चुकुनही दुसऱ्याला देऊ नका तुमच्या ‘या’ 10 वस्तू! ।। पाठोपाठ जाईल तुमचे भाग्य, नशीब ।। घरात भांडणे, कलह, वाद विवाद होऊ शकतात. ।। या बाबतची अधिक माहिती जाणून घ्या या लेखात !

कला चित्रपट शिक्षण

अतिशय महत्त्वाची अशी माहिती आपण आज पाहणार आहे. आज आपण पाहणार आहोत की आपण आपल्या जवळच्या किंवा आपल्या घरातील कोणत्या वस्तू इतरांना अजिबात देऊ नयेत. किंवा इतरांच्या कोणत्या वस्तू आपण अजिबात घेऊ नयेत. तुम्हाला कदाचित हे हास्यास्पद वाटेल, मात्र वास्तुशास्त्राने या गोष्टीचा गांभीर्याने विचार केलेला आहे, खूप खोलवर जाऊन विचार केलेला आहे.

आपल्या सर्वांना माहीत असेल की प्रत्येक वस्तूमध्ये त्या वस्तूची स्वतःची अशी एक एनर्जी असते. काही वस्तूंची “पॉझिटिव्ह एनर्जी” असते सकारात्मक ऊर्जा असते. काही वस्तूंची “निगेटिव्ह एनर्जी” असते नकारात्मक ऊर्जा असते. आणि आपल्याला जर आपल्या जीवनामध्ये सफल व्हायचं असेल, यशस्वी व्हायचं असेल, पैसा, संपत्ती, ऐश्वर्य, जर हव असेल तर आपल्याला आपल्या अवतीभवती आणि स्वतः मध्ये देखील पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजेच सकारात्मक ऊर्जेचा स्रोत निर्माण करायला हवी.

आपल्या अवतीभवती सकारात्मक ऊर्जा असायला हवी. जर ही ऊर्जा नकारात्मक असेल किंवा जर कोणत्या कारणानेही नकारात्मक ऊर्जा जर आपल्याकडे येत असेल, तर याने आपल्या घरातील सुख, शांती, ऐश्वर्य, संपत्ती, आपला जो स्थायीभाव आहे, या सर्वाला हानी पोहोचू शकते.

जसं कि प्रत्येक गोष्टीमध्ये तिची स्वतःची अशी पॉझिटिव्ह एनर्जी किंवा निगेटिव्ह एनर्जी असते. त्यामुळेच आपण काही गोष्टी घेणं हे कटाक्षाने टाळाल पाहिजे. तसच आपल्या जवळच्या काही गोष्टी देण हे कटाक्षाने टाळाल पाहिजे. अशा कोणकोणत्या वस्तू आहेत त्याची आपल्याकडे लिस्ट आहे तर आपण जाणून घेवूयात कोणत्या आहे त्या गोष्टी.

सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपलं घड्याळ. वेळ ही सर्वात पावरफुल गोष्ट आहे. “टाईम इज द मोस्ट पावरफुल थिंग इन दिस युनिवर्स.” या जगात नव्हे तर या ब्रह्मांडामध्ये जर सर्वात पावरफुल एखादी गोष्ट असेल तर ती आहे वेळ आणि ही वेळ दाखवण्याचं काम करत आपल्या हातातलं घड्याळ.

आणि म्हणूनच जर तुम्हाला कुणी तुमच घड्याळ मागायला आल तर ते देऊ नका. कधी कधी असे प्रसंग येतात एखाद्या मुलाची परीक्षा असते, किंवा शेजारी असतो, त्याची परीक्षा वैगरे असते. किंवा  त्याचा पेपर वगैरे असतो परीक्षेचा. आणि त्याच्याकडे घड्याळ नसत, किंवा त्याच घड्याळ कुठेतरी हरवलेलं असत.

आणि मग तो आपल्या घरी येतो आपल घड्याळ मागण्यासाठी तेवढ्या परीक्षेच्या काळापुरत. तर अशा व्यक्तींना मदत तर करायला  काय हरकत नाही. मात्र मदत करणं म्हणजे आपल्या हातातलं घड्याळ देण नव्हे.  आपल्या हातातलं घड्याळ देण म्हणजे आपण त्याला आपलं नशीब, आपलं भाग्य,  एक प्रकारे सोपवतोय.

घड्याळामध्ये प्रचंड प्रमाणात सकारात्मक ऊर्जा असते. आपलं नशीब हे त्या घड्याळा सोबत जोडलेले आहे. आणि मग असं जर घड्याळ आपण दुसऱ्या देत असू तर त्याचा अर्थ आपण आपल भाग दुसऱ्याला देतोय. आपल्या नशिबात जे लिहिलेल आहे, जे काही पॉझिटिव्ह गोष्टी आहे आपल्या नशिबात असलेल्या ते आपण त्याला देतो.

त्यामुळेच घड्याळ देण हे कटाक्षाने टाळा. दुसरी गोष्ट म्हणजे उधारी. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की उधारी  शिवाय सध्या कोणतीही गोष्ट चालू शकत नाही. व्यवहार करायचा म्हटलं की उधारी येते. मात्र तुम्ही उधारी ठेवू नका, उधारी जर असेल तुमची तर तुम्ही ती लवकर देऊन टाका.

म्हणजे तुम्ही जर कोणाकडून काय उधार घेतल असेल तर ते ताबडतोब त्याला परत करा, उधारी भागवा. कारण  ज्या माणसांकडे उधारी असते त्यांच्याकडे दारिद्र्य हात धूऊन मागे लागते. तुमच्याकडे उधारी आहे याचा अर्थ तुमच्याकडे पैसा अडका नाही, तुमच्याकडे लक्ष्मी नाही, तुमच्या घरात लक्ष्मीचा वास नाही, असा त्याचा अर्थ होतो.

आणि म्हणूनच आपण ताबडतोब, शक्य होईल तितक्या लवकर आपण उधारी भागवायला पाहिजे. उधारी आणि कर्ज यामध्ये फरक आहे. जे आपण कर्ज घेतलेलं असत, लोन घेतलेलं असत, त्यावरती आपण व्याज भरत असतो. ती उधारी नव्हे. धंदा करण्यासाठी, व्यवसाय करण्यासाठी, बिझनेस उभा करण्यासाठी, आपल्याला लोन अत्यावश्यक आहे.

ते आपण अवश्य  घ्यायला हव. उधारी  म्हणजे एखाद्याची उसने घेतलेले पैसे, की जे आपण जेवढे घेतलेत तेवढेच त्याला परत देणार आहोत. तर अशी ही उधारी आपण  लवकरात लवकर भागवायला हवी. पुढची गोष्ट म्हणजे कपडे. आपण जे स्वतः कपडे वापरत आहोत ते तुम्ही दुसऱ्या कुणालाही देऊ नका. किंवा दुसऱ्याचे तर अजिबात घेऊ नका.

एक वेळ तुम्ही तुमचे कपडे दिले तरी चालेल, तोटा कमी होईल. मात्र जर तुम्ही दुसऱ्याचे कपडे वापरले तर तुमच्या घरामध्ये भांडणे, वादविवाद, कलह  होऊ शकतात. यावरती  विचार करून पहा. आणि कपडे कोणाचेही वापरू नका. अंतर्वस्रा बाबत एक गोष्ट. तर ही जी अंतर्वस्त्र आहेत ही तर आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये दुसऱ्याला देऊ नयेत.

किंवा दुसऱ्याचे देखील वापरू नयेत. त्याने घरामध्ये अशांती आणि  वादविवाद होऊ शकतात. तर पुढची गोष्ट आहे  गृहिणी साठी खास. ज्या महिला वर्ग आहे त्यांच्यासाठी. महिला भगिनींनी रात्रीच्या वेळी ज्या वेळी सूर्य मावळेल, सायंकाळच्या वेळी  कोणत्याही व्यक्तीला दूध, दही, किंवा ताक अजिबात देऊ नये.

आपण जर एखाद्या व्यक्तीला रात्रीच्या वेळी सूर्य मावळल्या नंतर जर दूध, दही, ताक देत असाल तर तुमच्या घरा मध्ये वास्तुदोष निर्माण होऊ शकतो. आणि जर एकदा वास्तुदोष निर्माण झाला तर त्याचे अनेक असंख्य अशा प्रकारचे तोटे आपल्याला  सहन करावे लागतात. आणि म्हणूनच हे जे दुधाचे पदार्थ आहेत ते देन आपण टाळलं पाहिजे.

पुढची गोष्ट पेन. बरेच जनांना पेन दुसऱ्याला मागायची सवय असते. आपण बँकेमध्ये गेलो, तिथं आपल्याला स्लीप वैगरे लिहायची असते, चेक लिहायचा असतो, आणि मग आपल्या लक्षात येते की आपण पेन आणला नाही. आणि मग त्यावेळेला दुसऱ्याचा पेन वापरतो. दुसऱ्याच्या पेनने स्वतःचे चेक  किंवा इतर ज्या गोष्टी लिहायच्या आहेत, ते अजिबात करू नका.

दुसऱ्याचा पेन वापरू नका. दुसऱ्याचा पेन वापरल्याने तुमच्या लक्ष्मी मध्ये नक्कीच घट होणार आहे. तुम्हाला तोटाच तोटा होणार आहे. म्हणूनच दुसऱ्याचा पेन अजिबात वापरू नका. त्याचप्रमाणे जस आपण दुसऱ्याचा पेन घ्यायचं नाही, त्याचप्रकारे आपला पेन देखील दुसऱ्याला देऊ नका. हे देखील अभग्याच, नशीब खराब करण्याचे लक्षण आहे.

पुढची गोष्ट जसं आपण कपड्या बद्दल बोललो त्याच प्रकारे रुमाल देखील, रुमाल सुद्धा आपण एकमेकांचा शेअर करू नये. दुसऱ्याला आपला रुमाल देऊ नका, दुसऱ्याचा देखील रुमाल घेऊ नका. त्यानंतर आपल्या कडे पाहुणे येतात, पाहूनेरावळे येतात. आणि त्यांना आपण झोपण्यासाठी आपण जे काही कपडे वापरतोय, अंथरायचे पांघरायचे ते कपडे आपण त्यांना देतो.

आपली बेडरूम त्यांना देतो. शक्यतो पाहुण्यांसाठी वेगळी व्यवस्था करा. आपण ज्या ठिकाणी रोज झोपतो ती जागा, ती बेडरूम, ती जी प्लेस आहे, तिचा त्यांना वापर करू देऊ नकात. त्यांना वेगळी जागा द्या. तुम्ही वापरत असलेले कपडे आणि बेडरुम जर तुम्ही त्यांना देत असाल, तर आपल्या घरातील लक्ष्मी ही निघून जाऊ शकते.

किंवा ज्यांना तुम्ही वापरायला दिली त्यांच्याकडे तिचा वास होऊ शकतो. ती त्यांच्याकडे जाऊ शकते. हि एक सुद्धा फार महत्त्वाची गोष्ट आहे. हे जर शक्य होत नसेल तर काय करायचं. बरेचजण हे शहरांमधे राहतात किंवा खेडेगावात राहत असतात. लहान लहान घरे आहेत, आणि त्या ठिकाणी पाहुण्यांना मग झोपवणार तरी कुठे.

अस जर असेल तर तुम्ही नवीन एखादी चादर किंवा काही जे असेल तर ते नविन एखाद क्लॉथ, नवीन कपडे त्यांना तुम्ही देऊ शकतात. त्यावर त्यांना तुम्ही झोपायला सांगू शकता. किंवा तुम्ही जे रेगुलर वापरत नाही. इतर जे आहे ठेवणीतले जे तुम्ही खास पाहुण्यांसाठी ठेवले आहेत, ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. हे काय तर पुढची गोष्ट म्हणजे पैशांची चोरी.

अनेकजण लांडीलबाडी ने पैसा कमावतात. त्यांना वाटते की त्याच्याकडे लक्ष्मी आता आलेली आहे, आणि ती फार काळ टिकणार आहे. पैशाची झालेली चोरी, लांडीलबाडीने कमावलेला पैसा, हा तुम्हाला कधीही सुख देणार नाही. तुमच्याकडे लक्ष्मी तुम्हाला आहे असे वाटेल, तुमच्याकडे पैशाच्या राशी असतील.

मात्र त्यातून तुम्हाला सुख आणि समाधान कधीही मिळणार नाही. आणि त्यांच्यामुळेच आपण दुसऱ्याचा पैसा कधीही चोरून घेऊ नये. सत्पात्री दान करावा, जर तुम्ही चोरला असेल. असेल तुमच्याकडे जर तुम्‍ही वाम मार्गाने तो पैसा कमावलेला असेल, तर त्यातला काही पैसा तुम्ही दान करू शकता. दानधर्म केल्याने याचे काही तोटे हे कमी होवू शकतात.

शेवटची गोष्ट आहे की, काही काही गोष्टी लोक आपल्याला स्वखुशीने देतात, त्यांच्या मर्जीने देतात. उदाहरणार्थ आपल्याला आपल्या एखाद्या फ्रेंडने किंवा आपल्या घरच्यांनी पेन आपल्याला गिफ्ट दिला आहे. पण आपण तर पाहिलत की पेन घ्यायचा नाही. मगाशी जे आपण पाहिलं की पेन घ्यायचा नाही, त्यामध्ये आणि एखाद्याने त्याच्या मनापासून आपल्याला गिफ्ट दिलेलं आहे.

जे आपल्याला गिफ्ट दिलेले आहे त्यामधे फरक आहे. एखाद्याने जर एखादी वस्तू  आपल्याला त्याच्या मनापासून दिलेली असेल तर तिचा स्वीकार करा. तिचा स्वीकार केल्यामुळे कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा येणार नाही. दोघांनाही त्याचा फायदा होईल. ज्यांनी स्वीकारले आणि ज्यांनी दिलय.

दोघांनाही त्या गोष्टीचा शंभर टक्के फायदा होईल. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. ज्या ठिकाणी जबरदस्ती आहे, आपण हिसकावून एखादी गोष्ट घेतलेली आहे, त्याच्यावरती फोर्सफुली आपण एखादी गोष्ट घेतलेली आहे, त्या गोष्टीमध्ये मात्र आपल्याला तोटेच तोटे होतील. लक्ष्मी आपल्या वरती शंभर टक्के रुष्ट होणार.

अशा प्रकारे तुम्हाला समजल असेल की आपण कोणत्या वस्तू घ्यायला हव्यात आणि कोणत्या वस्तू घ्यायला नाही पाहिजेत. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ज्या धारदार वस्तू असतात, टोकदार वस्तू असतात. पेन असेल, पेन्सिल असेल, चाकू असेल, सुरी असेल, कैची असेल, तलवार असते.

तर ह्या ज्या वस्तू आहेत या धारदार असतात, टोकदार असतात. अशा वस्तू आपण शक्यतो दुसऱ्याच्या घेऊ नयेत आणि दुसऱ्याला सुद्धा देऊ नयेत. तर असे हे  सगळे नियम आहेत हे जर आपण पाळले,  तर भारतीय वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरामध्ये लक्ष्मी नानदायाला काही हरकत नाही.

सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या  कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *