सध्या महाराष्ट्राचे राजकरण कोणत्या थरापर्यत गेलं आहे हे सर्वांना माहितीच आहे. मात्र, त्यामध्ये सुद्धा आज एक भयंकर असा प्रकार घडल्याचे एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे दिसून येत आहे. ज्यामध्ये पुणे येथे अजित पवार यांचा दौरा सुरु असून या दौऱ्यात भाजप आमदार सुनील कांबळे यांची दादागिरी दिसून येत आहे. ज्यामध्ये त्यांनी राष्ट्रवादी एका पोलीस कर्मचाऱ्यास थप्पड मारल्याचे दिसून येत आहे.
सध्या राज्यात महायुतीचे सरकार आहे. ज्यामध्ये भाजपसोबत मित्रपक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना युतीमध्ये आहेत. तसेच अधूनमधून सत्ताधारी पक्षाचे आमदार यांचे दादागिरीचे किंवा गुंडगिरीचे किस्से समोर येतच असतात. परंतु आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासमोरच भाजप आमदाराचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
भाजप आमदार सुनील कांबळे यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यास मारहाण असून तसेच त्यांनी त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण केल्याची भयंकर घटना घडली. पुणे येथील ससून रुग्णालयातील तृतीय पंथीय वार्डाचे उद्घाटन कार्यक्रमात हा प्रकार घडला असल्याचे सांगितले जाते. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, हसन मुश्रीफ, सुनील तटकरे यांच्यासह काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर उपस्थित होते.
दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओ मध्ये दिसत आहे की, एका मंचावर एक कार्यक्रम चालू असून या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार व्यासपीठावर आहेत. दरम्यान, सुनील कांबळे मंचावरून खाली येत होते. त्यावेळी अचानक पायऱ्यांवर पाय घसरल्याने ते पडण्यापासून बचावले आणि त्यानी जवळच उभ्या असलेल्या पोलिसावर राग काढला आणि त्याच्या गालावर चापट मारली. दरम्यान, आमदार सुनील कांबळे यांनी व्यासपीठावर प्राधान्य न दिल्याने राग आला होता, त्यामुळेच त्यांनी आपली निराशा पोलिस कर्मचाऱ्यावर काढल्याचेही बोलले जात आहे. त्यानंतर ते राष्ट्रवादीच्या नेत्यावर संतापले असे दिसून येत आहे.
तसेच या घटनेबाबत आमदार सुनील कांबळे यांना ऑफ रेकॉर्ड विचारले असता त्यांनी सांगितले की, ‘त्या पोलीस अधिकारीने मला 2-3 वेळा ढकलले. त्यामुळे मला राग आला. मी त्याला 2 ते 3 वेळा नकार दिला पण तो ऐकला नाही म्हणून मी त्याला चापट मारली. तसेच आमदार सुनील कांबळे म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार हे आमचे नेते आहेत. ते रुग्णालयातील कामाची पाहणी करणार असल्याने मी गेल्या 7 दिवसांपासून या ससून रुग्णालयातील कामाची पाहणी व आढावा घेत आहे. मी तणावाखाली होतो.