कुणी कितीही मागू द्या, या चार वस्तू कुणालाही देऊ नका, माता लक्ष्मी साथ सोडून जाईल आणि येईल गरिबी ।। महत्वाची माहिती जाणून घ्या !

कला प्रादेशिक

काही वस्तू असतात की ज्यांच्याशी आपलं भाग्य, आपलं नशीब, हे जोडलेले असत आणि म्हणून अशा वस्तू या आपल्या स्वतःच्या मालकीचे असतात. त्या वस्तू आपण इतर कोणाशीही शेअर करू नका. इतर कुणालाही देऊ नका. मग तो आपला चांगला मित्र असू द्या, चांगली मैत्रीण असू द्या, किंवा आपला जवळचा एखादा नातेवाईक, किंवा पाहुणा असू द्या, कोणाशीही आपण या वस्तू शेअर करू नका.

या वस्तू वाटून घेतल्याने किंवा  या वस्तू दुसऱ्याला दिल्याने, आपण आपलं नशीब, आपलं भाग्य हे दुसऱ्याला देत असतो. आणि त्याचा परिणाम म्हणून आपलं नशीब मग आपल्याला साथ देत नाही. आपल्या घरामध्ये गरिबी येते, दारिद्रय येत. आणि मग आपण म्हणतो की, माता लक्ष्मीचा आशीर्वाद आम्हाला कसा काय मिळतं नाही?

चला तर पाहूया की, या वस्तू कोणत्या आहेत? जी पहिली वस्तू आहे, ती महिला वर्गाची संबंधित आहे. महिला वर्गाने त्यांच्या पायातील जोडवे हे कधीही कुणालाही देऊ नयेत. याचं कारण असं आहे की हे पायातले जोडवे हे सौभाग्याचं लेन मानलं जातं. महिलांशी संभंधित ज्या, विवाहित महिला आहेत, त्यांच्या अशा काही वस्तू असतात.

जसं की, जोडवी झाली, किंवा मंगळसूत्र. मंगळसूत्र असेल, किंवा जोडवी असतील, तर या वस्तू विवाहित स्त्रियांनी कधीही कोणाशीही शेअर करू नये. मग तुमची जवळची मैत्रीण असू द्या, किंवा मग तुमचा एखादा जवळचा पाहुणा अस द्या, किंवा तुमचा एखादे जवळचे नातेवाईक असू द्या.

या वस्तू शेअर केल्याने, दुसऱ्याला दिल्याने, तुमच्यामधील आणि तुमच्या पतीमधील, म्हणजे पती-पत्नी मधील प्रेमामध्ये दुरावा निर्माण होतो. प्रेम कमी होत आणि मग बऱ्याचशा घटना अशा घडल्यात की, अगदी घटस्पोटापर्यंत हे प्रसंग जातात. आणि ज्या ठिकाणी पती-पत्नी मधे सौख्य नसत, प्रेम नसतं.

अशा घरामधे सतत वादविवाद होत राहतात. आणि मग ज्या ठिकाणी वादविवाद होतात, अशांती असते, अशा ठिकाणी माता लक्ष्मी राहणं पसंत करीत नाही. ती त्या घरातून कधीच निघून गेलेली असते. दुसरी जी गोष्ट आहे, ती म्हणजे अत्यंत महत्वाची आहे की

आपल्या घरामधे जर लहान, लहान मुले असतील. तर बऱ्याचदा अस होत की, आपण आपल्या मुलांनी वापरलेली कपडे किंवा असे कपडे की जे त्यांना आता फिट बसत नाही, किंवा त्यांना आता बसत नाहीयेत. तर असे कपडे हे दान म्हणून गरिबांना दिले जातात. तर लक्षात घ्या की, आपल मूल जोपर्यंत नऊ वर्षाचं, किंवा अकरा वर्षाचं  होत नाही,

तोपर्यंत त्यांची कपडे कोणालाही देऊ नका. दान म्हणून सुद्धा देऊ नका. आपल्या मनामधे परोपकराची भावना नक्की असेल की, गरिबांना थोडी मदत होईल. जर आपल्याला मदत करायची असेल, तर आपण या गरिबांसाठी नवीन कपडे घेऊन द्या. काही हरकत नाही.

मात्र, ज्यावेळी तुम्ही तुमच्या नऊ किंवा अकरा वर्षांपर्यंतच्या मुलांचे कपडे त्यांना देता, त्याचा थेट परिणाम हा तुमच्या मुलाच्या भाग्यावर असतो. त्याच्या नशिबावर होत असतो. तुम्ही पाहिले असेल की ज्या ज्या वेळी तुम्ही अशा प्रकारे कपडे दान म्हणून देता. काही दिवसातच तुमच मूल आजारी पडतं.

तुमचं मूल किरकिर करु लागत. ते स्वस्थ राहत नाही आणि याचं कारण तेच आहे  आणि म्हणून आपल्या मुलाच्या भाग्याशी तुम्ही असा खेळ करू नका. पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे, तुम्ही दुसऱ्याला  कपडे दान म्हणून देताना, म्हणजे अकरा वर्षेपुढील जी मोठी मुले आहेत, तर तुम्ही एखाद्याला कपडे दान म्हणून देतात.

तेव्हा हे कपडे साफसुत्रे करून, म्हणजेच अगदी स्वच्छ करून, धुवून ते कपडे आपण दान म्हणून द्यायला हवे. अगदीच चोळामोळा झालेले, आणि कसेतरी अस्ताव्यस्त पडलेले, फाटलेले,तुटलेले कपडे, आपण दान म्हणून देऊ नका. अशाने आपल्याला पुण्य तर लाभणार नाहिच मात्र, आपल्या भाग्यामधे मोठी घसरण यामुळे होते.

अजून एक गोष्ट लक्षात घ्या की,आपल्या या ज्या चप्पला असेल, किंवा बुटे असतील, हे आपण कधीही, कुणालाही, दान म्हणून देऊ नयेत. जुन्या चपला, बुटे सुद्धा देऊ नयेत. आणि त्याचबरोबर नवीन घेऊन सुद्धा, गिफ्ट म्हणून या चपला किंवा बुट आपण अजिबात देऊ नका.

या पाठीमागे अनेक  कारण आहेत की, ज्याचा परिणाम तुमच्या भाग्यावर होतो. हे मात्र लक्षात ठेवा चप्पल किंवा बुट या वस्तू कधीही दान म्हणून द्यायच्या नसतात. पुढची गोष्ट अत्यंत महत्त्वाची की झाडू. लक्षात घ्या आपण आपल्या घरामध्ये जो  झाडू वापरतो. तो आपण चुकूनही कोणालाही थोड्यावेळासाठी सुद्धा देऊ नका.

बऱ्याचदा अस होतो की, शेजारी किंवा आपल्या इथे लोक असतात, आपले इतर जे लोक असतात, की ते आपल्या घरातील झाडू मागतात थोड्यावेळासाठी. तर लक्षात घ्या की झाडू हा लक्ष्मी स्वरूप आहे. त्यामध्ये प्रत्यक्ष माता लक्ष्मीचा वास असतो. तुम्ही पाहिलं असेल की, भारतीय धर्म परंपरेमध्ये बरेचसे सण-उत्सव असे आहेत की, त्यावेळी आपण या झाडूची पूजा करतो.

याचं  कारण तेच आहे की, या झाडू मध्ये प्रत्यक्ष माता लक्ष्मीचं वास्तव्य असत. असा हा झाडू जर आपण इतरांना दिला तर लक्षात घ्या की, तुम्ही तुमच्या घरातील लक्ष्मी, संपत्ती ही इतरांबरोबर वाटून घेत आहात. आणि मग पुढे जाऊन जर तुमच्या घरामध्ये गरिबी आणि दारिद्र्यनिर्माण झालं तर,

त्यासाठी केवळ तुम्ही जबाबदार असता. तुम्हाला जर झाडू वैगरे दान द्यायचाच असेल, तर लक्षात घ्या तो  आपण मंदिरामध्ये दान द्यायचा असतो. कोणत्याही दिवशी एखाद्या शुभ दिवशी, ज्याठीकाणी शुभमुहूर्त आहे, अशा दिवशी जर तुम्ही झाडूच दान एखाद्या मंदिरांमध्ये केलत.

आणि ते गुप्तदान असावं. म्हणजे ते दान तुम्ही शक्यतो पहाटे करावं, सूर्योदयापूर्वी. की जे  कोणालाही समजू नये. तर असं झाडूच गुप्तदान केल्याने खूप शुभ फळं मिळतात. आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचे वास्तव्य निर्माण होत. हे झाडू दान  करणार आहे ते नवीन असतील याची आपण काळजी घ्यायला हवी.

त्यापुढची एक गोष्ट आहे की, पैसे उधार देन. तर पैसे उधार देताना, ते कधीही तुम्ही मंगळवारच्या दिवशी देऊ नका. कारण मंगळवारी दिलेले पैसे हे परत येण्याची सुत्रम शक्यता नसते, अजिबात शक्यता नसते. धर्म शास्त्रामधे, वास्तू शास्त्रामधे, ज्योतिष शास्त्रामधे, अनेक पुराणांमध्ये याचे उल्लेख आढळतात की

पैसा, किंवा लक्ष्मी, किंवा धान्य हे तुम्ही उधार देणार आहात एखाद्याला ते जर तुम्ही मंगळवारी दिल तर ते परत येण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. खूप प्रयत्न करून, आणि  उशिरा हे पैसे आपल्याला परत मिळतात. आणि  म्हणूनच मंगळवरी  पैसे, धान्य कधी कोणाला उधारीवर देऊ नका.

आणि मग काही लहान, सहान गोष्टी जसे की, आपल्या डोक्यावरील टोपी आहे, जी  अनेकजण एकमेकांना शेअर करतात, लक्षात घ्या की, आपल्या कपाळावर आपल भाग्य लिहिलेलं आहे. आणि म्हणूनच अशी टोपी सुद्धा आपण कधीही कोणासोबत शेअर करू नका.

सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही.ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !

माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *