात देवपूजा, भगवंतांची पूजा करण्याचे फार मोठे महत्त्व आहे. असं म्हटलं जातं की मनात श्रद्धा ठेवून मनापासून देवपूजा केली तर आपल्यावर देवाची कृपा नक्की होते. देव आपल्यावर प्रसन्न होतात. आज आपण देवपुजे बद्दल काही गोष्टी जाणून घेणार आहोत.

ज्यामुळे आपल्याला कळेल की देव आपल्या सोबत आहे. कधी कधी देवपूजा करताना आपल्याला काही संकेत मिळतात. पण आपण त्या संकेतांकडे दुर्लक्ष करतो. आपण ते संकेत मानत नाही आपल्याला हे लक्षात येत नाही की, हे संकेत आपल्याला साक्षात देवाने दिलेले आहेत.

या संकेतांचे अर्थ असा असतो की, आपल्यावर कसं नाही देवाने आपले पूजा स्वीकारली आहे. जाणून घेऊया कोणते आहेत ते संकेत.

१. धूप किंवा अगरबत्ती: स्वामी प्रिय भक्ताहो आपण देवपूजा करताना धूप किंवा अगरबत्ती लावतोच. देवपूजा करत असताना त्या अगरबत्तीचा किंवा धुपचा धूर तुमच्या संपूर्ण घरात पसरला, की तुम्हाला अचानक सकारात्मक वाटू लागते. तेव्हा समजून जा की साक्षात भगवंत आपल्या घरी प्रकट झाले आहेत.

लवकरच आपले भाग्य चमकणार आहे. आणि पैसाच पैसे येणार आहे. ही सकारात्मक ऊर्जा आपल्या आजूबाजूला जाणवायला लागते. आपल्याला आपल्या घरातील वातावरण अचानक सुखद व प्रसन्न वाटू लागते.

२.भिकारी किंवा लहान बालक: भक्ताहो बऱ्याच वेळेला आपल्या दारी भिकारी किंवा इतर कोणी काहीतरी मागण्यासाठी येतात. जर कधी देवपूजा झाल्यानंतर दारात भिकारी किंवा कोणी लहान बालक काही मागण्यासाठी आले असतील तर समजून जा की आपल्या दारात साक्षात भगवंत आपली परीक्षा घेण्यासाठी आले आहे.

तर त्यांना रिकाम्या हाताने परत पाठवू नये. घरातील काहींना काही खाद्य पदार्थ देऊन त्यांचं पोट भराव. लक्षात ठेवा अन्न दान हे श्रेष्ठ दान समजलं जातं. अन्न दान केल्याने आपल्या संपत्तीत वाढ होते. त्यामुळेच पूजेनंतर भुकेल्याला अन्न देणे हा देवाला प्रसन्न करण्याचा खूपच मोठा उपाय आहे.

३.दिव्याचा प्रकाश: आपण पूजा करत असताना देवाला हात जोडून प्रार्थना करतो. आपण पूजा करत असताना अचानक जर दिवा प्रकाशमय झाला दिव्याची ज्योत वाढली. तर समजावे भगवंत साक्षात आपल्या समोर आहे आणि आपण जी काही प्रार्थना केली ती त्यांच्यापर्यँत पोहचली आहे आणि त्यांनी ती स्वीकारली आहे, आणि भगवंताचा आपल्यावर आशिर्वाद आहे.

हे संगण्यासाठी त्यांनी दिलेला हा संकेत आहे. त्यामुळे भगवंत आपल्या समोर असताना आपल्या जीवनातील ज्या काही अडचणी असतील किंवा काही इच्छा असतील तर त्या देवासमोर सांगाव्यात आपल्या सगळ्या अडचणी किंवा इच्छा पूर्ण होतील.

४. शुभ चिन्ह: आपण खूप वेळा पाहिलं असेल की आपण लावलेला धूप किंवा अगरबत्तीच्या धुरामध्ये वेगवेगळे आकार दिसत असतात. तर आपण देवपूजा करताना जर आपल्या अगरबत्ती किंवा धुपाच्या धुरामध्ये जर काही ओम, स्वस्तिक किंवा काही शुभ चिन्ह दिसलं.

तर समजून जावं की देव आपल्या पूजेने खूपच प्रसन्न झाले आहेत आणि लवकरच आपल्याला अडचणी दूर होऊन आपल्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहे.

५.पाहुणे: स्वामीप्रिय भक्त हो हिंदू धर्मात अतिथींना देव मानले जाते. तुम्ही पूजा करताना अचानक जर कोणी पाहुणे आले तर समजा साक्षात देव तुमच्या घरी प्रकट झाले . देव तुमच्या घरी कोणत्या ही रुपात येऊ शकतात, तेव्हा त्यांचं आदरातीथ्य करा. त्याचा राग राग करू नका.

त्यांची जमेल तेवढी सेवा करा. अशाने देव प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतील.पाहुणे येणे हा देवाचा एक संकेत मनाला जातो. आणि देव प्रसन्न होऊन सगळे संकट दूर होऊन देवी लक्ष्मीचा वास आपल्या घरी सदैव राहील. आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांनाच केव्हा ही मन दुखवू नये, त्याचा नेहमी आदर करावा. त्याची सेवा करावी.

६. फुलाचा संकेत: देवपूजा करताना देवाला आपण फुल अर्पण करतो. जर देवपूजा करताना आपण अर्पण केलेले फुल आपल्या समोर पडले तर समजा देव आपल्या पूजेने प्रसन्न झाले आहेत. आणि त्यांनी आपल्याला आशीर्वाद दिला आहे. फुलरूपी आशीर्वाद देऊन भगवंत आपल्यावर प्रसन्न आहे.

हे सांगून आपल्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतील दुःख निघून जातील हे सांगत असतात. स्वामीप्रिय भक्त हो देवपुजा करताना जर तुम्हाला असे संकेत मिळाले तर समजून जा देव तुमच्यावर प्रसन्न आहेत त्यांचा तुम्हाला आशीर्वाद आहे.

सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *