भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकरांनी भारताच्या लाजीरवाण्या पराभवाची सांगितली 5 कारणे…

क्रीडा देश-विदेश

दरम्यान, सध्या विश्वकप अंतिम टप्प्यात आला असून आज झालेल्या दुसऱ्या सेमिफायनल मध्ये इंग्लंडकडून भारताचा लाजिरवाणी पराभव झाला आहे. त्यामुळे या पराभवाची कारणे सांगताना सुनील गावसकरांनी या दारुण पराभवाकची 5 कारणे सांगितली आहेत. दरम्यान, आज विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत इंग्लंडचा विजय आणि टीम इंडियाच्या दारुण पराभवानंतर भारतीय फॅन्स निराश झाले असल्याचे दिसून येत आहे.

त्याचबरोबर भारताचा कप्तान रोहित शर्मा आणि संघाच्या कामगिरीवरही क्रिकेट दिग्गजांनी नाराजी व्यक्त केली आहे. एडिलेडमध्ये भारतीय संघाच्या पराभवावर दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी अतिशय जळजळीत प्रतिक्रिया दिली. पराभवाची 5 कारणे सांगत आता काही खेळाडूंनी निवृत्त घेऊन टाकावी, असा सल्लाच त्यांनी सिनियर खेळाडूंना दिला.

सुनील गावस्कर यांनी सांगितले पहिले कारण म्हणजे, भारतीय संघाचे पॉवर प्लेमधील अपयश होय. कारण भारतीय खेळाडुनी अपेक्षित अशी दमदार कामगिरी केली पाहिजे होती. टीम इंडियाला महत्त्वाचे सामने जिंकायचे असतील तर पॉवर प्लेमध्ये धमाका करावा लागेल. भारत प्रत्येक पॉवरप्लेमध्ये विकेट गमावतोय त्यामुळे संघाचा तोटाच होतोय.

याशिवाय, पॉवर प्लेमध्ये गोलंदाजांना विकेट्स घेता येत नसतील तर विजयाचा पाया रचता येत नाही. टीम इंडियाला गोलंदाजीच्या या क्षेत्राकडे लक्ष द्यावे लागणार आहे. तसेच टीम इंडियाचा मुख्य गोलंदाज जसप्रीत बुमराहची अनुपस्थिती जाणवली. ते इंग्लंडविरुद्धच्या पराभवाचे एक कारण ठरले. मोहम्मद शमीने प्रयत्न केला, पण त्याला जसप्रीत बुमराहची जागा भरून काढता आली नाही.

टीम इंडियाच्या अव्वल गोलंदाजांपैकी एक असलेल्या भुवनेश्वर कुमारची कामगिरी खराबच होत राहिली. भुवीने सुरुवातीला चांगली गोलंदाजी केली, पण मोठ्या सामन्यांमध्ये त्याला फारसा प्रभाव पाडता आला नाही. याकडे आता भारताला लक्ष द्यावे लागेल. नवीन गोलंदाज अर्शदीप सिंगच्या कामगिरीचे कौतुक केले पाहिजे. परंतु अनुभवाचा अभाव हे पराभवाचे एक कारण असल्याचे दिसले. अर्शदीपने विकेट घेतल्या, पण मोठ्या सामन्यात त्याचा अनुभव कमी पडला.

तसेच या दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने असा आणखीन विश्वविक्रम केला आहे, जो आतापर्यंत जगातील कोणताही फलंदाज करू शकला नाही. टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहली T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4,000 धावा पूर्ण करणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने एक विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे, जो आतापर्यंत जगातील कोणत्याही फलंदाजाला करता आलेला नाही. टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहली T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4,000 धावा पूर्ण करणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे.

T20 विश्वचषक 2022 च्या इंग्लंड विरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात विराट कोहलीने 42 वी धाव पूर्ण करताच T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4000 धावा पूर्ण केल्या आहेत. या सामन्यात विराट कोहलीने 50 धावा केल्या. यासह त्याच्या आता T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4008 धावा झाल्या आहेत.
विराट कोहलीने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक शतक आणि 37 अर्धशतकं झळकावली आहेत. विराट कोहलीने आतापर्यंत 115 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 52.73 च्या सरासरीने 4008 धावा केल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *