आपल्या घरातील देवघरामध्ये त्याची रचना कशी असावी? आणि त्या संदर्भातील नियम जे काही धर्मशास्त्रामधे सांगितले आहेत, ते कोण कोणते आणि कसे-कसे आहेत, आणि ते कश्या रीतीने पाळावेत. की जेणे करून त्या देवघराच्या माध्यमातून आपल्या घरामधे निर्माण होणारी जी काही शुभ सकारात्मक ऊर्जा आहे,ती मोठ्या प्रमाणात आणि चांगल्या प्रकारे तयार होईल.
आपल्या देवघराची रचना कशी असावी जेणेकरून आपल्या वास्तू मधील असणारी शुभ ऊर्जा, सकारात्मक ऊर्जा ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढवता येईल.आपल्या घरामधे असलेलं देवघर हे नेहमी “पूर्व-पश्चिम” दिशेमधे असावं. म्हणजे पूर्वेच्या किंवा पश्चिमेच्या भिंतीवर असावं.
किंवा त्या दिशेला देवघराची म्हणजेच पुजघरची व्यवस्था असावी. जेणेकरून याच्यामधे सुद्धा पूर्व दीशेला देवारा हा सर्वात उत्तम. कारण ज्या वेळेला आपण पूजा, प्रार्थना, मंत्रपाठ हे देवाकडे पाहून करत असतो. त्याचवेळेस साहजिकच आपल तोंड सुद्धा पूर्व दिशेला येत.
आणि त्या मुळे पूर्व दिशेकडून येनाऱ्या सूर्य प्रकाशाचे शुभ ऊर्जेचे परिणाम त्या साधकाला म्हणजेच त्या वास्तू मधे राहनाऱ्या व्यक्तीला पर्यायाने त्या संपूर्ण कुटुंबाला खूप चांगल्या प्रकारे त्याचा लाभ घेता येतो. परंतु, पश्चिम दिशेला सुद्धा देवारा असल्यास त्याचा ही फळ खूप चांगल मिळत.
त्याचप्रमाणे ज्यावेळेला आपण देवघराची रचना करतो त्यावेळी वास्तू शास्त्रामध्ये देवघराची रचना ही ” पूर्व-ईशान्य, किंवा पूर्व दिशेत असावं ” अस निक्षून सांगितलं आहे. कारण पूर्व दिशेच्या माध्यमातून सूर्यप्रकाशातून आपल्या वास्तू मध्ये येणाऱ्या जे ( ultra-violet ) किरण आहेत.
त्याच्या मध्ये जीवनशक्तीचा पूर्णपणे सगळ्यात चांगल्या शक्तीचा समावेश असतो आणि ह्या (ultra-violet) या नीलकिरणांचा फायदा आपल्या वास्तूला व्हावा, पर्यायाने वास्तूमधे त्या देवघरामधे त्याचा परिणाम चांगला झाल्यामुळे संपूर्ण व्यक्तीला त्याचा चांगला फायदा होतो.
आणि म्हणूनच सूर्य प्रकाश ज्या ठिकाणी मुबलक प्रमाणामध्ये, जास्त प्रमाणामधे, विशेष करून सकाळची कोवळी ऊन ज्या ठिकाणी आपल्या वास्तू मधे येतात त्याठिकाणी देवघराची रचना असावी, अस शास्त्रात सांगितलेलं आहे. आपण ज्या देवघरामध्ये किंवा देवाऱ्यामधे पूजा करणेसाठीची वेळ निवडतो,
आणि जेव्हा पूजेसाठीची आपण देवाशी संबंधित असलेल्या देवघरामध्ये किंवा देव्हाऱ्यात जातो, तेव्हा चांबडयाच्या वस्तू शक्यतो आपल्या जवळ टाळाव्यात. उदाहरणार्थ, आपण आपल्या पॅन्टला लावत असलेला चंबड्याचा पट्टा, किंवा पैशाचं पाकीट, हे जर चांबड्याच असेल तर ते आवर्जून आपल्या पासून लांब ठेवा आणि सगळ्यात महत्वाची तिसरी गोष्ट म्हणजे,
देवघरामध्ये मृत व्यक्तीचे, आपल्या पूर्वजांचे फोटो किंवा काही देवघरामध्ये त्यांचे टाक केलेले दिसतात, त्यांच्या प्रतिमा चांदीच्या किंवा तांब्याच्या पत्र्यावरती कोरून ठेवलेल्या असतात. बऱ्याच ठिकाणी असा समज असतो की, आपले पूर्वजांची सुद्धा आपण पूजन करायला पाहिजे.
हे जरी खरे असले तरी सुद्धा देवघरामध्ये मात्र आपल्या पूर्वजांचे फोटो किंवा आपल्या मृत व्यक्तींचे फोटो हे शक्यतो ठेवू नयेत. किंबहुना हे संपूर्ण त्या ठिकाणाहून काढावे. आपल्या पूर्वजांची फोटो ठेवण्याची वास्तू शास्त्राप्रमाणे म्हणजे सगळ्यात उत्तम दिशा आहे ती म्हणजे दक्षिण दिशा आहे,
असे शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. आता दक्षिण दिशा का तर दक्षिण दिशा ही पितृदेवतेची दिशा आहे. म्हणजे “यमदेवतेवतेची दिशा” आहे, असे सांगितलेलं आहे. आणि म्हणूनच आपल्या पित्रांचा, आपल्या पूर्वजांचा असलेले फोटो जर आपल्या घरात ठेवायचे असतील तर ते देव्हाऱ्यात न ठेवता दक्षिण दिशेच्या भिंतीवर ठेवल्यास उत्तम.त्या निमित्ताने आपले तोंड दक्षिणेला होत.
आणि हो ज्यावेळेला आपण कुठल्याही कामानिमित्ताने आपल्या देवाचं, आपल्या गुरूचा आशीर्वाद घेवून घराच्या बाहेर पडतो, त्याच प्रमाणे आपल्या पीत्रांचा आशीर्वाद सुद्धा फार महत्वाचे असतात. आणि म्हणून दक्षिण दिशेला तोंड करून आपण ” ओम पितृदेवताय नमः” असा मंत्र पाठ करून,
आपल्या पित्रांच स्मरण करून त्यांचे सुद्धा आशीर्वाद घेवून जर आपण घराबाहेर आपल्या कामासाठी पडलो तर निश्चित त्याचा खूपच चांगला फायदा होताना दिसतो. त्याचप्रमाणे आपल्या देवघरामध्ये ज्या काही आपल्या देवतेच्या प्रतिमा, मूर्ती, फोटो हे जे काही असेल ते जास्त संख्येने असू नये.
कधी कधी काय होते की, गणपतीच्या चार, पाच मूर्ती, श्री कृष्णाची चार, पाच मूर्ती किंवा इतर काही देवतांचे फोटो हे आपण कुठेही प्रवासामध्ये गेलो की, किंवा काही व्यक्तींकडे गेलो की,किंवा काही धार्मिक स्थळी गेलो की, त्या ठिकाणावरून आणतो. आपल्याला आवडतात म्हणून आणि मग आपल्या देवघरात मांडणी करतो.
पण शास्त्र अस सांगत की देवघरामधे एकच देवतेच्या फोटो, प्रतिमा, मूर्ती ह्या एकापेक्षा जास्त नसाव्या आणि जर त्या जास्त असतील, तर अगदी कोणत्याही एखाद्या सोमवारी, गुरुवारी, पौर्णिमेच्या दिवशी, प्रतिपदेच्या दिवशी, त्यापैकी एकेक मूर्ती ठेवून, बाकीच्या सगळ्या मूर्ती विसर्जित कराव्यात आणि विसर्जनचा मंत्र म्हणावा.
हातामधे अक्षता घेवून की मी ह्या देवतेंच विसर्जन करीत आहे , आणि अस म्हणून त्यांच्यावर अक्षता सोडून त्या मूर्ती विसर्जित करून अगदी बाजूला ठेवून द्याव्यात. किंवा एखाद्या मंदिरामध्ये त्या देवून टाकाव्यात की जेणेकरून आपल्या मंदिरामध्ये असलेल्या, आपल्या देवघरामध्ये असलेल्या अनेक मूर्ती एकच ठिकाणी राहणार नाहीत.
त्याचप्रमाणे, मूर्तीची उंची किती असावी असे खूप जणांना प्रश्न असतो, मूर्तीची उंची जी आपण देवघरात ठेवणार आहोत ती जास्त मोठी नसावी . शास्त्रगर सांगतात की आपल्याकडे असलेली मूर्ती ही साधारण आपल्या अंगठ्या एवढ्या आकाराची असावी.
म्हणजे अंगुष्टामात्र मूर्ती ही देवघरामधे, पुजेमधे ठेवण्यासाठी शास्त्रगर यांनी सांगितले आहे. ज्या वेळेला आपण देवघाराची रचना करतो त्यावेळेला मागच्या बाजूला फोटो त्यापुढच्या बाजूला मूर्ती, त्याचप्रमाणे पूर्व दिशेच्या भिंतीवर जर देवारा असेल तर डाव्या हाताला,
म्हणजे उत्तरेच्या भागामधे मंगल कलाशची स्थापना करावी, तर उजव्या हाताला म्हणजे दक्षिणेच्या बाजूला आपल्या लंबदिपाची म्हणजे सतत जळणारा जो दिवा सतत आपल्या घरात असतो, त्याची रचना करावी. काही देवाऱ्यामधे दिव्याची रचना ही मध्यभागी केली जाते त्यामुळे आपल्याला देवतेचे दर्शन घ्यायला अडचण होते.
त्यामुळे मधला भाग हा उघडा असावा मोकळा असावा. अगरबत्तीच घर सुद्धा आपल्या डाव्या हाताला म्हणजे कलशाच्या पुढे ठेवल्यास उत्तम. शिवप्रतिमा देवघरात असावी की नसावी असा अनेकांचा प्रश्न असतो, शिव हे स्मशानदेवता आहे म्हणून आपल्या घरामधे असलेल्या देवघरामध्ये शिवप्रतिमा न ठेवावी.
शिवलिंग चालते परंतु त्याचा आकार सुद्धा हा अंगठ्या एवढा असावा. जास्त मोठ शिवलिंग नसावं. त्याचप्रमाणे देवाऱ्यामधे आपण कलश ठेवतो, दिवा ठेवतो, सकाळी ज्यावेळेला आपण प्रातकाळी देवाची आपण पूजा करतो, त्या वेळेला एक छोटंसं निरंजन त्यामधे शुद्ध गायीचं तूप भरून त्या निरांजनाने पूजा झाले नंतर सगळ्यात शेवटी आपण देवाला ओवळावे
आणि हा दिवा जो आहे जो शुद्ध गायीच्या तुपाचा आहे तो घंटानाद करत आपल्या संपूर्ण वास्तूमधे प्रदिक्षणा मार्गाने फिरवून पुन्हा देवाऱ्यात ठेवावा. त्यावेळेला शक्यतो “ओम शांती शांती शांती”, किंवा आपल्या कुलदेवतेचा जप, किंवा आपल्या देवीचा जप करावा
उदरणार्थ , “सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरि, नारायणी नमोस्तूते” असा प्रकारचा मंत्र जपात करत आपल्या संपूर्ण वास्तूमधे हा दीपक प्रदक्षिणा मार्गाने फिरवत न्यावा जेणेकरून संपूर्ण वास्तूमधे तुम्ही उर्जावान होण्यासाठी खूपच छान मदत मिळते.
त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी जे आपण आदल्या दिवशी वाहिलेली जी काय फुल असतील, किंवा हार असेल तो काढून झाल्यानंतर त्याचा वास घ्यावा, सुगंध घ्यावा. आणि मंग नंतर तो निर्माल्य झालेली फुल ही आपल्या फुलाच्या पिशवीमध्ये ठेवून द्यावी. देवघरा संबंधी आपण कोणकोणते नियम पाळावेत याची ही माहिती न याचा आपल्याला निश्चितच चांगला परिणाम दिसेल.
सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.