बायको सुंदर हवी की समजदार ? ।। तुम्हाला काय वाटते !

प्रादेशिक शिक्षण

नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.

“श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ” खरं सौंदर्य हे पाहणाऱ्याच्या नजरेत असतं. कोणाला काय आणि कसं व्यक्तिमत्व आवडेल हे त्या व्यक्तीच्या पूर्वजन्मावर आणि स्वभावावर अवलंबून असते.अगदी सौंदर्य हा एक समजदारपणा हा दुसरा शब्द माणसाच्या वैवाहिक आयुष्यात खरंच महत्त्वाचे असतात.

आपण विवाहित असाल किंवा अविवाहित असाल तरी हा विषय आपल्यासाठी महत्त्वाचं असू शकतो. बायको सुंदर हवी की समजदार ? अनेकांचे उत्तर सुंदरही हवी आणि समजदारही हवी अस असू शकते आणि ते साहजिक आहे.

खरतर ईश्वराने प्रत्येकाला सुंदर बनवले आहे. प्रत्येक जण स्वतःसाठी सुंदर असतेच, परंतु ज्याच्या त्याच्या नजरेत जो तो आपापल्या स्वार्थापोटी सुंदर किंवा कुरूप अशी विशेषणे लावत असतो. त्यानंतर नको त्या गोष्टीला समाजाने ही तुलना वाढत गेली.

आयुष्य जगताना प्रत्येकाला लग्नाच्या पवित्र बंधनात अडकावेच लागते, परंतु लग्न करण्याआधी किंवा लग्नानंतर अनेक मुलांचे किंवा पुरुषांची अशी अपेक्षा असते की मुलगी सुंदर असावी. आता हे सौंदर्य बहुतांश पुरुषांच्या नजरेत चेहऱ्याचेच असू शकते. ती आपापली निवड असते.

एक लक्ष्यात ठेवा की किंवा लिहून ठेवण्यासारखे वाटते की, “सुंदर स्त्री जवळ समजूतदार पणा असेलच असे नाही परंतु समजूतदार स्त्री अनेक बाबतीत सुंदर असते” हे कायम लक्षात ठेवायला हवं.

अनेक सौंदर्य हे वयासोबत कमी होत जाते पण समजूतदारपणा हा वयासोबत वाढत जातो तो तरुण होत जातो आणि घरातील संसारातील किंवा जीवनातील योग्य निर्णय घेण्यासाठी सौंदर्यपेक्षा समजूतदारपणा महत्वाचा ठरतो. सौंदर्याला विरोध नाहीच उलट सौंदर्य हे प्रत्येकाला आवडणारी गोष्ट आहे.

पण सौंदर्य हे फक्त दिसण्यात नसून असण्यातही असते.हा विचार सुद्धा मनात असायलाच हवा.तुमच्या मुलांना सुंदर आणि समजूतदार आई हवी असते पण जगातील सगळ्याच आई दिसायला सुंदर नसूनही त्यांच्या असण्याचे सौंदर्य मुलांचे उज्वल भविष्य घडविण्याचे हजारो उदाहरणे समाजामध्ये मिळतात.

स्वतःचे आई-वडील वृद्ध झाल्यास स्वतःची काळजी कमी घेतो पण मुलांची पत्नी जास्त काळजी घेते. आणि म्हातारपणीचा आई-वडिलांच्या काळजीसाठी आणि त्यांचे वानप्रस्थाश्रम आनंदात जाण्यासाठी एकवेळ ती सुंदर नसली तरी चालेल पण सर्वांना सोबत घेवून चालणारी समजदार मात्र नक्कीच हवी.

सुंदर आणि मुख्य म्हणजे समजदार बायकोसोबत राहाण्याइतपत नवर्‍याने सुद्धा तेवढं लायक बनाव.म्हणजेच समजदार फक्त पत्नीने असून चालत नाही तर पतीनेही पत्नीला तितकेच समजून घ्यायला हवं नाहीतर तिच्या चांगुलपणाचा आणि समजूतदारपणाचा गैरफायदा घेतल्यासारखे होईल.

सौंदर्याला महत्त्व आहेच असे नाही तर फक्त भारतातच सौंदर्याला खूप महत्त्व आहे आणि यामुळे मुली आणि महिलांच्या रूपाला पाहून सौंदर्य ठरवलं जातं आणि संपूर्ण व्यक्तिमत्त्व बाजूला राहून जातं.

प्रत्येक स्त्री कुठल्या ना कुठल्या रूपाने सुंदर असतेच. गुणवंत किंवा गुणाने सुंदरच असते आणि इतरांना कुरूप किंवा इतर कोणतेही विशेष नाम लावायचा अधिकार कोणालाच नसतो. “स्त्री ही ईश्वराची सर्वश्रेष्ठ निर्मिती आहे”.

सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *