नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.
“श्री स्वामी समर्थ” अशी एक कोणती सवय आहे जी आपण सोडली तर आपण देखील 99% अपयशी लोकांमधून 1% यशस्वी लोकांच्या श्रेणीमध्ये जाऊन बसू शकतो. आपल्या सर्वांना पैसा हवा आहे. आपल्या सर्वांना यशस्वी व्हायच आहे. आपण जे काही लक्ष ठरवलं आहे ते आपल्या पूर्ण करायच आहे.
मात्र आपल्या या वाटेमध्ये अनेक प्रकारच्या समस्या येतात,अनेक प्रकारचे अडथळे येतात,अडचणी येतात आणि मग आपण हार मानतो. मात्र त्यापूर्वी तुम्ही एक सवय सोडली तर तुम्ही देखील यशस्वी होऊ शकता.अशी कोणती सवय आहे जी तुम्हाला तुमच्या टार्गेट पर्यंत पोहोचायला मदत करते.
पृथ्वीवरती जेवढे जीव आहेत तेवढ्यात सगळ्यात श्रेष्ठ असा कोणता जीव असेल तर तो माणूस आहे. या माणसामध्ये प्रत्येक प्रकारची क्षमता आहे. मानवामध्ये कल्पकता आहेत, आयडिया आहेत.आपल्याकडे पण अनेक प्रकारच्या आयडिया आहे. त्यातील एक जरी आयडिया तुम्ही सत्त्यात आणली तर तुम्ही देखील यशस्वी होवू शकतात.
यशाच्या पायऱ्या तुम्ही देखील चढून जाऊ शकता. अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला यशस्वी होण्यापासून थांबवत आहे. एक कथा आहे,खूप वर्षा पूर्वीची कथा आहे. एक राजा होता त्यांना एका व्यक्तीने बहिरी ससाणे भेट म्हणून दिले होते. हे बहिरी ससाणे उच्च कुळातील होते.
अतिशय रुबाबदार आणि देखणे ते बहिरी ससाणे होते.राजाने ठरवलं की ह्या बहिरी ससान्यांला आपण चांगल्या प्रकारचे प्रशिक्षण द्या. त्यासाठी त्यांनी एका प्रशिक्षकाची नियुक्ती केली.प्रशिक्षक आला आणि त्या बहिरी ससाणे यांना चांगल्या प्रकारचे प्रशिक्षण दिलं.दोन तीन महिने उलटून गेले,राजा त्या सास्याण्यांना बघण्यासाठी गेला.
जाऊन बघतो काय तर एक ससाणा उंच उंच भरारी घेत होता. आकाश भरारी घेत होता आणि दुसरा ससाणा मात्र एका फांदीवरती जाऊन बसला होता.तो जरासा उंच उडायचा मात्र लगेच खाली येवून त्या फांदीवर येऊन बसत होता.राजाला आश्चर्य वाटलं की अस का होतंय? राजाने प्रशिक्षकाला विचारले की अस का होतंय?
तर तो म्हणाला की हे आजचं नाही हे दररोजच आहे.खूप सारं ट्रेनिंग दिलं अगदी त्या ससाण्याला जसं ट्रेनिंग दिलं तस ह्याला पण दिलं.मात्र हा जरासा उंच उडतो आणि परत त्या फांदीवर येऊन बसतो. नेमक होतंय तरी काय हे मला दोन तीन महिने झाल तरी कळतं नाही. राजाला दुःख वाटलं की जसं पहिला ससाणा उंच उडतोय तसाच हा देखील ससाणा उंच उडायला हवा.
या ससाण्यामध्ये काही कमतरता नाही, कोणती क्षमता कमी नाही आणि यासाठी राजाने संपूर्ण राज्यामध्ये दवंडी दिली आणि चांगल्या चांगल्या ट्रेनर आणण्याच ठरवल. त्यानुसार अनेक ट्रेनर आले, प्रशिक्षक आले, त्यांनी त्या ससाण्याला भरपूर प्रशिक्षण दिलं, वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आले,वेगवेगळे प्रयोग त्याच्यावर करण्यात आले मात्र ससाण्यामध्ये काही फरक पडला नाही.
शेवटी एक दिवस एक शेतकरी आला आणि त्या शेतकऱ्यांनी अस काही केलं ज्यामुळे तो ससाणा देखील उंचच उंच भरारी घेऊ लागला आकाशामध्ये उडू लागला.दोन्ही ससाणे आकाशामध्ये उडत होते.राजाला ही बातमी कळताच राजा आश्चर्यचकित झाला,असं नेमकं काय झालं आहे असं कोणत ट्रेनिंग त्या शेतकऱ्याने दिलं आहे.
राज्याने हजार मोहरांची एक थैली शेतकऱ्याला भेट म्हणून दिली आणि शेतकऱ्याला एकच प्रश्न केला की, मला फक्त एवढं सांग की तू नेमक काय केलंस ? कोणत ट्रेनिंग तू ह्याला दिलंस? जगातले वेगवेगळे विद्वान इथे येऊन गेले, माझ्या राज्यातीलच नव्हे तर माझ्या राज्याबाहेरील सुद्धा विद्वान येथे येऊन गेले.
त्यांनी सगळे प्रयत्न केले मात्र त्यांना जे जमलं नाही ते तू कस की करून दाखवलं? त्यावर तो शेतकरी म्हणाला की ,राजे मी दुसर काही केलेलं नाही मी पाहिलं की तो ससाणा ह्या फांदीला सोडतच नाही, काही जरी झाल तर तो तिथेच येवून बसतो.मग मी इकडे तिकडे कुठेच पाहिलं नाही माझी कुऱ्हाड घेतली आणि ती फांदी मी तोडून टाकली.
फांदी तोडल्यानंतर तो ससाणा अस्वस्थ झाला आणि त्याला काय करावं ते समजेना आणि मग त्याचा सहकारी त्याचा जो मित्र होता पहिला तो उंचच उंच उडत होता त्याप्रकारे उडण्याचा त्याने प्रयत्न केला आणि दुसऱ्याच प्रयत्नात हा ससाणा उंचच उंच उडू लागला.
हा जो दुसरा ससाणा आहे ना अगदी तशीच अवस्था आपली झाली आहे.आपल्यामध्ये शक्ती आहे,क्षमता आहे ,प्रत्येक प्रकाराची पॉवर आपल्यात देखील आहे.तो पहिला ससाणा जसा उडत आहे तशीच आपलं देखील आपल्या जीवनामध्ये गरुड भरारी घेऊ शकतो.
उंचच उंच भरारी आपण घेवू शकतो. आपल्या गरज आहे ती फक्त, आपण फारच कमजोर आहोत,आपण हे करू शकत नाही. ही सवय सोडून देण्याची.केवळ ही एक सवय सोडून द्या.तुम्ही स्वतःला ज्या कम्फर्ट झोनमध्ये बांधून ठेवलं आहे तुमच्या कडे छोटी मोठी नोकरी आहे , छोटा मोठा तुमचा जॉब आहे तुमचे उपजीविका त्यामध्ये होत आहे.
अन्न ,वस्त्र निवारा ह्या गरजा तुमच्या भागत आहेत तुम्ही त्यामध्ये स्वतःला सुखी आहात असे म्हणत आहात. तुम्ही जी स्वप्न पाहिली होते ती स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने पाऊल टाका. एक दिवस तुम्हाला तुमचं स्वप्न पूर्ण झालेलं दिसेल.मात्र त्यासाठी तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोन मधून बाहेर यावं लागेल.
असा जर काळ होत गेला ना,एक दिवस तुम्ही म्हातारे व्हाल आणि तुमच्या मनामध्ये येईल की काश एकदा फक्त एकदा जर मी हिम्मत केली असती तर आज मी या ठिकाणी असतो.एका उच्च ठिकाणी मी असतो.माझी जिन्दगी काही वेगळीच असती.एक वेगळ्या प्रकारचे जीवन मी जगलो असतो.
त्यासाठी तुम्ही एकदा हिंमत केली पाहिजे तुम्ही सुद्धा तुम्हाला जे हवं आहे,तुमचं जे स्वप्न आहे ते नक्की पूर्ण होईल.त्याला योग्य पर्यायाची दिशा द्या.चांगल्या प्रकारचे प्रशिक्षण घ्या.तुम्हाला जे येत नाही तुम्ही ते शिकून घ्या.तुम्ही सुद्धा तुमचे लाईफ मध्ये यशस्वी होऊ शकता.
सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.