नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.
“जय जय स्वामी समर्थ” देवपूजा करताना देवाला फूलं वाहणं हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. फुल वाहिल्याने देवी देवता प्रसन्न होतात आणि देवपूजेचे संपूर्ण फळ आपल्याला मिळतं अशी ही मान्यता आहे. मात्र फुलं वाहताना काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. कोणत्या आहेत त्या गोष्टी? चला जाणून घेऊ या.
भगवंताला फुल अर्पण करताना काही नियमांचं पालन केलं नाही तर आपल्याला अनेक दोष लागू शकतात आणि मग आपल्या जीवनात अनेक संकटे आणि समस्या उभ्या राहू शकतात असं म्हटलं जातं. अनेकांचा या गोष्टीवर विश्वास बसणार नाही. मात्र जाणून घेऊ या, हिंदू धर्मशास्त्रा मध्ये देवी देवतांना फुल वाहण्या बाबत नक्की काय सांगितल आहे.
देवी-देवतांना फुले वाहावीत मात्र कळ्या चुकूनही वाहू नयेत. मातीत पडलेली किंवा खराब झालेली फुलंही देवांना चुकूनही वाहू नयेत. सुकलेली , आधीच वास घेतलेले, कीड लागलेली फुलं सुद्धा अपवित्र पवित्र मानली जातात. एखाद्याच्या दारासमोरून आणलेली किंवा चोरून आणलेली फुलं सुद्धा किंवा शिळी झालेली फुलं सुद्धा देवतांना वाहू नये.
त्याच बरोबर एखाद्या झाडाला ओरबाडून तुम्ही फुले तोडली तर ती सुद्धा देवतांच्या चरणी अर्पण करू नयेत. अशी ओरबडलेली फुलं सुद्धा देवता स्वीकारत नाही. एखाद्या अपवित्र जागी उत्पन्न झालेली फुल सुद्धा देवतांना वाहू नयेत. फुलं नेहमी उजव्या हाताने च तोडावीत आणि दैवतांना उजव्या हातानेच व्हावी.
डाव्या हाताने आणलेली किंवा तोडलेली फुल दैवतांना आवडत नाही. फुलं कधीही रुईच्या पानांनी किंवा एरंडाच्या पानांमध्ये गुंडाळून आणु नये. ती वर्ज मानलेली आहे. विशिष्ट देवी-देवतांना विशिष्ट प्रकारची फुलं वर्ज असतात. ती त्यांना चुकूनही वागू नये.
जसं की भगवान श्रीहरी विष्णू ना तुळशीचे पान आणि कमळ अतिशय प्रिय आहे, मात्र रुई, धोत्रा, गोकर्ण, कोरांटी, शिरीष, कन्हेर, पुडा, बेलाचे पान हे मात्र चुकूनही वाहू नयेत. तसंच भगवान शिवशंकर यांच्या बाबतीत रुई, कन्हेर, बेलाची पानं, आघाडा, शमी, बकुळा, कमळ, सुगंधित पांढरी फुलं नक्की व्हावीत.
मात्र शिवशंभु ना काही फुलं चालत नाही, जस की पळसाचे फुल, कुंदन, मालती, बांध मका प्रसंगी तांबडी कनेर, लाल जास्वंद, गुलाब, केवडा ही फुलं शिवशंभु ना अर्पण करू नयेत. जी कुंद पुष्प असतात ती शिव शंभू ना फक्त माग महिन्यात वाहिली जातात.
जर तुम्ही एखाद्या देवीची पूजा करत आहे, तर त्या देवीला सोनचाफा, कमळ किंवा लाल फूलं अर्पण करावी. त्यामुळे देवी प्रसन्न होते. गणपती बाप्पांना मंदार, दुर्वा , शमी, पत्र , जास्वंद सिंदूर, रक्तचंदन या गोष्टी प्रिय आहेत. तुम्ही श्रीगणेशांना तुळशीचे पान वाहू शकता, मात्र फक्त गणेश चतुर्थीला.
अन्य कोणत्याही दिवशी गणपती बाप्पांना तुळशीपत्र अर्पण करू नये. ते वर्ज मानण्यात आलेला आहे. देवाला फूलं वाहताना ती नेहमी देवाकडे देठ करून वाहायची असतात. जर तुम्ही बेलाचं पान वाहात असाल तर ते बेलाचे पान पालथा घालाव. दुर्वांच्या सुद्धा शेंड्या आपल्याकडे आपल्याकडे ठेवून देवाला अर्पण करावेत. तर इथून पुढे दैवतांना फुलं वाहताना या काही गोष्टींची काळजी नक्की घ्या.
सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.