धक्कादायक!! चिखली परिसरात हाणामारीप्रकरणी 9 जणांना अटक…

प्रादेशिक

रविवारी रात्री 10 ते 10:45 च्या दरम्यान चिखली परिसरातील जाधव सरकार चौकात ही घटना घडली असून 2 एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, पिंपरी-चिंचवड पोलिसांनी रविवारी रात्री 9 जणांना अटक केली आणि या प्रकरणाची दखल घेत चिखली पोलिसांनी 20 हून अधिक जणांवर 2 एफआयआर दाखल केले असून परिस्थिती आता नियंत्रणात आहे, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, रविवारी रात्री 10 ते 10:45 च्या दरम्यान चिखली येथील जाधव सरकार चौकात ही घटना घडली.

यामध्ये, अब्दुल मोईद अब्दुल रहीम चौधरी वय 35, जुबेर अहमद शोएब चौधरी वय 30, अब्दुल मुकित अब्दुल रहीम चौधरी वय25, अब्दुल कबीर चौधरी वय 23, सर्व रा. चिखली येथील पंत नगर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तसेच दुसऱ्या एफआयआरमध्ये पोलिसांनी शिवाजी नागेश उबाळे, मयूर लक्ष्मण जाधव, विशाल हनुमान उबाळे, सचिन रविकेश शुक्ला आणि अथर्व सुनील मयेकर यांना अटक केली, ते सर्व चिखली येथील जाधववाडी येथील आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रवींद्र दळवी हे मोटारसायकलवरून घराकडे निघाले होते. जाधव सरकार चौकात नमाज अदा करून परतणाऱ्या चौधरी यांच्या कारला त्यांच्या मोटारसायकलची धडक बसली. अपघातावरून त्यांच्यात जोरदार वादावादी झाली आणि दोन्ही पक्षांनी एकमेकांवर हल्ला केला. त्यानंतर काही वेळातच चौधरी यांच्या घरासमोर 15-20 जणांचा जमाव जमला आणि त्यांनी त्यांच्या घरावर दगडफेक केली.

चौधरी यांनी पुढे आरोप केला की, जमावाने त्यांना धमकावले आणि त्यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या कारची तोडफोड केली. या घटनेमुळे रविवारी आणि सोमवारी चिखली येथे जातीय तणाव निर्माण झाली होती. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे म्हणाले की, दोन वाहनांच्या धडकेने हा प्रश्न वाढला आहे.

तसेच “आतापर्यंत आम्ही या प्रकरणी 2 FIR दाखल केले आहेत आणि 9 जणांना अटक केली आहे. आम्ही चिखली येथे पोलीस बंदोबस्त तैनात केला असून परिस्थिती आता शांत आणि नियंत्रणात आहे, असे शिवाजी पवार, डीसीपी म्हणाले, या प्रकरणी चिखली पोलिसांनी भादंवि कलम 324, 354, 323, 504, 506, 143, 147, 149, 336, 427 अन्वये दोन एफआयआर दाखल केले असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *