पुण्यात आज एका अत्यंत धक्कादायक घटना घडली असून पाषाण- सुस रस्त्यावर प्रेमाला विरोध केल्याने प्रियसीच्या आईचा संबंधित तरूणाने पट्टयाने गळा आवळून हत्या केली. या प्रकरणी तरुणाला चतुःशृंगी पोलिसांनी अटक केली असून वर्षा क्षीरसागर असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. तसेच याप्रकरणी शिवांशू दयाराम गुप्ता याला अटक करण्यात आली असून याबाबत तरूणीने चतुःशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असल्याचे सांगितले जात आहे.
याशिवाय, तरूणी आणि शिवांशू यांचे गेल्या 7 महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, काही दिवसांपासून त्यांच्यात सतत काही कारणाने वाद-विवाद झाले असल्याने त्यामुळे तरुणीने शिवांशूसोबत प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिला होता. पुण्यातील पाषाण- सुस रस्त्यावरील एका सोसायटीत ही घडलेल्या या घटनेमुळे या प्रकरणी तरुणाला चतुःशृंगी पोलिसांनी अटक केली आहे.
वर्षा क्षीरसागर या माउंटव्हर्ट अॅल्टसी सोसायटीमध्ये राहत होत्या. दरम्यान, याप्रकरणी शिवांशू दयाराम गुप्ता वय 23, रा. मोहनवाडी, येरवडा याला अटक करण्यात आली असून याबाबत तरूणीने चतुःशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. तसेच फिर्यादी तरूणी आणि शिवांशू यांचे गेल्या 7 महिन्यांपासून प्रेमसंबंध असल्याचे सांगितले जाते.
मात्र, काही दिवसांपासून त्यांच्यात वादविवाद सुरू होते. त्याचवेळी यादरम्यान त्या तरुणीने शिवांशूसोबत प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिला असल्याचे सांगितले जाते. वर्षा क्षीरसागर यांनी त्याला मुलीसोबत प्रेमसंबंध ठेवू नको, असे ठामपणे बजावले होते. त्यामुळे शिवांशू तरुणीच्या आईवर चिडला होता. तो रात्री 12 च्या सुमारास माउंटव्हर्ट अॅल्टसी सोसायटीत जाऊन वर्षा यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली.
त्यावेळी त्यांने पट्टयाने गळा आवळून त्याचा खून केला. सुरुवातीला याप्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, चौकशीनंतर वर्षाचा खून झाल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी आरोपी शिवांशूला अटक केली, अशी संदर्भात माहिती पोलीस निरीक्षक जगन्नाथ जानकर यांनी दिली.