बिग बॉस मराठी सीजन 3 सुरू झाला. बिग बॉस मराठी चा घरात यावेळी 15 स्पर्धकांनी एन्ट्री घेतली आहे. हे 15 स्पर्धक गेल्या काही वर्षांपासून सतत चर्चेत आहेत. तर आज आपण पाहूया कोणी कोणी बिग बॉस च्या घरात पदार्पण केले आहे. त्यापैकी पहिली स्पर्धक आहे, अभिनेत्री सोनाली पाटील.
हि अभिनेत्री नुकतीच देवमाणूस या गाजलेल्या मालिकेत झळकली होती. त्यानंतर दुसरा स्पर्धक आहे, अभिनेता विशाल निकम. दख्खनचा राजा जोतीबा या प्रसिद्ध मालिकेत जोतीबा हे पात्र साकारून त्याने महाराष्ट्रातील रसिकांच्या मनावर आपलं नाव कोरलेलं आहे. मिथून या मराठी चित्रपटातसुद्धा तो झळकलेला आहे.
त्यानंतर तिसरी स्पर्धक आहे, स्नेहा वाघ. अभिनेत्री स्नेहा ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत होती. तिचे दोन घटस्फोट झाले आहे. तसेच बिग बॉसच्या या घरामध्ये तिला तिच्या पहिल्या पतीसोबत राहावं लागणार आहेत. त्यामुळे बिग बॉसच्या घरात तुफान होणार हे नक्की.
चौथा स्पर्धक आहेत, उत्कर्ष शिंदे. शिंदेशाहीतील लोकप्रिय गायक तसेच डॉक्टर असलेले उत्कर्ष शिंदे यांनीही या घरात एक स्पर्धक म्हणून भाग घेतला आहे. यानंतर पाचवी स्पर्धक आहेत अभिनेत्री मीरा जगन्नाथ. अभिनेत्री मीरा ही नुकतीच येऊ कशी कशी मी नांदायला या मालिकेत मोमो च्या भूमिकेत झळकली होती.
सहावी स्पर्धक आहेत तृप्ती देसाई. महिलांच्या हक्कासाठी लढणाऱ्या तृप्ती देसाई यांनी ही एक स्पर्धक म्हणून बिग बॉस मराठी च्या घरात सहभाग घेतलाय. नुकताच इंदुरीकर महाराजांचे एका वक्तव्या विरोधात त्यांनी आवाज उठवला होता. त्यामुळे त्या खूप चर्चेत आल्या. पण यावेळच्या बिग बॉसच्या घरात एक कीर्तनकार सुद्धा आहेत.
त्यामुळे पुन्हा एकदा तृप्ती देसाई विरुद्ध कीर्तनकार हे पाहायला मिळणार आहे. त्यानंतर पुढचा सातवा स्पर्धक आहे, अभिनेता अविष्कार दारव्हेकर. अभिनेता आविष्कार हा मराठी मधील प्रसिद्ध अभिनेता आहे. तो आजपर्यंत अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये झळकला आहे. त्याने आभाळमाया, या गोजिरवाण्या घरात अशा मालिकांमध्ये अभिनय केलेला आहे.
पण काही दिवस तो फिल्म इंडस्ट्री पासून दूर होता. बिग बॉसच्या घरात त्याला त्याची पहिली पत्नी अभिनेत्री स्नेहा वाघ तिच्यासोबत राहावे लागणार आहेत. बिग बॉस मराठी च्या घरात हे दोघेही पुन्हा एकत्र आले. त्यामुळे या घरात यांच्यातील नातं कसा असणार हे पाहण्याची सर्वच स्पर्धकाना खूप उत्सुकता आहेत.
सुरेखा कुडची अभिनेत्री सुरेखा ही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहेत. तसेच या लावणी डान्स साठी ओळखले जाते. सुरेखा यांनी यापूर्वी अनेक मराठी चित्रपटांत अभिनय केलेला आहे. एकूण पन्नासपेक्षा जास्त चित्रपटात त्यांनी काम केलेलं आहे. नुकतेच या स्वाभिमानी या मालिकेत झळकले होते.
यानंतर नवीन स्पर्धक आहे गायत्री दातार. तुला पाहते रे या गाजलेल्या मालिकेत लोकप्रिय झाली होती. अभिनेत्री गायत्री ही तिच्या हसण्याचा प्रकारामुळे खूप चर्चेत असते. कमी वेळेत मोठी प्रसिद्धी मिळालेली अभिनेत्री म्हणून गायत्री दातारची ओळख आहे.
त्यानंतर पुढचा दहावा स्पर्धक आहे, अभिनेता विकास पाटील. अभिनेता विकास हा मराठी मधील प्रसिद्ध अभिनेता आहे. नुकताच तो बायको अशी हवी या मालिकेत झळकला होता. त्यानंतर अकरावी स्पर्धक आहे, शिवलीला पाटील. कीर्तनकार शिवलीला पाटील यांचे सुद्धा बिग बॉसच्या घरात एन्ट्री झाली आहे.
त्या एक प्रसिद्ध कीर्तनकार असून महाराष्ट्रभर त्यांचे चाहते आहेत. बिग बॉसच्या घरात प्रवेश करताना त्यांनी कीर्तन सादर केले. इंदुरकर महाराजांचे समर्थक केल्यामुळे त्या चर्चेत होते. त्यामुळेच आता बिग बॉसच्या घरात तृप्ती देसाई आणि शिवलीला पाटील यांच्यात इंदुरकर महाराजांवरून अनेक वादविवाद होणार हे तर नक्की आहेत.
त्यानंतर पुढची 12 वी स्पर्धक आहे मिलन शहा. MTV रोडीस मध्ये झळकलेली मीनल शहा ही एक उत्कृष्ट डांसर आहेत. त्यानंतर पुढचा तेरवा स्पर्धक आहेत जय दुधाने एम टीव्ही स्प्लिट्सविला थर्टीन (Splitsvilla) यामध्ये झळकलेला जय दुधाने याचीसुद्धा बिग बॉसच्या घरात एन्ट्री झाली.
पुढचा चौदावा स्पर्धक आहे, अक्षय वाघमारे. अभिनेता अक्षय वाघमारे हा अरुण गवळी चा जावई आहेत. काही दिवसांपूर्वी एका गोड मुलीचा बाबा झाला आहे. यानंतर पुढचा पंधरावा स्पर्धक आहे, संतोष चौधरी उर्फ दादूस. आगरी कोळी गान्यासाठी प्रसिद्ध असलेले गायक संतोष चौधरी यांच्या घरात एंट्री झाली. ते दादुस या नावाने प्रसिद्ध आहेत.
असे वेगवेगळे पंधरा स्पर्धक आहेत. यातील काही मध्ये अगोदर पासून अनेक मतभेद आहेत. म्हणूनच बिग बॉस मराठी च्या घरात फुल मज्जा येणार हे तर नक्कीच आहे. या स्पर्धकांबदल तुमची प्रतिक्रिया काय आणि तुम्हाला काय वाटतं. या वेळेस बिग बॉस मराठी चा हा तिसरा सिझन कोण जिंकणार?
सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.