आपल्या बऱ्याच परंपरांना व रूढींना शास्त्राधार नाही. तर काही रूढी शास्त्र विरुद्ध आहे. ज्या शास्त्र विरुद्ध आहेत, त्या सोडल्या पाहिजेत. कावळ्याचा व मृत व्यक्तीच्या जीव आत्म्याचा संबंध आहे. मृत व्यक्तीच्या तिसऱ्या दिवशी स्मशानात अन्नपाणी ठेवण्याच्या रुढीस शास्त्राधार नाही, तसे करूही नये.
मात्र त्याचे दहाव्या दिवशी क्रियाकर्म करताना काकपिंड ठेवण्यास सांगितले आहे, याला शास्त्रीय आधार आहे. त्या वेळी त्या पिंडाला कावळा शिवला नाही, तर त्या जीवतम्याची काही इच्छा राहिली असते ती पूर्ण करण्याचे वचन मिळे पर्यंत त्या पिंडाला कावळा शिवत नाही. तसे वचन कोणी दिल्या लगेच कावळा शिवतो. अशी कितीतरी घडलेली उदाहरणे आहे.
एक उदाहरण पाहूया, धाकटा मुलगा वेडसर आहे त्याची काळजी होती मोठ्या मुलाने त्याचा सांभाळ करेण असे म्हणताच कावळा शिवला. आपल्या घराण्यात कुलधर्म, कुलाचार जसे चालू आहेत तसेच सर्व मी व्यवस्थित चालवेल असे आश्वासन देताच कावळा शिवला. एक उत्तम वयकरणी पंडित होते. आपल्या मुलाला पंडित करण्याची त्यांची इच्छा होती.
पण अकस्मात मरण पावले. दहाव्या दिवशी कावळा शिवेना, बऱ्याच वेळ वाट पाहिली नंतर त्यांच्या मित्राच्या ही गोष्ट लक्षात आली व तुझ्या मुलाला मी शिकवेल मोठा पंडित करील, असे वचन देताच कावळा शिवला. त्यानंतर हे गृहस्थ माहुली हुन साताऱ्याला रोज पाच मैल चालत जाऊन शिक्षण देवून परत माहुलीला येत असत.
ही गुरुशिष्यांची सुमारे पन्नास वर्षापूर्वी प्रसिद्ध असलेली जोडी म्हणजे गुरु पंडित राम शास्त्री गोडबोले व शिष्य म्हणजे महापोध्याय. कै. पंडित वासुदेवशास्त्री अभ्यंकर दहाव्या दिवशी मित्राला दिलेले वचन यथार्थतेने पूर्ण केले. अशी माणसे आज दुर्मिळ आहेत. सोलापूर जिल्ह्यातच एका गावी एका गृहस्थाने मरणोत्तर देहदान केले होते.
ते गृहस्थ दिवंगत झाल्यावर वडिलांनी देहदान केले असल्याचे त्यांचे क्रियकर्मंतर करण्याचे कारण नाही, असे समजून न करण्याचे ठरविले. पण तिसऱ्या दिवसापासून रोज कावळा घरात अंगणात येऊन काव काव करू लागला. त्याला हकलले तरी पुन्हा पुन्हा येत असे. असे तीन दिवस चालू होते.
शेवटी मुलांनी वडिलांचे अवधर्व देहित करण्याचे ठरविले व तसे सांगितले. तेव्हा पासून कावळा येणे बंद झाले. ही घटना अवघ्या दोन-तीन वर्षांतील घडलेली आहे. याला कोणी अंधश्रद्धा म्हणणार असेल तर खुशाल म्हणू देत. आम्हाला मात्र तसे म्हणणे अंधश्रद्धेचे वाटते, कारण या घटना प्रत्यक्ष घडलेल्या आहेत.
आणखी एक आमच्या अतिशय परिचयातील उदाहरण आहे. एका व्यक्तीचे वडील दिवंगत झाले. दहाव्या दिवशी पिंडाला कावळा बराच वेळ गेला शिवेणा. तेव्हा त्यांच्या मुलाने पुढे येऊन मी प्रचाराचे काम थांबवतो, व नौकरी करून धाकटा भाऊ आहे त्याचे शिक्षण पूर्ण करतो, असे सांगताच कावळा लगेच शिवला. अशी बरीच उदाहरणे आहेत.
माणसांना फक्त उजेडात दिसते. मांजराला उजेडात व अंधारातही दिसते. वटवाघुळ व घुबडाला फक्त अंधारातच दिसते. अशी निरनिराळी दृष्टी परमेश्वराने दिलेले आहे. तशी त्या पिंडातील जीवात्मा दिसण्याची दृष्टी परमेश्वराने कावळ्याला दिली आहे. आपली इच्छा पुरी होण्याचे आश्वासन मिळेपर्यंत तो जीवात्मा कावळ्याला शिवू देत नाही.
कावळे जवळ येतात पण उडून जातात. मृत व्यक्ती कावळ्याच्या रूपाने येऊन पिंडाला स्पर्श करते अशी अनेकांची समजूत आहे. पण प्रत्यक्षात तसे नसून, तो जीवात्मा इच्छापूर्तीचे वचन मिळेपर्यंत कावळ्याला मज्जाव करतो. पिंडाला कावळाच का शिवला पाहिजे ? तर कावळ्यास ही दृष्टी आहे म्हणून. जीवात्मा दिसण्याची दृष्टी कावळ्याला आहे.
तर त्याच्या डोळ्यातील लेन्स प्रमाणे लेन्स तयार करता आली तर आपणासही त्या पिंडातील जीवात्मा दिसू शकेल, असे वाटून जर्मनीतील एका संशोधकाने तयार करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तशी लेन्स तयार झाली तरीही आपणास जीवात्मा दिसू शकणार नाही. कारण केवळ लेन्स हे जीवात्मा दिसण्याचे साधन नाही. तर लेन्स बरोबर ती दृष्टी ही पाहिजे.
तशी दृष्टी परमेश्वराने फक्त कावळ्याला दिली आहे. डोळ्यासारखा डोळा असूनही अनेक माणसांना दिसत नाही. दुसऱ्या माणसांना त्याचे डोळे इतर माणसांप्रमाणे दिसतात. पण दिसण्याची शक्ती त्यात नसते. दिसण्याची शक्ती सूर्याची असते. परमेश्वराच्या नेत्रापासून सूर्य निर्माण झाला आहे.
“चक्षो सूर्यो अजयतो” असे पुरुष सुक्तात म्हटले आहे. तसेच “सूर्योमे चक्षु श्री श्रीत” असे दुसरे वचन वेदांत आहे. याचा अर्थ पाहण्याची दृष्टी सूर्यामुळे मिळते. डोळा हे पाहण्याचे साधन आहे, म्हणून कावळ्याच्या डोळ्या सारखी लेन्स तयार केले तरी त्यात सूर्यशक्ती नसल्याने त्या डोळ्यांनी जीवात्मा दिसणे शक्य नाही. जीवात्मा हा वायुरूप असतो.
पिंडाला काकस्पर्श होणे हा एक विधी क्रियाकर्म अंतरात असतो. विधीचे पालन करावे लागते. बराच वेळ वाट पाहूनही कावळा शिवला नाही, व त्यामुळे त्या मृत व्यक्तीची इच्छा काय राहिले आहे हे जर समजू शकले नाही. तर इच्छा पूर्तीच्या आश्वासन अर्थातच देता येणार नाही.
अशा वेळी त्या विधिचे पालन कसे करणार ? विधीचे पालन करणे करीता अशावेळी दर्भाचा कावळा करून, त्याचा स्पर्श त्या पिंडाला करावा. व त्यापुढील कर्मांतर करावे असे शास्त्र आहे. अल्पावधीतच कावळा शिवला तर त्या मृत व्यक्तीची काहीही इच्छा, वासना राहिली नाही. असे मानून मोठ्या समाधानाने सर्व नातेवाईक मंडळी घरी जातात.
पिंडाला कावळा शिवणे ही केवळ भावना नसुन त्याचा अनेकांना पुढील प्रमाणे अनुभव आलेला आहे. व पुढेही येत राहणार आहे. तेव्हा प्रत्येक मृत व्यक्तींचे क्रिया कर्मंतर करणे कोणीही अश्रद्धेने टाळू नये. क्रिया कर्मं केले नाही तर त्या व्यक्तीला सद्गती प्राप्त न झाल्याने तो जीव घरातच घुटमळत राहतो. त्या घरात समाधान शांती लाभू देत नाही.
अशा एक दोन पिढ्या गेल्या वर कोणाचे क्रिया कर्मांतर करण्याचे राहिले आहे याचे ज्ञान राहत नाही. अशा वेळी नारायण नागबली किंवा त्रिपिंडी श्राध्द त्र्यंबकेश्वर येथे जाऊन करावे लागते. असा नारायण नागबली केलेल्यांना घरात समाधान शांती लाभल्याचा अनुभव अनेकांना आला आहे.
सद्गती न मिळाल्याने हा जीवात्मा काही घरात संतती होऊ देत नाही. अशी संतती न झालेल्या जोडप्याला नारायण नागबली केल्यानंतर संतती प्राप्त झाल्याची उदाहरणे तरी भरपूर आहेत. आता आपल्या लक्षात आले असेल की काकस्पर्श याला काय शास्त्र आहे आणि काय नाही.
सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.