स्वच्छता ही मानव जीवनाचा महत्त्वपूर्ण हिस्सा आहे. आणि आपण बघितल तर गेल्या दशकापासून मानव स्वच्छतेवर जास्त भर देत आहे.आपल्या आजूबाजूला सफाई ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.लोकांना प्रेरणा देण्यासाठी मोदी सरकारने सुद्धा स्वच्छता अभियान सुरू केले आहे.
आजकाल लोक आपल्या घराची सफाई स्वतःच करतात किंवा काही लोकांकडून करून घेतात. त्यालाच हाऊस किपिंग असे म्हणतात. आता दिवाळी येत आहे अशातच एखद्याने हाऊस कीपिंग चा व्यवसाय चालू केला तर उत्तम कमाई होऊ शकते.काही लोकांनी तर आत्ताच घर साफ करायला सुरुवात सुद्धा केली आहे.
काय आहे हाऊस किपिंगा चा व्यवसाय: हाउस किपींग म्हणजे घराचे नियोजन आणि सफाई.याचा अर्थ असा नाही की हाऊस कीपींग कर्मचारी फक्त सफाई करतील तुम्ही त्यांच्याकडून घरातील जड शारीरिक कामे देखील करून घेऊ शकता.ज्यांना घर किंवा ऑफिस साफ करून घ्यायचे आहे ते हाउस कीपिंग चा व्यवसाय करणाऱ्या लोकांशी संपर्क साधतात व व्यवसाय करणारे गरज आहे तिथे माणसे पाठवून काम करून घेतात.यालाच हाऊस कीपिंग वयवसाय असे म्हणतात.
हाऊस कीपिंग व्यवसायाची मागणी: या व्यवसायाची मागणी उत्तम आहे कारण आजकाल लोकांमध्ये स्वच्छतेची खूप क्रेझ आहे.त्यामुळेच ते आपले घर किंवा ऑफिस साफ करण्यासाठी दरमहा ही सर्व्हिस घ्यायला पसंती दर्शवतात.खास करून दिवाळीमध्ये.दिवाळीमध्ये भरघोस ऑर्डर मिळतात ज्यामुळे लोकांना आधीच बुकिंग करावी लागते.ह्या व्यवसायाची मागणी घरांपेक्षा जास्त ऑफिसेस मध्ये असते.आणि हा व्यवसाय करणारे सुद्धा ह्या क्षेत्रात काम करू इच्छितात.
हाउस कीपिंग व्यवसाय सुरू कसा करावा: सर्वात आधी तुम्हाला हे काम करणारी माणसे गोळा करावी लागतील.कंपनी सुरू करण्यासाठी एक ऑफिस लागेल.काही रोख रक्कम आणि थोड्या जागेची देखील आवश्यकता भासेल.ह्या सर्व गोष्टींची एक यादी बनवून एक एक गोष्ट व्यवस्थित केल्यास हा व्यवसाय करण सोप्प जाईल.
हाऊस कीपिंग व्यवसायासाठी लोकेशन अथवा जागा:ह्या वयवसायासाठी तुमच्याकडे एक उत्तम लोकेशन असन अती आवश्यक आहे.त्यासाठी तुम्ही अशी ठिकाणे निवडू शकता जिकडे उद्योग धंदे मोठ्या प्रमानात चालतात.जस की मुंबई, पुणे,दिल्ली,नोएडा, बँगलोर इत्यादी. ही जागा यासाठी निवडा कारण ह्या उद्योगची मागणी अश्या ठिकाणी जास्त असते.आणि लोक सुद्धा इकडे काम करण पसंत करतात. तुमची कंपनी खोलण्यासाठी तुम्हाला कमीत कमी २०० चौ.मी जागा आवश्यक आहे. जिथे बसून तुम्ही तुमच्या माणसांना काम देऊ शकाल.हे काम घरबसल्या तुम्ही ऑनलाईन सुद्धा करू शकता.
या व्यवसायात पैश्यांची व्यवस्था: हा एक सर्व्हिस देणारा व्यवसाय आहे त्या मुळे जास्त गुंतवणूक करावी लागत नाही. पण तुमच्याकडे काम करणाऱ्या माणसांना पगार देण्यासाठी तुमच्याकडे रक्कम ही असली पाहिजे.हे वेतन तुम्ही ग्राहकांकडून मिळणाऱ्या पैश्यांकडून सुद्धा देऊच शकता. त्याव्यतिरिक्त तुम्हाला व्यवसाय नोंदणी आणि लायसेन्स साठी काही निश्चित रक्कम ही लागेल.ह्या व्यवसायात कमीत कमी ५ लाख रुपये गुंतवणे आवश्यक आहे.
या व्यवसायासाठी लागणारे लायसेन्स आणि नोंदणी: १) कंपनी नोंदणी – तुम्ही एक व्यवसाय सुरू करणार आहात त्यामुळे तुमचा व्यवसाय हा मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअरस मध्ये समाविष्ट करण्यासाठी नोंदणी आवश्यक आहे.
२) जिएसटी नोंदणी – तुम्हाला कंपनीच्या टॅक्स नोंदणी किंवा जीएसटी नोंदणी नुसार स्थानिक नगर निगम कडून ट्रेड लायसेन्स मिळवावे लागेल. ३) ईपीएफ नोंदणी – ही नोंदणी पण आवश्यक आहे कारण व्यवसायात १० पेक्षा जास्त लोक आहेत. ४) टीएएन नंबर – तुम्हाला तुमच्या कर्मचाऱ्यांच्या संपूर्ण वेतनातून टॅक्स कापण्यासाठी याची नोंदणी करावी लागेल. आणि हा नंबर मिळवावा लागेल.
महत्त्वाची गोष्ट :- हे सर्व करण्यासाठी तुम्हाला नंबर , आधार कार्ड , पॅन कार्ड चालू खाते याची आवश्यकता भासेल. या व्यवसायात कर्म चाऱ्यांचा शोध: आता गोष्ट येते ती म्हणजे तुमच्याकडे कर्मचारी किती आहेत.तुम्हाला कुशल कारागीर मिळायला हवे.शोध झाल्यावर त्यांची पूर्ण डिटेल घ्या आणि आणि त्यांना सांगा की काम असल्यावर तुम्हाला सांगण्यात येईल.तुम्ही कारागीर सोशल मीडिया वर मिळतील. त्याव्यतिरिक्त तुम्ही जाहिरात करू शकता.
या व्यवसायात लागणारी उपकरणे आणि मशिनरी: १) vacuum क्लिनर, २) scrubbing machine, ३) काही सफाई उपकरणे, ४) एक वाहन, या व्यवसायात असे बनवाल ग्राहक:यासाठी तुम्ही विभिन्न संस्था किंवा कंपनी सोबत संपर्क करू शकता. त्यांनां तुमचे विसिटिंग कार्ड आणि व्हाउचर देऊ शकता.याने ते आकर्षित होऊन तुम्हाला ऑर्डर देऊ शकतील.जर तुम्ही काम उत्तम केलं तर ते अन्य लोकांना पण सांगतील.
या व्यवसायात मिळणारा लाभ: या व्यवसायात कमीत कमी ३ ते ५ लाख रुपये कमाई आहे. मिळणाऱ्या वेतनातून तुम्ही तुमची रक्कम कापून खर्च व वेतन देऊ शकता. या व्यवसायात असणारी जोखीम: या व्यवसायात थोडी जोखीम आहेच.कारण दरवेळी व्यवसाय एक सारखा चालत नाही. कधी मागणी जास्त तर कधी कमी. अशा रीतीने तुम्ही दिवाळी मध्ये या व्यवसायाची सुरुवात करू शकता.