भाजपने नितीन गडकरीना साईडलाईन केलंय; सुप्रिया सुळेचं खळबळजनक विधान!!

Pune

काल राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेत्या खासदार सुप्रिया सुळेनी बारामतीच्या दौऱ्यावर होत्या. त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी तसेच माध्यमांशी संवाद साधला आणि यामध्ये त्यांनी केलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बद्दल केलेल्या एका विधानामुळे मोठी खळबळ माजली आहे. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे गटासोबत गेल्यापासून राष्ट्रवादीमध्ये शरद पवार गट आणि अजित पवार गट असे 2 गट पडले आहेत.

तसेच त्यातच निवडणूक आयोगाने गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संपूर्ण ताबा आणि चिन्ह राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्याचा निर्णय दिला आहे. तसेच यामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला असून त्यानंतर विविध ठिकानाहून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. दरम्यान शरद पवार गटाच्या नेत्यांनी हार न मानता पुन्हा पक्ष उभा करून लढण्याचा विश्वास दर्शवला आहे.

यामध्ये शरद पवार यांच्या कन्या आणि राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेत्या सुप्रिया सुळे काल बारामतीच्या दौऱ्यावर होत्या. तसेच यावेळी कार्यकर्त्यांशी आणि माध्यमांशी संवाद साधतांना त्यांनी केलेल्या एका विधानामुळे मोठी खळबळ माजली असल्याचे दिसून येत आहे. त्यांनी भाजपचे नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबद्दल हे विधान केलं असून यामध्ये “नितीन गडकरी चांगलं काम करत आहेत.

पण गडकरींना साईडलाइन केलं” असं विधान त्यांनी केलं आहे आणि त्यामुळे त्यांच्या या विधानामुळे एकच खळबळ माजली आहे. दरम्यान, बारामतीच्या दौऱ्यावर असताना खासदार सुप्रिया सुळे विविध मुद्यांवर बोलल्या. ज्यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी चांगल काम करतात, पण ते भाजपमध्ये असल्याने आम्हाला प्रेम देत असतात.

ते दुसऱ्या पक्षात असले तरी जे चांगलंय त्याला चांगलं म्हटलं पाहिजे’ असं खासदार सुप्रिया सुळे यावेळी पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या. तसेच एवढंच नव्हे तर ‘गडकरींना साईडलाईन केलं’ असं मोठं विधानही त्यांनी केलं. यावेळी त्या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांबद्दलही बोलल्या. जनता देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा मागत आहे.

मला त्यांचं वाईट वाटतं बिचारे 105 आमदार आले आणि 10 मार्क असताना 5 कमी केले आणि DCM केलं. परत 2 डीसीएम केले 2.5 मार्कवर आणलं. 10 पैकी 2.5 मार्क सांगा मग पास की नापास ? असा सवाल त्यांनी विचारला. तसेच बारामती दौऱ्याबद्दलही त्या म्हणाल्या की, बारामती मतदार संघातील लोक अनेक कामे घेऊन मुंबईत येत असतात, त्यामुळे मी बारामतीत नागरिकांना येऊन भेटते. बारामती लोकसभा मतदारसंघापुढे पाणी, बेरोजगारी आणि हमीभाव ही मोठी आव्हाने उभी आहेत. मी सातत्याने पाण्याच्या टँकरची मागणी करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *