छुपा कॅमेरा ओळखण्याचे काही टिप्स ! हॉटेल रुम्स,चेंजिंग रूम वापरत असाल तर या गोष्टी नक्की तपासा ।।

प्रादेशिक शिक्षण

नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.

श्री स्वामी समर्थ” आज काल हिडन कॅमेरा म्हणजे छुपा कॅमेरा वापरून महिलांच्या आणि मुलींचे नको असलेल्या अवस्थेतील फोटो काढले जातात व्हिडिओ रेकॉर्डिंग केली जाते आणि मग अनेक वेबसाईट्स वर हे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल केले जातात.

जर तुम्ही सुद्धा प्रवासा निमित्त एखाद्या हॉटेलमध्ये किंवा लॉजमध्ये थांबणार असाल किंवा एखाद्या कपड्याच्या दुकानात चेंजिंग रूम म्हणजे ट्रायल रूम चा वापर करत असाल तर या गोष्टींकडे अगदी गांभीर्याने लक्ष द्या. आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही ओळखू शकाल की त्या रूम मध्ये किंवा त्या ट्रायल रूम मध्ये छुपा कॅमेरा तर नाही ना?

अगदी साध्या सोप्या टिप्स आहेत त्या फॉलो करा आणि तुमचा आणि तुमच्या कुटुंबाचे संरक्षण करा. टिप्स नंबर १-तुम्ही ज्या रूम मध्ये थांबला आहात त्या रूममध्ये गेल्याबरोबर तेथील सर्व लाईट्स ऑफ करा सर्व लाईट बंद करा, आणि मग त्या खोलीमध्ये रेड लाईट किंवा ग्रीन लाईट दिसते का याचा निरीक्षण करा.

जर त्या रूम मध्ये लाल रंगाची लाईट चमकत असेल किंवा हिरव्या रंगाची लाईट चमकत असेल तर लक्षात ठेवा, तिची लाईट आहे तो छोटासा दिवा आहे तो कॅमेरा असू शकतो. टिप्स नंबर २– तुम्ही ज्या रूममध्ये गेला आहात त्या रुमचा दरवाजा ला असलेला हँडल एकदा चेक करा.

जवळजवळ पन्नास टक्के केसेसमध्ये या हँडल लाच किंवा जे हुक असत दरवाजाला त्या हुकला आणि हँडलला हे हिडन कॅमेरा अटॅच केलेले असतात. तर त्याचा बारकाईने निरीक्षण करा. टीप नंबर ३– हे जे हिडनकॅमेरे असतात त्यांना त्यासोबत एक मायक्रोफोन सुद्धा अट्ट्याच केलेला असतो.

आणि या मायक्रोफोन चा अगदी बारीकसा आवाज सतत येत राहतो आणि म्हणून रूम मध्ये गेल्याबरोबर सर्व लाईट्स तुम्ही ऑफ करणारच आहात मात्र त्याचबरोबर अगदी बारकाईने कान लावून जरासं एखादा असा आवाज येतोय का हे जरास पहा. असा आवाज जर येत असेल तर त्या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष द्या.

टीप नंबर ४– प्रत्येक रूममध्ये तुम्हाला आरसा हा सापडेलच आणि विशेष करून ज्या ट्रायल रूमस असतात जिथे आपण कपडे चेंज करतो त्या ठिकाणी तर आरसा लावलेलाच असतोच. कधी कधी हे आरसे फसवे असतात कारण हे आरसे आरपार असतात.

या आरशाच्या पाठीमागे कॅमेरे लावलेले असतात कॅमेरे लपवलेले असतात. तर हे कसं ओळखणार की हा आरसा आरपार आहे की नाही. त्यासाठी ची टेस्ट म्हणजे त्या आरशाला आपलं एक बोट चिकटवा एक बोट त्या आरशावरती ठेवा आपलं बोट आणि त्या आरशात दिसणाऱ्या बोटाच चित्र यामध्ये जर ग्याप दिसला, यामध्ये जर अंतर दिसलं तर हा आरसा आहे.

जर हा ग्याप दिसला नाही जर आरशातला बोट आणि तुमचं बोट दोघांचं एकमेकांना अगदी चिकटल तर लक्षात ठेवा हा आरसा नाहीये कारण हा आरसा आरपार आहे पलीकडून पलीकडच्या व्यक्तीला आत मध्ये काय घडते तुमच्या रूम मध्ये ही सर्व काही दिसत आहे. तरी एक टेस्ट अतिशय महत्त्वाचे आहे अशा बाबतीत.

टीप नंबर ५– आपल्या रूम चे सर्व कोपरे चेक करा. बरेचसे हिडन कॅमेरा हे जे कॅमेरे असतात हे कोपऱ्यावरचा लावलेले असतात त्यामुळे कोपरे अगदी बारकाईने पाहा आणि शेवटी आपल्या रूमचा दरवाजा आहे त्या दरवाजाच्या खाली कुठेही फट नाही ना कुठे स्पेस नाहीये ना हे अगदी चेक करा.

आजकाल अगदी लहान-लहान कॅमेरे मिळतात की तुम्ही रूम मध्ये गेल्यानंतर या खालच्या फटीतून हे कॅमेरे अलगद आत मध्ये सरकवले जातात आणि आतील सर घडामोडी रेकॉर्ड केल्या जातात फोटो काढले जातात. तर आशा आपल्या या दरवाजाच्या खाली फट नाहीये ना, स्पेस नाही ना याची सुद्धा काळजी घ्या.

हे सर्व झालं मात्र काही उपाय खूप चांगले उपाय यावरती आहे, १ गोष्ट म्हणजे जरास महाग आहे मात्र “हिडन कॅम्प डिटेक्टर” नावाचा एक डिवाइस मिळतं.तर तुम्ही हे डिवाइस विकत घेऊ शकता. हे डिवाइस विकत घेतल्यानंतर ते तुम्हाला सांगेल की तुमच्या रूम मध्ये कुठे असा हिडन कॅमेरा आहे की नाही.

ते शक्य नसेल तर दुसरी गोष्ट म्हणजे काही मोबाईल ॲप्स मिळतात उदाहरणार्थ बॉडीगार्ड नाव या नावाचे मोबाईल ॲप आहे ते ॲप्स तुम्ही वापरू शकता मात्र ते इतकं रिलायबल नाही इतका विश्वास मात्र नाही. एक अतिशय चांगला उपाय यावर ती असा आहे की तुम्ही रूम मध्ये गेल्यानंतर जर तुमच्या मोबाईलचा नेटवर्क गायब झालं.

तुमच्या मोबाइल मध्ये ज्या काडया असतात नेटवर दाखवणाऱ्या या काडया जर कमी जास्त होऊ लागल्या किंवा नेटवर्क गायब झालं तर लक्षात ठेवा त्या रूम मध्ये शंभर टक्के कॅमेरा आहे.रूमच्या बाहेर गेल्यानंतर रेंज येते मात्र रूम मध्ये केल्यानंतर जर रेंज गायब होत असेल तर ही शंका घेण्यास एक खात्रीशीर बाब आहे.

किंवा रूम मध्ये गेल्यानंतर कॉल लागत नसेल कॉल होत नसेल काडया तर दिसतात रेंज तर दिसते पण कॉल होत नाहीये अशा वेळेस समजुन जा की त्या रूममध्ये हिडन कॅमेरा लावलेला आहे. या सर्व गोष्टींची काळजी घ्या. आपली आणि आपल्या परिवाराची काळजी आपणच घ्यायची असते.

सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *