जाणून घ्या जगप्रसिद्ध तसेच नवसाला पावणाऱ्या अश्या पुण्यातील “श्री’मंत दगडूशेठ हलवाई” गणपतीचा इतिहास ।। गणपतीला ” श्री’मंत दगडूशेठ” असे नाव कसे पडले ।। १२७ वर्षांपूर्वीचा इतिहास ।।

उधोगविश्व कला देश-विदेश प्रादेशिक शिक्षण

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बद्दलची विशेष माहिती मुद्देसूद जाणून घेऊया. 1. गणपतीला “श्री’मंत दगडूशेठ हलवाई” असे एका व्यक्तीच्या नावाने का ओळखले जाते? 2.या गणपतीची स्थापना कशी झाली व मंदिरामागील 127 वर्षांपूर्वीचा इतिहास काय आहे? 3. हा गणपती नवसाला पावतो

कशाप्रकारे अमिताभ बच्चन यांची प्रकृती गंभीर असताना ते सुखरूप बरे व्हावे असा नवस करण्यात आला होता आणि तो पूर्णही झाला. त्याचप्रमाणे या गणेश मूर्तीचे वैशिष्ट्य ही सांगणार आहोत. “पुणे” हे विद्येचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध आहे. याच पुण्यातील शनिवार वाडा सुद्धा प्रसिद्ध आहे.

पण पुणे म्हटलं की अजून एक नाव डोळ्यासमोर येऊ लागतं ते म्हणजे “श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती” समस्त पुणेकरांच श्रद्धा स्थान. गणेशोत्सव म्हटला की मोठ्या शहरातील काही गणपतींची नावे विशेषत्वाने समोर येतात . त्यामध्ये पुण्यातील दगडूशेठ गणपतीचे नाव आघाडीवर आहे.

बाहेर गावावरून पुण्यात आलेल्या व्यक्ती श्री’मंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी गेला नाही, असे फारच क्वचित घडत असावे. केवळ गणेशोत्सव साजरा करण्यापुरते नव्हे तर श्रद्धेपोटी समाजाने दिलेल्या पैशातून सामाजिक कार्याच्या माध्यमातून मानवतेचे महा मंदिर उभारण्याचा प्रयत्न करणारे श्री’मंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट हे मंडळ आणि लाखो भाविकांचे श्र’द्धास्थान असलेल्या दगडूशेठ गणपती ने जगभरात नावलौकिक संपादन केले आहे.

ही गोष्ट आहे इ.१८९१ सालची, तेव्हा भारतावर इंग्रजांच आधिपत्य होत. दगडूशेठ हलवाई हे पुण्यातील प्रसिध्द मिठाईचे व्यापारी होते. समाजात त्यांना खूप मान होता. त्यांना श्रीमंत ही पदवी देण्यात आली होती. श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे एक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व असल्यामुळे ब्रिटिशांनी ही त्यांना नगरशेठ हे भूषण देऊन सन्मानित केलं होतं.

श्रीमंत दगडूशेठ यांच्यावर साक्षात देवाचेच वरदहस्त होते. संपत्ती, मान, प्रतिष्ठा यातील कशाचीच कमी नव्हती. त्यावेळी पुण्यात प्लेगची साथ पसरली होती. या आजारावर कोणताही ठोस उपचार नसल्याने अनेकांना त्यांचे प्राण गमवावे लागले होते. प्लेग बद्दल सांगायचं झाल तर कोरोनापेक्षाही भयावह म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

या आधी अशी महामारी १८२० साली सुध्दा आली होती. या महामारीमध्ये लाखो लोक मरण पावले होते. १८९२ सालच्या या प्लेगच्या साथीमध्ये दगडूशेठ यांच्या एकुलत्या एक मुलाचे निधन झालं. त्यामुळे दगडूशेठ व त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला.

सर्व वैभव असूनही ते पूर्ण वेळ नैराश्यात आणि चिंतेत असायचे. यावर त्यांचे अध्यात्मिक गुरू श्री माधवनाथ महाराजांनी त्यांना एक सल्ला दिला. ते दगडूशेठ यांना म्हणाले! की तुम्ही एक गणपतीच दत्तक घ्या ना, त्याचा मुलाप्रमाणे सांभाळ करा, गणपतीची कीर्ति जगभर सर्वत्र पसरेल असेही ते म्हणाले.

गुरूंचे म्हणणे ऎकून दगडूशेठ आणि लक्ष्मीबाई यांनी श्री कुंभार यांच्या कडून एक सुंदर आणि लोभस गणेश मूर्ती बनवून घेतली आणि भक्तीभावाने त्या मूर्तीची स्थापना ही केली. गणेश मंदिरात येणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली. लोक या गणपतीला श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांचा गणपती असे संबोधू लागले.

असे म्हणता म्हणता काही कालावधीने त्या गणपतीचे नामकरांचं “श्री’मंत दगडूशेठ हलवाई” गणपती असे झाली. या गणपतीची कीर्ती संपुर्ण पुण्यात पसरली. लोक श्रद्धेने या मंदिरात येऊ लागले. हा काळ होता इंग्रजांच्या जुलमी राजवटीचा. त्यामुळे लोकांना व्यक्ती स्वतंत्र नव्हते.

ब्रि’टीश अत्यंत जुलमी होते, ते भारतीयांना गुलमासारखी वागणूक देत. देशात त्यांचा जुलमी कारभार चाले. एकेकाळी सोनेकी चिडीया म्हणून ओळखला जाणाऱ्या आपल्या देशाला लुटण्याचा ब्रिटिशांनी जणू ठेका च घेतला होता. त्यांच्याविरुद्ध जो कोणी आवाज उठवेल त्याला अटक केली जायची.

बऱ्याचदा फाशीची शिक्षाही दिली जायची. पण संपूर्ण भारतीयांमध्ये ब्रिटिशांविरुद्ध संतापाची आग होती आणि या आगीची चांगली झळ इंग्रजांना १८५७ साली लागले होते. १८५७ चा उठाव अयशस्वी ठरला होता, पण या आगीच्या ठिणग्या मात्र संपूर्ण भारतभर पसरल्या. आपल्या देश स्वतंत्र झाला पाहिजे या चर्चेला उधाण आलं होतं.

या सर्वांना घाबरून इंग्रजांनी लोकांना एकत्र येण्यास आणि संघटना स्थापन करण्यास बंदी घातली. ब्रिटिशांविरुद्ध बोलणे हा जणू गुन्हाच आहे असे घोषित करण्यात आले. पण आपला देश स्वतंत्र व्हावा असे प्रत्येक भारतीयाला वाटत होते. काही लोक तर यासाठी स्वतःच्या प्राणाचे बलिदानही द्यायला तयार होते.

त्यातीलच एक होते “बाळ गंगाधर टिळक” लोकमान्य टिळक या नावाने आजही ओळखलं जातं. त्यांनी लोकांना संघटित करून ब्रिटिशांविरुद्ध लढा द्यायचा असं ठरवलं. पण यासाठी सरकारसमोर लोकांना एकत्रित आणणे कठीण होते. म्हणून त्यांनी सार्वजनिक उत्सव साजरे करायचे असे ठरवले.

आणि यासाठी सार्वजनिक मंडळे तयार करून लोकांना एकत्रित करायचे असे त्यांचे ध्येय होते. यातूनच सार्वजनिक गणेशोत्सव उदयास आला. गणपती फक्त घरापुरता मर्यादेत होता तो मंडळात, मैदानात, आणि चौकात बसू लागला. याची सुरुवात पुण्यातुन झाली. पुण्यात जोशाने आणि आनंदले गणपती उत्सव साजरा होऊ लागला.

१८९३ साली “श्रीमंत दगडूशेठ हलवाई” या मंदिरात सुद्धा एक गणेशमूर्ती आणण्यात आली. तेव्हापासून सुरू करण्यात आलेली ही परंपरा १२७ वर्षांनंतर आजही चालू आहे. तीही तितक्याच श्रद्धेने आणि विश्वासाने. ह्या गणपतीला तेव्हापासून अनेक लोकांनी वेगवेगळे नवसही केलेत आणि ते पूर्णही झालेत.

तर त्यामुळे नवसाला पावणारा गणपती ! असे नावलौकिक या गणपतीला प्राप्त झाले आहे. श्री माधवनाथ महाराज यांनी म्हणल्याप्रमाणे श्रीमंत दगडूशेठ हलवाई या गणपतीची किर्ती संपुर्ण जगात पसरली आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे वेगवेगळ्या देशातील अनेक लोक या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी येतात.

वर्षभर या मंदिरात भक्तांची गर्दी असते गणपतीची पालखी, आरती आणि नैवेद्य त्याचे वेगळेच आकर्षण आहे. सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये प्रतिष्ठापना केल्या जाणाऱ्या मूर्तीला देवत्व प्राप्त होण्याचे भाग्य दगडूशेठ गणपतीला लाभले आहे. ह्या मंडळाची स्थापना १८९३ मध्ये झालेली असून दगडूशेठ गणपती हे लौकिक प्राप्त झालेल आहे.

ती मूर्ती मंडळाने १९६८ मध्ये तयार करून घेतले आहेत. प्रसिद्ध शिल्पकार मूर्तिकार आणि यंत्र विज्ञानाचे अभ्यासक शंकराप्पा शिल्पी यांच्या मूर्तीकलेची साक्ष म्हणजे दगडूशेठ गणपतीची ही मूर्ती. ती घडवताना मूर्तिकार नागेश शिल्पी यांचेही या कामात योगदान होते.

ही मूर्ती तयार करण्याचे काम सुरू असताना त्या वेळी सूर्य ग्रहण आले होते. त्या ग्रहणातील एका विशिष्ट वेळेत मूर्तीमध्ये गणेशयंत्र बसवले. तर त्या मूर्तीचे तेज उत्तरोत्तर वाढत जाईल आणि या मूर्तीला देवत्व प्राप्त होईल अशी शिल्पी यांची श्रद्धा होती. त्यांच्या श्रद्धेचा मंडळाच्या कार्यकर्त्यांनीही आदर केला.

धार्मिक पद्धतीने विधी करूनच ही मूर्ती घडविण्यात आली. शांत, प्रसन्न आणि पाहताच पावले थबकून राहावीत, असे भाव या मूर्तीच्या चेहर्‍यावर आहेत. बैठया मूर्तीचे चारही हात सुट्टे असून डाव्या हातामध्ये मोदक आहे. तर उजवा हात म्हणजे वरद, म्हणजे आशीर्वाद देणार आहे. अन्य दोन हातांमध्ये कमळ आणि डोक्यावर मुकुट आहे.

मूर्तीच्या सोंडेवरील नक्षीकाम ही एका उत्कृष्ट कलाकारी चा नमुना आहे. या मूर्तीचे डोळे हे महत्त्वाचे वैशिष्ट्य. या डोळ्यांमध्ये मूर्तीची प्रसन्नता, सात्विकता आणि उदात्तता एकवटली आहे. कोठूनही पाहिले तरी गणपती आपल्याकडेच पाहत आहे याची प्रचिती दर्शन घेणाऱ्या भाविकाला येते.

मूर्तीच्या बोलक्या डोळ्यांमधून व्यक्त होणारे भाव पाहून भक्त नकळतच नतमस्तक होतो. उत्सव काळात ५ किंवा११ नारळाचे तोरण अर्पण करणाऱ्या भाविकांची दर्शनासाठी लागलेली रांग हे दगडूशेठ गणपतीचे खास वैशिष्ट्य ठरले. पुढे १९८४ मधील गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरामध्ये गणपतीची स्थापना झाली.

त्या मंदिरासाठी ट्रस्टचे तत्कालीन अध्यक्ष प्रतापराव गोडसे, मामासाहेब रासने आणि आप्पासाहेब सूर्यवंशी यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले. कुली चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सुपरस्टार अमिताभ बच्चन यांना जीवघेणा अपघात झाला होता. त्यावेळी जया बच्चन यांनी दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेऊन नवस केला होता.

सुखरूप बरे झाल्यानंतर अमिताभ आणि जया बच्चन या दाम्पत्याने सोन्याचे कान अर्पण केले होते. पूर्वीचे मंदिर अपुरे पडू लागल्यानंतर २००२ मध्ये सध्याचे भव्य मंदिर उभारण्यात आले. ट्रस्टच्या तीनही प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या पुढच्या पिढीच्या हाती सध्या नेतृत्वाचे सुकाणू आहेत.

त्यांनीही त्याच निष्ठेने आणि भाविकतेने सारे उपक्रम सुरू ठेवत गणपतीचे पावित्र्य जपले असून ट्रस्टच्या लवकिका मध्येही भर घातली आहे. गणेशोत्सव हा फॅक्ट आपल्या मंडळापूरताच वलयंकित राहू नये या भूमिकेतून उत्सवाला विधायक वळण प्राप्त करून देण्यासाठी ट्रस्टने राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा सुरू केली.

गणेशोत्सवा मध्ये ऋषि पंचमीला हजारो महिलांचा सहभाग असलेला अथर्वशीर्ष उपक्रम जगभर पोहोचला आहे. ट्रस्ट तर्फे कोंढव्या मध्ये देवदासी आणि अनावरन्स मुलांचा सांभाळ करून त्यांना योग्य शिक्षण देणारे बालसंगोपन केंद्र आणि पिताश्री वृद्धाश्रम चालवण्यात येत आहे.

टीगोरी गावांमध्ये जलसंधारणाची कामे यशस्वी केलेल्या ट्रस्टतर्फे ससून रुग्णालयातील रुग्णांना उत्तम भोजन सेवा दिली जात आहे. ट्रस्टतर्फे दरवर्षी सादर केला जाणारा देखावा आणि त्याची विद्युत रोषणाई हा भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो.

सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *