नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.
“श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ” घरातील दक्षिण दिशेला काही गोष्टी ठेवू नयेत. त्यामुळे आपल्याला नुकसान सहन करावं लागतं अस म्हंटल जात. पण कोणत्या आहेत त्या वस्तू? त्या दक्षिण दिशेला का ठेवू नयेत ? मानवाप्रमाणे वास्तूलादेखील पाच ज्ञानेंद्रिये असतात अस म्हणतात.
हवा,वातावरण, जल,भूमी,वृक्ष यांच्या संतुलनावर शुभ आणि अशुभ ठरत असते. वास्तूमध्ये दरवाजे,खिडक्या, किचन हे योग्य दिशेला नसेल तर अनेक अडचणी उत्पन्न होतात.असा अनुभव अनेकांना येतो. जेव्हा आपण आपलं घर बांधतो त्याच्याबरोबरच आपल्या भावना स्वप्नसुद्धा आपल्या सोबत बांधली जातात.
घर बांधताना ज्या गोष्टींची सर्वात जास्त काळजी घेतली जाते ती म्हणजे घराच्या वास्तूची वास्तू शास्त्राची. घरात वास्तुशास्त्रानुसार काही कमतरता असेल तर केवळ नकारात्मक ऊर्जेला चालना मिळत असते आणि त्यामुळे घरातील सदस्याला ही हानी सहन करावी लागते.
आपल्या घरातील प्रत्येक दिशेला अस महत्व आहे पण लोक कोणतीही वस्तू कोणत्याही दिशेला ठेवतात हे तुम्ही पाहिलच असेल. वास्तू शास्त्रानुसार घरातील दक्षिण दिशेला काही वस्तू ठेवू नयेत किंवा काही गोष्टी करू नयेत अस मानलं जातं.घरातील दक्षिण दिशेला पित्रांचा वास असतो आणि तिथे चुकीच्या गोष्टी ठेवू नयेत.
अस केल्यामुळे पितृ नाराज होतात आणि म्हणून पितृ दोष होऊ शकतो. त्यामुळे घरातून सुख-समृद्धी निघून जाते आणि जीवनात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. वास्तुशास्त्रानुसार घरातील दक्षिण दिशेला स्वयंपाक घर कधीही करू नये. असं केल्याने घरात गरिबी येते घरात घरगुती चणचण ही भासू शकते.
पूर्वेला स्वयंपाक घर बनवता येईल. तसेच अनेक लोक दक्षिण दिशेला स्टोअर रूम करतात जे चुकीचा आहे. ते चुकीचं केल्यामुळे घरातील समृद्धी हिरावली जाते. वास्तुनुसार घरातील दक्षिण दिशेला घरातील देवघर सुद्धा असू नये कारण दक्षिण दिशेला केलेल्या पूजेचे फळ मिळत नाही अशी ही मान्यता आहे.
तसेच मागितलेल्या इच्छाही पूर्ण होत नाहीत म्हणून दक्षिण दिशेला शूज किंवा चप्पल ही ठेवू नये.अस केल्यामुळेसुद्धा पितृ नाराज होतात. दक्षिण दिशेला जड मशीन सुद्धा ठेवणे टाळायला हवं त्यामुळे घरातील सकारात्मक गोष्टींचा नाश होतो आणि नकारात्मक ऊर्जा वाढते.
घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला असेल तर ते फार अशुभ मानला जात. ही दिशा यम धर्माची दिशा मांडली जाते. या दिशेने मुख्य दरवाजा बनवल्यास पितृ नाराज राहतो.
सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.