आपले आवडते देवघर कसे असावे लाकडी कि संगमरवरी ।। देवघर कशा पद्धतीने असले पाहिजे याविषयीची योग्य माहिती जाणून घ्या या लेखात !

कला प्रादेशिक शिक्षण

देवघर कसे असावे, देवघर कशा पद्धतीने असले पाहिजे आणि देवघर संगमरवरी असाव कि लाकडाच असाव का बांधलेल असाव. तर मित्रांनो देवघर आपल्या सगळ्यांच अतिशय महत्वाचा आवडता महत्वाचा विषय. जे देवघर म्हणजे घराचा आत्मा समजला जातो. आत्मा हे शरीर आहे आणि त्या शरीराचा आत्मा म्हणजे आत्मा आहे .

तस घराचा आत्मा आपल देवघर आहे कारण त्या देवघरापाशी आपण एकरुप होतो, एकनिष्ट होतो. आणि नतमस्तक होतो. मग अस देवघर कस असल पाहिजे? तर ते चौरंगावर ठेवलेल पाहिजे, का पाटावर मांडलेल पाहिजे, का एक छोटासा डबा आहे आणि त्यावर एक फळी ठेवलीये आणि मग त्याच्यावरती देव मांडलेत.

फळी वरती किंवा एखाद्या चौरंगवरती किंवा एखाद्या टेबला वरती, टिपॉय वरती, कुठेतरी कप्प्यामध्ये हे जे देव ठेवलेले आहेत ते काय भातुकलीचा खेळ आहे का? नाही . तर देव आणि देवाची मुर्ती ही पवित्र ऊर्जा आहे. प्रचंड बळ, आत्मबळ, शक्ती देणारी ताकदवान अशी ती देवता समान अशी ती मुर्ती आहे.

त्यामूळे मित्रांनो त्या मूर्तीचा आपल्याला मान राखला पाहिजे. ती जी देवता आहे आपल्या घरात कुळधर्म कुळचार चालतात. आपल्याकडे सर्व कुळधर्म कुळचारासाठी जे लागणारे कुळदैवतांचे टाक आहे ते आहेत, शंख आहे, घंटा आहे, बालाजी आहे, श्रीकृष्ण आहे, अन्नपुर्णा आहे, शंकराची पिंड आहे, त्याच्यासमोर नंदी आहे.

अनेक घरांमध्ये शाळीग्राम सुध्दा असतो. स्वामी समर्थ ची मुर्ती आहे, साईबाबांचा फोटो आहे, गुरूचे कोणतेतरी एक तिथे अस्तिव आहे असे विविध प्रकारे सजलेले आपले देवघर अतिशय सुंदर, आकर्षक आणि चांगलेच पाहिजे. इथे अनेक लोक स्वत:च्या घराच्या इंटेरीयर साठी पन्नास पन्नास, साठ साठ लाख रुपये फक्त घर सजवण्यासाठी खर्च करतात आणि देवघर म्हणजे कुठेतरी कोपऱ्यात देव बसुन ठेवायचे.

त्या देवाला लोकांनी बघू नये म्हणून कपाटात बंद करायचे वरतून पडदे लावायचे. वेगवेगळ्या पध्दतीच गणपतीच डेकोरेशन केल्याप्रमाणे त्यावर लाईट टाकायचे. कृपया मित्रांनो अस करू नका. तुमच देवघर एक अस हवय. एकतर शुध्द संगमरवरी किंवा सागवाणी लाकडाचे अथवा शिसव लाकडाचे असावे.

मग ते उंबराच्या लाकडाचे आहे, कुठल्यातरी वेगळ्याच लाकडाचे आहे , प्लॅउड नी बनवलेले आहे, पत्रांनी बनवलेले आहे, चांदीच्या रंगाच्या आकाराच्या पत्र्यानी बनवलेल आहे, देवघर काचेच चालत नाही पत्र्याच चालत नाही, लोखंडाचे चालत नाही, देवघर प्लॅउडचे सुध्दा चालत नाही.

दोनच सुंदर आणि स्वस्त ऑप्शन आपल्याला देवघरासाठी ते कोणते ? प्युअर पांढरे संगमरवर, पांढरे संगमरवर तुम्हाला कोठेही मिळत. साधारणता: आपण बघतो की हायवेला ही सगळी दुकान असतात. कि संगमरवराच आखीव रेखीव काम करणारी ही सगळी जी मंडळी आहे ती सुंदरपैकी अस देवघर तयार करत असतात.

मग मित्रांनो लक्षात ठेवा की हे देवघर सुंदर आकर्षक का हव. जर देवानी तुम्हाला त्याच्या कृपेने सुंदर आकर्षक दिसायला छान अस देवघर दिलेल आहे, तर मला सांगा तुम्ही त्या देवाला ओभड धोबड कस चुकीचं देवघर देता. तुम्ही त्या देवाला सुध्दा सुंदर आकर्षक देवघर असाव.

गेले अनेक वर्ष माझ्याही घरामध्ये सुंदर संगमरवरी देवघर मी जेव्हा नविन घरात रहायला गेलो तेव्हा आणल. मी विचार केला अरे या परमेश्वरानी छान आपल्याला एवढ सुंदर घर दिलय. वास्तू नुसार चांगल घर दिलय . मग आपण सुध्दा त्याला सुंदर देवघर द्यायला पाहिजे. मी सुध्दा वेगवेगळ्या शॉप मध्ये जाऊन ते देवघर चोइस केल.

सुंदर आकर्षक संगमरवरी त्याला महीरप आहे, छान असे नक्षिदार खांब आहेत त्याच्यावरती प्रभावळ आहे, कळस सध्या चालत नाही कारण देवघराला कळस कधीही चालत नसतो. मग विचार आला की आपण सागवाणी लाकडाच करुन घेऊ. पण अस होत मित्रांनो ओरिजनल सागवाणी जे काय मंदिर तयार करणारी लोक आहेत ती कमी आहे पण मला सर्वात चांगला ऑप्शन वाटला की माझ देवघर हे आपल्या घरच्या शुभ दिशेमध्ये ठेवतोय.

तर नैसर्गिक स्वरुपात आलेला दगड ज्याच्यामुळे मंदिर बनतात, ज्याच्यावरती मंदिर तयार केल जात अस हे मंदिर जे बनल जात ते बनत पांढऱ्या संगमरवरानी मग त्याच देवघर आपल्या देवाला द्याव अशी माझी इच्छा झाली आणि ते देवघर मित्रांनो मी देवासाठी चॉईस केल. आज अनेक वर्ष माझ्या घरामध्ये ते पांढर संगमरवरी देवघर आहे.

मग आता याच्यातून तुम्ही बेसिक लक्षात घ्या की तुमच घरातल देवघर हे सुंदर आकर्षक मनाला भावेल अस पॉजिटिव पहिजे. उगच त्याला कोणतातरी रंगकाम केलेल आहे, कोणत्याही पद्धतीने त्याच्यावरती लाईटिंग सोडलेली आहे, देवघरामध्ये कोणत्याही प्रकारच वस्त्र ठेवलेल आहे अस नाही.

जस आपल घर आणि आपल शरीर आपण स्वच्छ नीटनेटक सुंदर ठेवतो तस मित्रांनो तुमच देवघर असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे आता तुम्ही कोणत्याही बाबती मध्ये कॉमप्रमाईज करा पण देवाच्या देवघराच्या बाबतीत कॉमप्रमाईज करु नका. देवघर अतिशय छान ठेवा आणि दोन सुंदर ऑप्शन आहेत, एक प्युअर सागवान, सागवनी आकर्षक अस सुंदर देवघर आणा अथवा प्युअर संगमरवरी आणा.

कारण मित्रांनो नैसर्गिक लाकडाची उर्जा आहे त्याच्यामध्ये , ते प्लॅउड नी बनवलेल मंदिर काय मंदिर आहे का मला सांगा त्याला सनमायका लावलेला आहे. ते प्लॅउड मध्ये पेस्ट करताना विचार करा की त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे ग्लु वापरले जातात आणि आपल्याला माहित आहे चिटकवण्याचे हे जे काय पदार्थ आहे ते कशापासून तयार करतात.

प्लायवूड शक्यतो देवघरला वापरु नका. संगमरवर, सागवाणी लाकूड अथवा शिसव ही नैसर्गिक उर्जा अलरेडी त्याच्यामध्ये आलेली आहे आणि त्याच्यासहित जर आपल देवघर असेल तर मित्रांनो खूप छान नक्कीच वाटेल. आता देवघरच्या बाबतीत आतले जे वस्त्र ठेवतोय ते कोणत्या रंगाच असाव, कस असाव.

जर तुमच्या घरामध्ये संगमरवर किंवा सागवाणी देवघर नसेल तर लगेचच बदलायला जाऊ नका. जेव्हा तुमच्या घरामध्ये सण सभारंभ आहेत, दसरा, दिवाळी आहे, गुढीपाडवा आहे, अक्षय तृतीया आहे हे जेव्हा शुभ मुहूर्त येतात त्यावेळेला देवघर नक्की बदला.

परंतु नवीन घरात जाताय तर नवीन देवघर पाहिजे सुंदर आकर्षक पाहिजे पण त्या परमेश्वरानी इतकी सुंदर सृष्टी आपल्याला निर्माण केली आहे आणि ही सुंदर सृष्टि पाहण्यासाठी हे सुंदर डोळे दिलेत मग त्या परमेश्वरा ला आपण चांगल देवघर नक्की देणार आहोत.

सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *