ऑक्टोबर महिन्यात झालेल्या T-20 वर्ल्ड कपासाठी भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली 15 वर्षांचा विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी ऑस्ट्रेलियाला गेला होता. पण तिथे त्यांना उपांत्य फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले.
इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर त्याचे t-20 विश्वचषक जिंकण्याचे स्वप्नही भंगले. रोहित शर्मा प्रथमच आयसीसी स्पर्धेत संघाचे नेतृत्व करत होता. भारताच्या या अनुभवी फलंदाजाने आयपीएलमध्ये अनेकदा आपल्या संघाला यश मिळवून दिले असले तरी ऑस्ट्रेलियात झालेल्या T-20 विश्वचषकात तो टीम इंडियाला अपयशी ठरला.
याचबरोबर, सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या संपूर्ण वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियात कॅप्टन रोहित शर्माची धवासाठी संघर्ष करीत असल्याचे दिसून येत होते. त्यामुळे पुढील T-20 विश्वचषक 2024 मध्ये आहे. अशा स्थितीत पुढील 2 वर्षे फॉर्म आणि फिटनेस राखणे रोहितसाठी कठीण आव्हान असणार आहे.
दरम्यान, भारतीय क्रिकेट संघामध्ये एकापेक्षा एक खेळाडू आहेत. यामध्ये असे काही खेळाडू आहेत जे पुढील कसोटी मध्ये रोहित शर्माच्या जागी संघाचे नेतृत्व करू शकतात. सध्याचा कर्णधार रोहित शर्मा अवघ्या 35 वर्षांचा आहे.
त्यामुळे मग अशा परिस्थितीत भारतीय संघाकडे 2 खेळाडू आहे. जे कसोटी संघाचे कर्णधार होऊ शकतात. ज्यामध्ये सर्वप्रथम, कॅप्टन रोहित शर्माच्या जागी भारतीय संघातील वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला भारतीय कसोटी संघाचे कर्णधार बनण्याची शक्यता जास्त प्रमाणात असल्याचे सांगितले जाते. कारण जसप्रीत बुमराह फक्त 28 वर्षाचा आहे आणि टीम इंडियाला पुढे नेण्यासाठी त्याच्याकडे भरपूर वेळ देखील आहे.
जसप्रीत बुमराह भारतीय संघामधील सर्वात महत्त्वाचा खेळाडू असून त्याला कसोटीमध्ये भारतीय संघाचे कर्णधार पद दिल्यास तो संघाला खूप पुढे घेऊन जाऊ शकतो. भारतीय संघाला प्रत्येक फॉरमॅटसाठी वेगळा कर्णधार हवा असेल तर रोहित शर्माकडे वनडेचे नेतृत्व आणि जसप्रीत बुमराहला कसोटी संघाची जबाबदारी दिली जाऊ शकते.
याशिवाय, जसप्रीत बुमराह सोबत भारतीय संघातील स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा सुद्धा भारतीय संघाचा पुढील कसोटी कर्णधार बनू शकतो. सध्या रवींद्र जडेजा भारतीय कसोटी संघाचा नियमित सदस्य आहे. त्याचबरोबर कसोटी क्रिकेटमध्ये जडेजाची कामगिरी खूप उत्कृष्ट आहे. गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही क्षेत्रांमध्ये त्याची कामगिरी तुफानी आहे.
जडेजाच्या फिटनेस पाहता तो टीम इंडियासाठी दीर्घकाळ कसोटी क्रिकेट खेळू शकतो. अशा परिस्थितीत जडेजाला भारतीय कसोटी कर्णधार बनवण्याचा विचार केला येऊ शकतो. याशिवाय, जसप्रीत बुमराहने आतापर्यंत टीम इंडियासाठी 30 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने उत्कृष्ट कामगिरी करत 228 विकेट्स घेतले आहेत. तर दुसरीकडे रवींद्र जडेजाने टीम इंडियासाठी 60 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 2523 धावा केलेल्या असून 242 विकेट घेतल्या आहेत.
याशिवाय, यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत हा गेम चेंजर खेळाडू आहे. हे त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेकदा सिद्ध केले आहे. तसेच त्याने खासकरून ऑस्ट्रेलियन मैदानावर मोक्याच्या क्षणी स्वतः अनेक अवघड सामने जिंकवून दिले आहेत. याशिवाय, रोहितचे T-20 संघाचे कर्णधारपद हिरावून घेतल्याचे जवळजवळ नक्कीच मानले जात आहे.
तसेच रोहितला T-20 संघाच्या कर्णधारपदावरून हटवल्यास हार्दिक पांड्या आणि केएल राहुल त्याची जागा घेण्यास तयार आहेत. कारण केएल राहुलने रोहितच्या अनुपस्थितीत अनेकदा कर्णधारपद भूषवले आहे. राहुलमध्ये कर्णधार होण्याची क्षमता आहे.
राहुलची बॅट आयपीएलमध्ये जोरदार बोलते. तो मर्यादित षटकांमध्ये टीम इंडियाचा उपकर्णधार आहे. रोहितच्या अनुपस्थितीत त्याने अनेकवेळा संघाचे नेतृत्वही केले आहे. रोहितनंतर केएल राहुलला T-20 संघाचा कर्णधार बनवले जाऊ शकते.