लाभार्थ्यांनी पैसे वाचले म्हणून ते उधळू नका. तसेच नाहीतर चौफुला, टेंभुर्णी या ठिकाणी जाऊन तिथं उधळपट्टी करू नका, असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना दिला. मी लवकर आल्यानं काहींची अडचण होत नाही, कारण सकाळी-सकाळी लवकर सुरुवात केली ते कामांसाठी बरं ते पडतं.
पण त्यामुळं काहीं लोकांना अडचण होत असल्याचे दिसून येते,असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मुख्यमंत्रीएकनाथ शिंदेंना लगावला आहे. तसंच 1 किंवा 2 आपत्यावर थांबा. खासदार असताना असलेली लोकसंख्या आणि आता असलेली लोकसंख्या ही तुलनेने खुपचं वाढली असून काही दिवसांनी ब्रह्मदेव आला तरी घरं बांधून देऊ शकणार नाही, असे पिंपरीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान आवास योजनेच्या कार्यक्रमात बोलताना म्हणाले..
तसेच त्यांनी बाबांनो माझी तुम्हाला विनंती आहे, 1 किंवा 2 आपत्यावर थांबा. मी इथला खासदार असताना असलेली लोकसंख्या आणि आताची लोकसंख्या यात जमीन अस्मानाचा फरक आहे. तसेच जर लोकसंख्या अशीच वाढत गेली ना मग अगदी ब्रह्मदेव आला तरी सर्वांना घरं बांधुन देऊ शकणार नाही, असे आवाहन उपमुख्यमंत्री यांनी केलं.
दरम्यान, पंतप्रधान आवास योजनेत काहींचं नशीब उजळेल, मात्र काहींना घरं मिळणार नाहीत. त्यामुळं नाउमेद होऊ नका, असेही ते म्हणाले. तसेच ज्यांच्या घराचं स्वप्न पूर्ण होईल, अश्या लाभार्थ्यांनी अगदीच भारावून जाऊ नका. तसेच पैसे वाचले म्हणून ते उधळू नका. नाहीतर चौफुला, टेंभुर्णीला जाऊन उधळपट्टी करू नका, असा मोलाचा सल्ला अजित पवारांनी दिला आहे.
तसेच पंतप्रधान आवास योजनेची सोडत ही अत्यंत पारदर्शक असून तुम्ही अगदी माझ्याकडे आले अन् म्हणाले की, दादा माझी चिठ्ठी काढा, तर ते मला देखील जमणार नाही. मलाच काय तर कोणाच्याच हातात हे नाही. नाहीतर काही शहाणे असतात, जे म्हणतात मी घर मिळवून देतो. असले कोणतेही एजंट प्रशासनाने नेमले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच अगदी कोणाचे पीए जरी असतील तरी देखील त्यांच्यावर ही अजिबात विश्वास ठेवू नका. कारण नाहीतर 10 का 20 चे प्रकार आजकाल अनेक घडत आहेत. आता नशिबाने तुमचा नंबर लागणार आणि हे शहाणे म्हणतात बघा माझ्यामुळंच तुमचं स्वप्न पूर्ण झालं, असे म्हणून ते पैशांची लुबाडणूक करणाऱ्यांना मी लवकरच सरळ करणार असल्याचे ते म्हणाले..