नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.
“श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ”. स्वामी भक्त हो आपल्या घरामध्ये सुख समृद्धी सकारात्मक ऊर्जा राहण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये बरेचसे उपाय सांगितले आहेत. ज्या उपायांमुळे आपल्या घरातील अनेक समस्यांचे निवारण होऊ शकते. तसेच वास्तुशास्त्रामध्ये अशा अनेक गोष्टी देखील सांगितल्या आहेत ज्या करने खूप गरजेचे असते.
परंतु आधुनिक जीवनात आपल्या आयुष्यात इतके बदल होत राहतात ज्यामुळे आपली संस्कृती मागे पडत जाते आहे, आणि याचा परिणाम सुद्धा आपल्या वैयक्तिक आयुष्यावर सुद्धा होत राहतो आहे. तसेच त्याचा परिणाम पडत आहे तो आपल्या जेवण करण्याच्या पद्धतीवर.पूर्वी लोक जमिनीवर बसून आहार करत असत.
परंतु आजच्या कलियुगामध्ये असे अनेक लोक आहेत जे बिछाना किंवा बेडवर बसून जेवन करतात. तुम्हाला वाटत असेल की ह्यात काय आश्चर्याची गोष्ट आहे, परंतु आपल्या हिंदू धर्मामध्ये जेवण करते वेळी काही गोष्टींचे पालन करणे आणि त्याचे महत्त्व देखील सांगितले आहे.
चला तर मग जाणून घेऊया की बिछान्यावर बसून जेवण करणे का चुकीचे मानले जाते. प्राचीन धर्म ग्रंथांमध्ये जेवण करताना कोणते नियम पाळावेत हे देखील सांगितले आहे. हे नियम धार्मिक तसेच वैज्ञानिक दृष्ट्या योग्य असल्याचे सिद्ध झाले आहे. हे नियम हजारो वर्षांपूर्वी आपल्या ऋषी-मुनींनी सांगितले होते.
तेच नियम आज विज्ञानात सुद्धा सांगितले जातात. प्राचीन धर्म ग्रंथांमध्ये असे सांगितले आहे की, जेव्हा लोक जमिनीवर बसून जेवण करत त्या वेळी त्यांच्या शरीरातील आणि पृथ्वीवरील ऊर्जा एकत्र येत असत. आणि मग परिणामी स्वरूप ते लोक आजच्या तुलनेमध्ये जास्त स्वस्थ आणि बलशाली बनत असत.
याच एक करणामुळे प्राचीन काळातील लोक जास्त समृद्ध आणि जास्त काळ जीवन जगत असत. म्हणून आपल्याला सुद्धा धर्मग्रंथांमध्ये सांगितलेले हे नियम पाळणे अतिशय आवश्यक आहे. या नियमांच्या संदर्भात ज्योतीष शास्त्रामध्ये असे देखील सांगितले आहे की आपल्या जेवणाच्या सवयींचा आपल्या ग्रहांवर सुद्धा परिणाम होत राहतो.
आपण एका गोष्टीचे निरीक्षण केले तर आपल्याला समजेल की एका ठराविक वयानंतर माणसाच्या शरीरात कमजोरी येणे ही खूप सामान्य गोष्ट झाली आहे. याचे कारण म्हणजे आपल्याला आपल्या धर्मग्रंथांमध्ये दिलेल्या माहितीचे पुरेपूर ज्ञान नसणे हेच आहे. या माहितीमध्ये येणारी पहिली गोष्ट म्हणजे आपले स्वयंपाक घरच आहे.
वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाक घराला बृहस्पती ग्रहाचे प्रतीक मानले गेले आहे. प्राचीन काळामध्ये राजा महाराजांचे स्वयंपाक घरेसुद्धा या गोष्टींचा विचार करूनच बनवली जात असत. तसेच स्वयंपाकघर हे कधीही शौचालया समोर नसावे. तसेच स्वयंपाक घराचा दरवाजा शौचालयाच्या दरवाजाच्या समोर कधीही येता कामा नये.
तसेच आपण जेवण करते वेळी कोणत्या दिशेला तोंड करून अन्न ग्रहण करावे हे देखील वास्तु शास्त्रांमध्ये सांगितले आहे. वास्तुशास्त्रानुसार पूर्व आणि उत्तर दिशेला तोंड करून अन्नग्रहण करणे उत्तम मानले गेले आहे. पुराणांमध्ये सुद्धा पूर्व आणि उत्तर या दिशा सर्वोत्तम दिशा मानल्या गेल्या आहेत.
या दिशेला मुख्य करून जेवण केल्याने आपले स्वास्थ्य देखील उत्तम राहते. तसेच आपल्यावर देवी-देवतांचा आशीर्वादही कायम राहतो आणि आपल्याला प्रत्येक कार्यामध्ये यशप्राप्ती होते. त्याच प्रमाणे दक्षिण दिशेला तोंड करून अन्न ग्रहण केले तर यश आणि मानसन्मान प्राप्त होतो आणि पितरांचे आशीर्वाद देखील आपल्याला मिळतात.
परंतु यामध्ये एक गोष्ट अपवाद मानली गेली आहे ते म्हणजे, ज्या लोकांचे आई वडील जिवंत आहेत त्यांनी दक्षिण दिशेला तोंड करून जेवण करू नये. अशा लोकांनी पश्चिम दिशेला तोंड करून अन्न ग्रहण करावे. वास्तुशास्त्रानुसार पश्चिम आणि दक्षिण दिशेच्या मध्ये तोंड करून तुम्ही अन्नग्रहण करत असाल तर तुमची पचनशक्ती कमजोर होऊ शकते.
आणि तुम्हाला पोटा विषयाच्या समस्यांचे गंभीर आजार देखील होऊ शकतात. म्हणून पश्चिम आणि दक्षिण दिशेच्या मध्ये तोंड करून कधीही अन्नग्रहण करू नये तसेच वास्तुशास्त्रानुसार हात, पाय तोंड धुवणे खुप गरजेचे आहे. असे केल्याने आपले आयुष्य वाढते.
तसेच पाय ओले असतील तर आणि तुम्ही अन्नग्रहण करत असाल तर ते देखील शुभ मानले गेले आहे. कारण पाणी हे पंचतत्व पैकी एक आहे आणि जमिनीवर बसून जेवण केल्याने पृथ्वी आणि जल तत्वांचा मिलन होत राहतो. जे आपल्या स्वास्थ्यासाठी उत्तम मानले गेले आहे.
यामुळे शरीरातील उर्जेचा प्रभाव चांगल्या प्रकारे होतो जो आपल्या मनावर, आणि रागावर नियंत्रण करण्यासाठी मदत करतो. तसेच दक्षिण, पूर्व दिशेच्या मध्ये असणाऱ्या दिशेला तोंड करून अन्न ग्रहण केल्याने स्वप्नदोष, तसेच यौन संबंधी आजार होऊ शकतात.
शास्त्रानुसार मांडी घालून जेवण करणे हे उत्तम मानले जाते. जे लोक खुर्ची, टेबल वर बसून पाय हलवत अन्नग्रहण करतात ही गोष्टसुद्धा शास्त्रांमध्ये अशुभ मानली गेली आहे. तसेच ज्या लोकांना आर्थिक अडचण आहे त्यांनी पश्चिम दिशेला तोंड करून आणले ग्रहण करावे.
तसेच लहान-मोठ्या घाणेरड्या ताटामध्ये अन्नग्रहण कधीही करू नये. त्याचे कारण असे आहे की असे केल्यावर संकटांना बोलावणं सारखेच आहे. तसेच तुमच्या स्वयंपाक घरामध्ये जुनी तुटलेली भांडी असेल तर ती घरामध्ये कधीही ठेवू नये व त्याचा वापरही कधी करू नये.
वास्तुशास्त्रानुसार बिछान्यावर बसून जेवण करणे चुकीचे आहे. असे केल्याने अन्नाचा अपमान होतो तसेच राहु ग्रह सुद्धा तुमच्यावर नाराज होऊ शकतो. तसेच त्याचे अजून एक कारण आहे ते म्हणजे बिछाना किंवा गादी ही रुई पासून बनलेली असते, आणि रुई ही आपल्या शरीरातील ऊर्जेला बाहेर येऊ देत नाही.
आणि म्हणून जेव्हा आपण जेवण खाली बसून जेवतो तेव्हा आपल्या यकृतामधून उष्णता निघत असते आणि बिछान्यावर बसून जेवण केल्याने ती उष्णता आपल्या शरीरातून बाहेर पडत नाही. जमिनीवर देखील पोहचू शकत नाही, ज्यामुळे आपले पाचन तंत्र खराब होऊ शकते तसेच जमिनीवर बसून अन्नग्रहण केल्याने आपल्या शरीराचे तापमान नियंत्रित राहण्यासाठी मदत होते.
त्याचप्रमाणे जेवण करून झाल्यानंतर ताटामध्ये हात धुवणे अशुभ मानली जाते, असे केल्याने देखील अन्नपूर्णा मातेचा अपमान होतो आणि ग्रंथानुसार असे केल्याने चंद्र आणि शुक्र ग्रह नाराज होऊ शकतात. ज्या घरांमध्ये असे होते त्या घरामध्ये लक्ष्मी देखील नांदत नाही. त्याचप्रमाणे ताटामध्ये उष्ट आणि अर्धवट पदार्थ खाऊन ठेवणे चुकीचे आहे.
असे केल्याने अन्नपूर्णा मातेचा श्राप आपल्याला लागू शकतो. म्हणून आपल्याला जेवढी भूक आहे तेवढेच ताटामध्ये अन्न घ्यावे.”श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ”. अशा प्रकारे जेवण करतेवेळी काही गोष्टींची काळजी घेणे खूप आवश्यक आहे. आशा आहे यातून तुम्हाला धार्मिक तसेच वैज्ञानिक दृष्टिकोनही समजला असेल.
सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.