चहा पिण्याचे दुष्परिणाम काय होऊ शकतात. आजकाल बऱ्याच लोक्काना चहा पिण्याची इतकी सवय लागली आहे की चहा पिणे आता सोडणं शक्य होत नाही. जर तुम्हाला चहा सोडणं शक्य नसेल, तर एक छोटासा बदल करा. हा बदल केल्याने तुम्हाला चहा पासून चे दुष्परिणाम होणार आहेत ते कमी होतील.
तुम्हाला गॅसेस ऍसिडिटी या सगळ्यांपासून सुटका सुद्धा होणार आहे. तुमच्या पोटामध्ये गॅस एसिडिटी सुद्धा होणार नाही. पहिली गोष्ट चहामध्ये आपण जी साखर मिसळतोय ही साखर टाकन बंद करा, साखरे ऐवजी आपण गुळ टाकायचा आहे. आपण अस का करायचं?
कारण साखर ही मुळातच आम्लधर्मी आहे. तसेच गूळ हा क्षारिय आहे. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये, जेव्हा आपण सकाळी चहा पितो त्यावेळी आपल्या शरीरामध्ये आधीच आमलच प्रमाण वाढलेले असते. आणि त्यात जर आपण साखरयुक्त चहा पिलो तर त्यामुळे या ऍसिड मध्ये अजून जास्त वाढ होते.
त्यामुळे ऍसिडिटी, गॅसेस यांचे प्रॉब्लेम सुरू होतात. तुम्ही साखरे ऐवजी जर गुळ मिसळला तर गूळ हा क्षारिय आहे. त्यामुळे आपल्या पोटात जे ऍसिड असते त्याला निःक्रीय करण्याचं काम करणार आहे. आपण साखरेऐवजी गूळ मिक्स करून चहा तयार करायचा आहे.
आता जेव्हा आपण साखरेऐवजी गूळ वापरतोय त्यावेळी आपल्याला या चहामध्ये दूध मिक्स करता येणार नाही. कारण दूध आणि गूळ यांचं कधीही एकमेकांशी पटत नाही. त्यांचे गुणधर्म वेगवेगळे आहेत आणि ते एकत्र मिक्स करून चालत नाहीत. काही आजारांवर, रोगांवर गुळ आणि दूध मिक्स केलेलं चालत.
पण रोजच्या चहामध्ये आपण गुळ जर टाकत असाल तर त्यामध्ये आपल्याला दूध मिक्स करता येणार नाही. आपण बिना दुधाचा चहा तयार करायचा आहे. काळा गुळाचा चहा घेतल्यावर त्या मध्ये आपण जरासं लिंबू पिळायचे. तुम्ही अर्ध लिंबु सुद्धा पिळू शकता शकता.
दोन-तीन थेंब चालेल, या मुळे आपण काळा चहा बनवलाय तो निःक्रीय होईल. तिथल्या तिथे आणि असा चहा पिल्याने आपल्याला होणारे त्रास कमीत कमी होणार आहेत. आपल्याला जे गॅस, एसिडिटी यासारखे जे त्रास होतात, तर यापासून सुद्धा आराम येणार आहे. अशा प्रकारचा चहा तुम्ही तयार करा.
साखरे ऐवजी गुळ वापरा. त्यामुळे आपल्याला विनंती की तुम्ही चहा पिणे सोडून द्या. चहा प्यायलास नकोये, कारण चहाचे अनेक तोटे आहेत. पण जर तुम्हाला खूप सवय लागली आणि चहा पिणे तुम्हाला सुटतच नाहीये तर तुम्ही हा मार्ग वापरू शकता.
सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.